Dhule Lok Sabha | जातींमध्ये भांडणं लावली, कमिशन घेतले; ड्रायव्हरही करू शकतो भामरेंचा पराभव..?

0
2
Dhule Lok Sabha
Dhule Lok Sabha

Dhule Lok Sabha |  भाजपने या लोकसभा निवडणुकीत अनेक विद्यमान खासदारांना पुन्हा संधी दिल्या आहेत. याता धुळे लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनाही आता तिसऱ्यांदा संधी देण्यात आली आहे. तर मविआतून नुकताच काडीमोड झालेल्या वंचित बहुजन आघाडीने सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी अब्दुल रहमान यांना उमेदवारी दिली आहे. तर, दुसरीकडे महाविकास आघाडीने अजूनही या जागेवर उमेदवार जाहीर केलेला नसून, भामरेंच्या उमेदवारीला मात्र मतदार संघातून जोरदार विरोध होत आहे. (Dhule Lok Sabha)

दरम्यान, यातच लोकसंग्रामचे अनिल गोटे यांनी आपला आणि आपल्या पक्षाचा मविआच्या उमेदवाराला पाठिंबा असल्याचे जाहीर केले असून, धुळे लोकसभेची जागा शिवसेना ठाकरे गटाने लढवल्यास याठिकाणी त्यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला आहे.

Dhule Lok Sabha | दहा वर्षात भामरेंनी जाती-जातींमध्ये भांडणं लावली

यानंतर अनिल गोटे यांनी सुभाष भामरेंवर जोरदार टिका केली असून, ते म्हणाले की,” मागील दहा वर्षात खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी मतदार संघात जाती-जातींमध्ये भांडणं लावली. आलेल्या निधीतून स्वतः दहा टक्के कमिशन घेतले आणि याशिवाय त्यांनी दुसरे काहीही केले नाही. धुळे व मालेगाव या दोन्ही शहरांची अर्थव्यवस्था ही पॉवरलूमवर असून, येथे टेक्स्टाईल पार्कसारखे प्रकल्प आणले असते तर,(Dhule Lok Sabha)

Dhule Loksabha | धुळे लोकसभेतील इच्छुकांच्या गर्दीत अविष्कार भुसे ठरताय लोकप्रिय…

येथील हिंदू व मुस्लिम या दोन्ही धर्माच्या तरुणांना रोजगार मिळू शकला असता. सुभाष भामरेंनी मनमाड, मालेगाव, धुळे, इंदोर, या मार्गावरील रेल्वे मार्ग आणल्याचे सांगितले. मात्र प्रत्यक्षात तो मार्ग नरडाणा ते बोरविहीर असा असून त्यात कुठेही मनमाड, मालेगाव, धुळे यांचा समावेश नाही. यावरून एका एसटी कंडक्टर इतकीही अक्कल त्यांना नाही, अशी घणाघाती टिका अनिल गोटे यांनी केली आहे.

ठाकरे गटाने लढवल्यास मुस्लिम मतदारही त्यांना मतदान करतील

धुळे लोकसभेची जागा ही ठाकरे गटाने लढवल्यास येथील मुस्लिम मतदारही त्यांना मतदान करतील आणि निश्चितच त्यांचा विजय होईल, अशी खात्रीच अनिल गोटेंनी दिली. तर, महायुतीच्या विरोधातील उमेदवार हा स्थानिक असला पाहिजे आणि त्याला लोकांनी ओळखलेही पाहिजे. या मतदारसंघातील 60 ते 65 टक्के मतदार वर्ग हा शेतकरी वर्ग असून वंचिटचे उमेदवार असलेल्या अब्दुल रहमान यांचे शेतकऱ्यांशी काही देणे घेणे नाही. त्यांना जर निवडणूक लढवायचीच होती तर त्यांनी ती काँग्रेसकडून लढवायला पाहिजे होती, असंही यावेळी गोटे यांनी म्हणाले. (Dhule Lok Sabha)

Avishkar Bhuse | आता नाही होऊ शकले तरी, भविष्यात ‘भाईजी’च खासदार

एक भामरे गेल्याने भाजपला काही फरक पडत नाही

“निवडणुकीच्या एक दिवस आधीही उमेदवार बदलता येऊ शकतो. भाजपासाठी एकेक जागा ही महत्त्वाची असून, एक सुभाष भामरे गेल्याने त्यांना काही फरक पडत नाही. मात्र एक जागा गेल्याने त्यांचे मोठे नुकसान होणार असून, या वेळेला पैसे खर्च केले तर एखादा टॅक्सी ड्रायव्हरही डॉ. सुभाष भामरेंचा पराभव करू शकतो, असा आसुडच गोटेंनी भामरेंवर ओढला आहे. (Dhule Lok Sabha)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here