Skip to content

Deola | डोंगरगावात राज्य उत्पादन शुल्क पथकावर हल्ला; आरोपींना अटक

Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : Deola | डोंगरगाव (ता. देवळा) येथे सोमवारी (दि २५) रोजी मालेगावच्या राज्य उत्पादन शुल्कविभागाच्या पथकातील अधिकाऱ्यांना शिवीगाळ व दमदाटी केल्या प्रकरणी तीन आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणी आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांनी दिली आहे. याबाबत देवळा पोलीस ठाण्याकडून मिळालेली माहिती अशी की, डोंगरगाव (ता. देवळा) येथे (दि २५) रोजी मालेगाव येथील सहायक दुय्यम निरीक्षक वंदना देवरे व पथकाने त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार एम एच 15 एफटी 5061 या वाहनात अवैध बनावट मद्य निर्मितीचे साहित्य घेऊन वाहतूक करतांना मिळून आले.

Deola | देवळा तालुक्यात लोकसभेच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज – तहसीलदार मिलिंद कुलकर्णी

त्यामुळे त्यांनी सदर वाहनाची तपासणी करीत असताना यातील आरोपी सुरेश मुरलीधर आहिरे, महेश दशरथ सावंत, कैलास मुरलीधर आहिरे व इतर 10 ते 12 इसम सर्व (रा . डोंगरगाव) यांनी शासकीय कर्तव्यापासून परावृत्त करत हुज्जत घालून शासकीय कामात अडथळा आणला तसेच शिवीगाळ व दमदाटी केली. अशी फिर्याद श्रीमती. देवरे यांनी देवळा पोलीस ठाण्यात दिली. यावरून वरील तीन आरोपींविरोधात भा.द.वि कलम 353 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव करीत आहेत.

Deola | देवळा नगरपंचायतीच्या वतीने शहरात मतदान जनजागृती मोहीम


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!