Lok Sabha Election | भाजपसमोर शिंदेंची माघार; ‘या’ जागेवरील उमेदवार बदलला..?

0
3
Lok Sabha Election
Lok Sabha Election

Lok Sabha Election |  आगामी लोकसभा निवडणुकांचे वारे राज्यात वाहत असून, निवडणुकींच्या काळात कधी काय होईल हे काहीच सांगता येत नाही. दरम्यान, आधीच काही जागांचा तिढा हा महायुतीत कायम असून, शिवसेनेने हिंगोली लोकसभेसाठी हेमंत पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर भाजपकडून त्यांच्या उमेदवारीला जोरदार विरोध करण्यात येत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक पाऊल मागे घेत मोठा निर्णय घेतला असून, या जागेवरील उमेदवार बदलण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. एवढंच नाहीतर, हेमंत पाटील यांनादेखील आपली उमेदवारी मागे घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. (Lok Sabha Election)

सुरुवातीपासूनच हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला भाजपच्या स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांचा विरोध होता. याच पार्श्वभूमीवर भाजपकडून काल हिंगोलीत आढावा बैठक घेण्यात आली होती. या बैठकीतही हेमंत पाटील यांना महायुतीची उमेदवारी दिली जाऊ नये असा निर्णय घेण्यात आला.

Lok Sabha Election | वर्षा बंगल्यावर मध्यरात्री खलबतं; ‘या’ जागेच तिढा सुटला..?

एवढंच नाहीतर हेमंत पाटील यांना उमेदवारी दिल्यास आम्ही त्यांचे काम करणार नसल्याची भूमिका भाजपच्या स्थानिक नेत्यांनी घेतली आहे. या संपूर्ण प्रकाराची गंभीर दखल महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी घेतली असून, या पार्श्वभूमीवर रात्री हेमंत पाटील यांना तातडीने मुंबईला बोलवले होते. यानंतर त्यांची रात्री मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत उशिरापर्यंत बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. (Lok Sabha Election)

नवीन उमेदवाराची चाचपणी सुरू 

स्थानिक पातळीवर भाजप नेत्यांकडून होणार विरोध पाहता हेमंत पाटील यांची उमेदवारी बदलण्याच्या हालचाली वरिष्ठ पातळीवरून सुरू करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून हेमंत पाटील यांना भरलेला उमेदवारी अर्जदेखील मागे घेण्याच्या सूचना करण्यात आल्याची माहिती आहे. तर, हेमंत पाटील यांच्याऐवजी बाबुराव कदम यांना उमेदवारी दिली जाऊ शकते का? याचीही चाचपणी शिवसेनेकडून केली जात आहे.  (Lok Sabha Election)

Lok sabha Election | भाजपची मोठी ऑफर?; राज ठाकरे ‘शिवसेना प्रमुख’ होणार?

नवीन उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी भाजपची 

दरम्यान, यानंतर एकनाथ शिंदेंनी भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला असून, भाजपच्या आक्षेपानंतर उमेदवारी उमेदवार बदलून देत आहे. तरी नवीन उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी भाजपच्या खांद्यावर असेल. आता दिलेला नवीन उमेदवार हा भाजप कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन निवडणून आणण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. (Lok Sabha Election)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here