Skip to content

Horoscope 1 April | कोणाला फायदा तर कोणाचे नुकसान; वाचा आजचे राशीभाविष्य

Horoscope 14 April 2024

Horoscope 1 April |  आज नवीन महिन्याचा आणि नवीन आठवड्याचा पहिला दिवस आहे. आज रात्री ९:१० वाजेपर्यंत अष्टमी तिथी असेल. तर, रात्री ११:१२ वाजेपर्यंत मूळ नक्षत्र पुन्हा पूर्वाषाढ नक्षत्र असेल. तसेच आज वाशी योग, आनंदादि योग, सुनाफ योग, आणि ग्रहांनी तयार केलेला वरियान योग यांचे काही राशींना सहकार्य लाभेल. आज कुठल्याही शुभ कार्यासाठी दोन मुहूर्त आहेत. सकाळी १०:१५ ते ११:१५ पर्यंत शुभ आणि दुपारी ४:०० ते ६:०० वाजेपर्यंत असेल. तर सकाळी ७:३० ते ९:०० पर्यंत राहुकाळ असेल. आज १ एप्रिल २०१४ सोमवारचा दिवस सर्व १२ राशींसाठी कसा असेल. हे जाणून घेऊयात.

मेष राशी –

आज चंद्र नवव्या भावात असेल. त्यामुळे धार्मिक कार्य करणार असाल तर अडथळे येऊ शकतात. तसेच वरियान योग तयार झाल्यामुळे नोकरीबाबत योजना यशस्वी होतील. व्यावसायिकांनी कोणाच्याही सल्ल्याने कुठलीही मोठी गुंतवणूक करू नये. सप्ताहाच्या सुरुवातीलाच काही आर्थिक नुकसान होऊ शकते. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस खूप चांगला असेल. त्यांना फायदा होईल. वैवाहिक आयुष्यात नात्यांचे बंध घट्ट ठेवण्यासाठी नात्यात स्पष्टता ठेवा. आरोग्याविषयी बोलायचे झाले तर, कमी व उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांनी स्वतःची विशेष काळजी घ्यावी. (Horoscope 1 April)

वृषभ राशी –

चंद्र आज आठव्या भावात असल्यामुळे आई किंवा तिच्या कुटुंबातील व्यक्तींसोबत मतभेद होतील. नोकरदार वर्गाने कामाच्या ठिकाणी काम पूर्ण करण्यावर भर द्यावा. कंटाळा करणे टाळा. व्यावसायिकांनी नेहमी जीभेवर साखर ठेवावी. बोलण्यात कठोरपणा ठेऊ नये. अन्यथा याचा परिणाम व्यवसायावर होऊ शकतो. त्यामुळे ग्राहकांसोबत बोलताना विशेष काळजी घ्या. काल कठीण असेल पण कर्ज न घेण्याचा प्रयत्न करा. आता घेतलेले कर्ज पुढे समस्या निर्माण करू शकते. विद्यार्थ्यांनी त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी संयमाने सराव करावा. आरोग्याविषयी बोलायचे झाले तर, यकृताशी संबंधित आजार असणाऱ्यांनी काळजी घ्यावी.

Horoscope 30 March | राजकीय व्यक्तींसाठी आजचा दिवस कसा..?; वाचा आजचे राशिभविष्य

Horoscope 1 April | मिथुन राशी –

चंद्र सप्तम भावात असल्यामुळे आज व्यावसायिकांना फायदा होईल. त्यांच्या व्यवसायात तेजी दिसेल. नोकरदार वर्गाला आज चांगली ऑफर मिळेल. किरकोळ करणांमुळे ती संधी सोडू नका. अन्यथा नंतर पश्चाताप करावा लागेल. या आठवड्यात कामाच्या ठिकाणी परिस्थिती तुमच्या बाजूने राहील. व्यावसायिकांनी कुठलाही मोठा निर्णय घेताना विचार करून घ्यावा. विद्यार्थ्यांनी मित्रांसोबत किंवा शिक्षकांसोबत बोलताना बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. अविवाहित लोकांसाठी चांगले स्थळ येऊ शकतात. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींची आज काही विशेष मान्यवरांसोबत भेट होऊ शकते. आरोग्याविषयी बोलायचे झाले तर,  महिलांना हार्मोन्सशी संबंधित समस्या जाणवू शकतात.  (Horoscope 1 April)

कर्क राशी –

चंद्र सहाव्या भावात असेल ज्यामुळे कर्जापासून आराम मिळेल. नोकरदार वर्गासाठी हा संपूर्ण आठवडा व्यस्त असेल.  व्यावसायिकांनी आपल्या कामाचा वेग वाढवावा. त्यामुळे चांगले उत्पन्न मिळेल. आज सर्व बाबतीत परिस्थिती सामान्य राहील. आज तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. तरुणांनी आपली गुपिते कोणसोबतही शेअर करताना काळजी घ्यावी. लोकांवरचा अतिविश्वास हा तुमच्यासाठी घातक ठरू शकतो. आरोग्याविषयी बोलायचे झाले तर, तब्येत अचानक बिघडू शकते.

