NCP Ajit Pawar | नाशिकमधील अजित पवार गटाचा पहिला उमेदवार जाहीर

0
71
NCP Ajit Pawar
NCP Ajit Pawar

नाशिक :  राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) हे दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर असून, या दौऱ्यात ते राष्ट्रवादी अजित पवार गटाचा बालेकिल्ला असलेल्या नाशिक जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघ निहाय आढावा घेणार आहेत. तसेच जयंत पाटील यांच्या दौऱ्यावेळी विधानसभा उपाध्यक्ष तथा दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ यांच्या मुलांच्या उपस्थितीनई सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यामुळे नरहरी झिरवाळ हेदेखील शरद पवार गटात घरवापसी करणार का..? अशी जोरदार चर्चा सुरू होती. (Vidhan Sabha Election)

बारामतीनंतर नाशिक राष्ट्रवादीचा बालेकिल्ला

त्यामुळे एकूणच ही परिस्थिती सावरण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे तडकाफडकी नाशिकमध्ये दाखल झाल्याची चर्चा आहे. दरम्यान, बारामतीनंतर नाशिक हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. मागील 2019 च्या निवडणुकीतही नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक 6 आमदार हे राष्ट्रवादीचे निवडून आले होते. त्यामुळे दोन्ही पवारांचे नाशिकवर विशेष लक्ष आहे.

Ajit Pawar NCP Crisis | ‘दादा’ वेश बदलून दिल्लीला जायचे..?; राष्ट्रवादीतील भूकंपाची इनसाइड स्टोरी..!

शरद पवारांनंतर अजित पवारांचाही नाशिकमधील उमेदवार जाहीर 

नुकताच शरद पवारांनी (Sharad Pawar)आणि जयंत पाटलांनी नाशिक दौरा केला आणि यात शरद पवारांनी नाशिकमधून आपला उमेदवार जाहीर केला. अमित भांगरे यांच्या नावाची शरद पवारांनी (NCP Sharad Pawar Group) घोषणा केली. यामुळेच आता अजित पवारांनीही (NCP Ajit Pawar Group) मागे न राहता आपल्या पहिल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा करत चर्चांना पूर्णविराम दिला आहे. मात्र, महायुतीच्या जागावाटपापूर्वीच सुनील तटकरे यांनी उमेदवार जाहीर केला आहे.

Ajit Pawar Birthday | वाढदिवशी दादांसाठी वहीनींचे ‘खास’ गिफ्ट; गुलाबी जॅकेट घालून दादा नगरला

अन् त्यांचे नाव आहे नरहरी झिरवाळ

दरम्यान, अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपल्या दिंदोरीच्या उमेदवाराची घोषणा केली आहे. दिंडोरी विधानसभा मतदार संघासाठी विद्यमान आमदार तथा विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांचे नाव तटकरे यांनी जाहीर केले आहे. “नरहरी झिरवाळ हे केवळ आदिवासीचे नेते नाहीत. तर, संपूर्ण राज्याचे, सर्व समाजांचे व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. येथे सर्वांना गोकुळ झिरवाळ यांच्याबाबत उत्सुकता असून, आता झिरवाळ काय करणार? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.(NCP Ajit Pawar)

तर, आता झिरवाळ साहेब एकच करणार, जी टोपी आता तटकरेंच्या डोक्यावर घातली, त्या टोपीसह ते अजितदादांसोबतच राहणार आहेत. इथले उमेदवार हे राष्ट्रवादीच्या घड्याळ या चिन्हावरच निवडणूक लढतील. मी मुद्दाम नाव घेतलं नव्हतं, पण आता तुम्ही विचारणारच आहात म्हणून सांगतो, त्यांचे नाव आहे ‘नरहरी झिरवाळ’, असे म्हणत आज सुनील तटकरे यांनी दिंडोरी विधानसभेचे उमेदवार म्हणून नरहरी झिरवाळ यांच्या नावाची घोषणा केली आहे. (NCP Ajit Pawar)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here