Skip to content

Maharashtra Sadan | महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी भुजबळांच्या अडचणी वाढणार..?

Maharashtra Sadan

Maharashtra Sadan | गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक लोकसभा मतदार संघ हा महायुतीच्या उमेदवारांच्या वादामुळे चर्चेत आहे. या जागेसाठी शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे हेदेखील आग्रही असून, दुसरीकडे छगन भुजबळ यांनीही या जागेवर दावा केला आहे. छगन भुजबळ यांचे नाव जवळपास निश्चित झाले असून, आज किंवा उद्या यासंदर्भात घोषणा होऊ शकते. असे असतानाच आता मंत्री भुजबळांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. (Maharashtra Sadan)

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती. मात्र, यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणी पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान, आता सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी यात हस्तक्षेप करत या प्रकरणाच्या फेर चौकशीचे आदेश दिले असून, या प्रकरणाची उद्या मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. यामुळे नाशिक लोकसभेच्या रिंगणात उतरू पाहणाऱ्या मंत्री छगन भुजबळांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. (Maharashtra Sadan)

भुजबळांना ‘क्लीनचिट’ सर्वत्र जल्लोष ; देवळा तालुक्यात राष्ट्रवादी मात्र जल्लोषा पासून दूर ?

Maharashtra Sadan | ट्विट करत माहिती 

तर याबाबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट करत म्हटले आहे की, “महाराष्ट्र सदन घोटाळ्यात मंत्री छगन भुजबळ यांना निर्दोष सोडण्यात आलं होतं. गेली दीड वर्ष या प्रकरणी डिस्चार्जला आव्हान देणारे अपील ऐकले जात नव्हते. तर, पाच न्यायाधीशांनी ‘नॉट बिफोर मी’ असे म्हटले होते. यानंतर सर्वोच्च न्यायालयासमोर एक SLP करून त्यावर ओरडी घेऊन, माननीय CJ यांना योग्य न्यायाधीशांसमोर त्याची लिस्टिंग करण्याबाबत विनंती करण्याचे आदेश मिळाले असून, शेवटी हे प्रकरण उद्या अनुक्रमांक १२ वर न्यायमूर्ती मोडक यांच्यासमोर ठेवण्यात येणार आहे”. (Maharashtra Sadan)

क्लीनचिट कायम राहील ? की… 

महाराष्ट्र सदन आर्थिक घोटाळा प्रकरणी मंत्री छगन भुजबळ यांना याआधी निर्दोष मुक्त करण्यात आले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या न्यायालयाकडे दोषमुक्त करण्यासाठी भुजबळांनी अर्ज केला होता. त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांनीही दोषमुक्त करण्यासाठी न्यायालयाकडे अर्ज दाखल केला होता.

त्यानंतर न्यायालयाने छगन भुजबळांची निर्दोष मुक्तता केली. मात्र, यानंतर अंजली दमानिया यांनी तातडीने मुंबई उच्च न्यायालयात डिस्चार्जला आव्हान देणारी याचिका दाखल केली. दरम्यान, आता या याचिकेवर सुनावणी होणार आहे. तर, यानंतर आता छगन भुजबळांची क्लीनचिट कायम राहील ? की पुन्हा काही राजकीय घडामोडी घडणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Maharashtra Sadan)

Chhagan Bhujbal | ‘महाराष्ट्र सदन घोटाळा’ प्रकरणी भुजबळ पुन्हा अडकणार..?

असे आहेत आरोप? 

राज्याच्या सार्वजनिक बांधकाम मंत्रीपदी असताना छगन भुजबळ यांनी जारी केलेल्या विविध कंत्राटांमधून भुजबळ कुटुंबीयांच्या कंपन्यांना रोख रक्कम ही लाच स्वरुपात मिळाल्याचे आरोप करण्यात आले होते. महाराष्ट्र सदन आणि इंडिया बुल्स या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हे दाखल केल्यानंतर सक्तवसुली संचालनालयाकडून भुजबळांच्या विरोधात काळा पैसा प्रतिबंधक कायदान्वये दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. (Maharashtra Sadan)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!