Skip to content

Kalyan Lok Sabha | श्रीकांत शिंदेंविरोधात ठाकरे गटाकडून ‘या’ महिला उमेदवाराला संधी.?

Kalyan Lok Sabha

Kalyan Lok Sabha | सध्याच्या निवडणुकींच्या मौसमात कधी काय होईल हे काही सांगता येत नाही. यातच आता आणखी एक मोठी बातमी राज्याच्या राजकारणातून समोर आली आहे. तर, ठाकरे गटाने कल्याण लोकसभा मतदार संघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे चिरंजीव विद्यमान खासदार श्रीकांत शिंदेंच्या विरोधात ठाकरे गटाने उमेदवार दिला आहे. दरम्यान, श्रीकांत शिंदेंच्या विरोधात आता उद्धव ठाकरे गटाच्या महिला उमेदवार अयोध्या पोळ यांना कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली असून, याबाबत स्वतः अयोध्या पोळ यांनी आपल्या ट्वीटर हॅंडलवरुन ट्वीट करत माहिती दिली आहे. (Kalyan Lok Sabha)

Lok Sabha Election | भाजपसमोर शिंदेंची माघार; ‘या’ जागेवरील उमेदवार बदलला..?

याबाबत माहिती देताना अयोध्या पोळ आपल्या ट्वीटमध्ये म्हटल्या आहेत की, “आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आशिर्वादाने मी मशाल या पक्षाच्या चिन्हावर शिवसेनेकडून कल्याण लोकसभा निवडणूक लढवत आहे. ज्यांच्याकडे ईडी, आणि आयटी सारखी ताकद आहे, अशा स्वयंघोषित जागतिक स्तराच्या सर्वात मोठ्या पक्षासोबत जे युतीत आहे अशा मुख्यमंत्र्याच्या खासदार मुलाच्या विरोधात मला संधी दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद. आदरणीय साहेब, आदित्यजी ठाकरे, संजयजी राऊत साहेब, वरुणजी सरदेसाई, साईनाथजी दुर्गे….यांचे आभार. (Kalyan Lok Sabha)

Nashik Lok Sabha | नाशिक भाजपचा बालेकिल्ला, पण…; संकटमोचकांनी मौन सोडलं

‘एप्रिल फुल’…?

उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पोळ यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर हॅंडलवरुन कल्याणमधून महाविकास आघाडीने आपल्याला उमेदवारी दिल्याची स्वतःच घोषणा केली आहे. मात्र, ठाकरे गट किंवा उद्धव ठाकरे यांच्याकडून अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसून, त्यामुळे अयोध्या पोळ यांचा हा ट्वीट म्हणजे ‘एप्रिल फुल’ तर नाही ना? अशीही चर्चा रंगली आहे.(Kalyan Lok Sabha)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!