Jyoti Mete | राज्यातील आणखी एका राजकीय कुटुंबात फुट..?

0
3
Jyoti Mete
Jyoti Mete

Jyoti Mete |  आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यासह देशात अनेक मोठमोठ्या घडामोडी घडत आहे. अनेक नेते आपापल्या सोयीनुसार पक्षांतर करताना दिसत आहेत. यातच आता राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पवार कुटुंबानंतर आता राज्यातील आणखी एका राजकीय कुटुंबात फुट पडत असल्याचे दिसत आहे.

दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा ज्योती मेटे यांची महाविकास आघाडीत सामील होण्याची चिन्हे असून, त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासोबत बोलणी सुरू आहे. तर, दुसरीकडे विनायक मेटे यांचे लहान भाऊ आणि त्यांची संघटना ही महायुतीत सामील होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर त्यांचे लहान भाऊ रामहरी मेटे यांनी ‘जय शिवसंग्राम’ असी नवी संघटना स्थापन केली असून, टे महायुतीत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मेटे कुटुंबातच मविआ आणि महायुती असे चित्र दिसू शकते. (Jyoti Mete)

Sachin Mete Passed Away| दिवंगत नेते विनायक मेटेंच्या पुतण्याची आत्महत्या; वयाच्या ३४ व्या वर्षी उचललं टोकाचं पाऊल…

अधिक माहितीनुसार, येत्या दोन-तीन दिवसात रामहरी मेटे यांची जय शिवसंग्राम ही संघटना महायुतीत सामील होऊ शकते. तर विनायक मेटे यांच्या पत्नी शिवसंग्रामच्या अध्यक्षा ज्योती मेटे यांचा देखील शरद पवार गटात सहभागी होण्याचा निर्णय हा येत्या दोन दिवसांत होऊ शकतो. असे झाल्यास राज्यात पवार विरुद्ध पवार तसे मेटे विरुद्ध मेटे असा संघर्ष पाहायला मिळणार आहे. (Jyoti Mete)

Jyoti Mete | शरद पवारांची खेळी 

बीड लोकसभा मतदारसंघात भाजपने विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांना डावलून त्याजागी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली आहे. तर, दुसरीकडे शरद पवार गट आता विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांना बीड लोकसभेच्या मैदानात उतरवण्याची शक्यता आहे. दरम्यान, असे झाल्यास विनायक मेटे यांचा मराठा समाजासाठीचा लढा आणि मनोज जरांगेंचे मराठाअ आरक्षणाचे आंदोलन पाहता ज्योती मेटे यांना मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर ज्योति मेटे यांना आपल्या बाजूने करून शरद पवार मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत आहेत.(Jyoti Mete)

साहेब आम्हाला पोरक केलं..! ; उदयकुमारांच्या अश्रूंचा बांध फुटला

मुंडे बहीण-भावाचीही युती 

गेल्या काही वर्षांपासून बीडमध्ये धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे असा वाद होता. या भावाबहिणीच्या वादादरम्यान  दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर अनेक टीकाही केल्या. मात्र, आता अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत सामील झाली आणि भाजप राष्ट्रवादीप्रमाणे मुंडे बहीण-भावांचीही युती झाली. एवढंच नाहीतर महायुतीच्या उमेदवार म्हणून पंकजा मुंडेंच्या नावाची घोषणा झाल्यानंतर आता स्वतः धनंजय मुंडे हे बहिणीसाठी मैदानात उतरले आहेत.  (Jyoti Mete)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here