Deola | देमको बँकेस आर्थिक वर्षाच्या अखेरीस २ कोटी ८६ लाख ७५ हजार रुपयांचा नफा

0
2
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा |  येथील अग्रगण्य अशा ‘देवळा मर्चंटस् को. ऑप.’ बँकेस ३१ मार्चच्या अखेरीस दोन कोटी ८६ लाख ७५ हजार रुपये इतका ढोबळ नफा झाल्याची माहिती बँकेच्या चेअरमन कोमल कोठावदे यांनी रोजी दिली आहे. तर थकीत कर्जवसुलीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने बँकेचा नेट एनपीए शून्य टक्के राखण्यास बँकेस यश मिळत असून भविष्यात सभासदांना डिव्हिडंड (लाभांश ) देण्यासाठी बँक प्रयत्नशील असल्याचे व्हा. चेअरमन डॉ. प्रशांत निकम यांनी सांगितले.

मागील आर्थिक वर्षाचा आढावा देतांना ते बोलत होते. देमको बँकेस ३१ मार्च अखेर सर्व प्रकारच्या तरतुदी वजा करता निव्वळ नफा हा एक कोटी ४० लाख ६१ हजार रुपये झाला आहे. १९ जानेवारी १९६१ रोजी स्थापन झालेल्या या नागरी सहकारी बँकेचे मार्चअखेर भाग भांडवल तीन कोटी ६६ लाख ५२ हजार रुपये असून “अ” वर्ग सभासद ६,८६२ इतके आहेत. तर, एकूण ठेवी या ९२ कोटी ९ लाख रुपये इतक्या झाल्या असून, यात मागील वर्षीच्या तुलनेत १६ कोटी रुपयांची वाढ झालेली आहे. यातील गरजू व आर्थिक दृष्ट्या सर्वसाधारण असलेल्या व्यक्तींना कर्ज स्वरूपात ५९ कोटी ७६ लाखांचे कर्ज वाटप केलेले आहे. तसेच बँकेने ५४ कोटी ४६ लाखांची सुरक्षित गुंतवणूक देखील केलेली आहे. बँकेचा सीआर एआर ४०.२८ टक्के इतका असून बँकेचा सीडी रेशो हा ६४.८९ टक्के इतका आहे.

Deola | देवळा-नाशिक रस्त्यावर आयशरमधून अवैध मद्यसाठ्याची वाहतूक

यावेळी बोलताना कोमल कोठावदे पुढे म्हणाल्या की, “कर्जदार सभासदांचा विमा उतरविण्यात येणार असल्याने त्याचा लाभ सभासदांना होणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या तपासणीनुसार बँकेस ‘ब’ वर्ग प्राप्त झाला आहे. थकबाकी वसुली मोहिमेंतर्गत थकबाकीदारांच्या मिळकतीचा जाहीर लिलाव करून वसुली केली जाणार आहे. थकबाकी सभासदांनी सामोपचार परतफेड योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. या आर्थिक वर्षात प्रत्येक सभासदास आकर्षक खुर्ची भेट देण्यात आली असून बँक डिजिटल करणे, शाखा विस्तार करणे, स्वमालकीच्या जागेस संरक्षक भिंत बांधणे, इमारत नूतनीकरण करणे आदी कामांवर भर दिला जात” असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Deola | देवळा महाविद्यालयाच्या सात विद्यार्थ्यांची सैन्य दलात भरती

यावेळी जनसंपर्क संचालक योगेश वाघमारे, संचालक सर्वश्री अनिल धामणे, केदारनाथ मेतकर, भगवान बागड, प्रमोद शेवाळकर, हेमंत अहिरराव, तज्ञ संचालक भारत कोठावदे, जयप्रकाश कोठावदे, राजेंद्र सूर्यवंशी ,योगेश राणे ,मयूर मेतकर, अमोल सोनवणे, सुभाष चंदन, मनिषा शिनकर, नलिनी मेतकर,चैतन्य वडनेरे, प्रशांत मुसळे, तक्रार निवारण समितीचे कौतिक पवार, मंगलचंद जैन, अतुल आहेर, राजेंद्र ब्राम्हणकर, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील भालेराव, व्यवस्थापक नितीन बोरसे, व कर्मचारी उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here