NCP Ajit Pawar | शिंदेसेने पाठोपाठ अजित पवार गटाची उमेदवार यादी जाहीर

0
109
#image_title

NCP Ajit Pawar | आगामी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांसाठी अजित पवार गटाने पहिली यादी जाहीर केली असून भाजपने आपल्या यादीची घोषणा केल्यानंतर महायुतीतील प्रमुख घटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षानेही आपले उमेदवार जाहीर केले आहेत. पहिल्या यादीत एकूण 38 उमेदवारांचा समावेश करण्यात आला आहे. या निवडणुकीत महायुतीला आणखीन मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

NCP Ajit Pawar | अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवार जाहीर; ‘या’ नेत्यांना मिळाले एबी फॉर्म

अजित पवार बारामतीतून लढणार

तर अजित पवार बारामतीतून निवडणूक लढवणार असून 28 ऑक्टोबरला त्यांनी आपला अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. बारामती हा अजित पवारांचा गड मानला जात असून त्यामुळे त्यांच्या या उमेदवारीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. आगामी निवडणुकीत अजित पवार गटाकडून येवला येथे छगन भुजबळ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. छगन भुजबळ राज्यातील प्रमुख नेत्यांपैकी एक असून त्यांची उमेदवारी महत्त्वाची मानली जात आहे.

NCP Ajit Pawar | नाशिकमधील अजित पवार गटाचा पहिला उमेदवार जाहीर

या उमेदवारी यादीत अजित पवार गटाने महिलांना सन्मानजनक स्थान दिले असून उदगीर येथून संजय बनसोडे, श्रीवर्धन येथून अदिती तटकरे यांना उमेदवारी मिळाली आहे. तसेच राजेश विटेकर यांच्या आई निर्मला विटेकर यांना अर्जुनी मोरेगाव येथून उमेदवारी जाहीर झाली आहे.

अजित पवार गटाची संपूर्ण यादी पुढीलप्रमाणे

बारामती – अजित पवार

येवला – छगन भुजबळ

कागल – हसन मुश्रीफ

परळी – धनंजय मुंडे

दिंडोरी – नरहरी झिरवाळ

अमळनेर – अनिल पाटील

तुमसर – राजू कारेमोरे

अहेरी – धर्मरावबाबा आत्राम

पुसद – इंद्राणी नाईक

वसमत – चंद्रकांत नवघरे

कळवण – नितीन पवार

सिन्नर – माणिकराव कोकाटे

निफाड – दिलीप बनकर

देवळाली – सरोज अहिरे

शहापूर – दौलत दरोडा

श्रीवर्धन – आदिती तटकरे

उदगीर – संजय बनसोडे

जुन्नर – अतुल बेनके

आंबेगाव – दिलीप वळसे पाटील

खेड / आळंदी – दिलीप मोहिते

इंदापूर – दत्तात्रय भरणे

मोहोळ – यशवंत माने

मावळ – सुनील शेळके

वाई – मकरंद पाटील

चिपळूण – शेखर निकम

पिंपरी – अण्णा बनसोडे

वडगाव शेरी – सुनील टिंगरे

चंदगड – राजेश पाटील

हडपसर – चेतन तुपे

अकोले – किरण लहामटे

करमाळा – संजय शिंदे

मोर्शी – देवेंद्र भुयार

कोपरगाव – आशुतोष काळे

अहमदनगर शहर – संग्राम जगताप

माजलगाव – प्रकाश सोळंके

अहमदपूर – बाबासाहेब पाटील

अनुशक्तीनगर – सना मलिक

शिवाजीनगर मानखुर्द – नवाब मलिक

अमरावती शहर – सुलभा खोडके

इगतपुरी – हिरामण खोसकर


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here