सिंह राशी –

चंद्र आज पाचव्या भावात असेल ज्यामुळे आर्थिक लाभ होऊ शकतो. नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस काहीसा कठीण असेल. कामाच्या ठिकाणी आज घेतलेले निर्णय योग्य असतील. व्यवसायाच्या प्रगतीसाठी महत्वाचे निर्णय घेऊ शकतात. तरुणांनी विरोधकांपासून सावध रहावे. आज समाजात तुमची प्रतिष्ठा वाढू शकते. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून खास भेट मिळू शकते. नवीन वाहन घेण्याचा विचार करू शकतात. आरोग्याची काळजी घ्या. (Horoscope 1 April)

कन्या राशी  –

चंद्र चतुर्थ भावात असल्याने जमीनी संबंधित प्रश्न सुटतील. कार्यालयासाठीचे व्यवहार करताना काळजी घ्या. नोकरदार वर्गाला आज पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. पण यात सहकारी अप्रत्यक्षरित्या अडथळा आणू शकतात. तुमची नाती सांभाळा. कारण तुमचे तुमच्या जोडीदाराशी वाद होण्याची शक्यता आहे. नात्यांमध्येही स्पष्टता ठेवा. व्यावसायिकांनी मन शांत ठेवावे, जास्त रागामुळे काम बिघडू शकतात. तरुणांनी धार्मिक कार्यात सहभागी व्हावे. तुमच्या चुकीच्या वागणुकीमुळे कुटुंबातील व्यक्तींच्या भावना दुखावल्या जातील. त्यामुळे कौटुंबिक बाबी नीट हाताळा. आरोग्याची काळजी घ्या. गाफील राहू नका.(Horoscope 1 April)

तुळ राशी –

चंद्र तिसऱ्या भावात असेल ज्यामुळे तुमचे धैर्य आणि आत्मविश्वास वाढेल. नोकरदार वर्गाच्या लोकांवर आज वरिष्ठ खूश असतील तसेच आज तुम्हाला सन्मानितही केले जाऊ शकते. ग्रहांच्या प्रभावामुळे कीर्ती वाढत आहे. आज तयार झालेल्या वरियन योगमुळे सरकारी व्यावसायिकांना यश मिळेल. त्यामुळे व्यावसायिकांची धांदल कमी होईल. विद्यार्थ्यांनी त्यांच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करावे लागेल. कौटुंबिक बाबीही उत्तम असतील. आज काही ठिकाणी तुमच्या जोडीदाराची साथ तुमच्यासाठी आनंददायी ठरेल. आरोग्याविषयी बोलायचे झाले तर, त्वचेची विशेष काळजी घ्यावी. अन्यथा ॲलर्जी होऊ शकते. कॉस्मेटिक वापरताना जपून वापरा. (Horoscope 1 April)

वृश्चिक राशी –

चंद्र आज दुसऱ्या भावात असेल. ज्यामुळे आर्थिक लाभ होऊ शकतो. ऑफिसमध्ये कामाचा ताण वाढेल. त्यामुळे तुम्ही काहीसे अस्वस्थ असाल. कामाच्या कौशल्याची वरिष्ठांकडून तुमची प्रशंसा होईल. शेअर बाजारात गुंतवणूक असलेल्यांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांनी ग्राहकांचा आदर केला पाहिजे. कौटुंबिक वातावरण आज आनंदी असेल. तुमची प्रतिकारशक्ती चांगली असेल. त्यामुळे तुम्हाला तणाव असूनही उत्साही वाटेल.(Horoscope 1 April)

Horoscope 15 March | ‘या’ लोकांवर असेल लक्ष्मीची कृपा; वाचा आजचे राशिभविष्य

धनु राशी –

चंद्र आह धनू राशीत असेल. त्यामुळे बौद्धिक क्षमता वाढेल. नोकरदार वर्गाचे कामाच्या ठिकाणी सहकारी आणि वरिष्ठांशी वाद होऊ शकतात. ते टाळा अन्यथा भविष्यात महागात पडू शकते. कामाच्या ठिकाणावरील काही जुने अडथळे दूर होऊ शकतात. आज वरियन योगाच्या निर्मितीमुळे, व्यावसायिकांना त्यांचे उत्पन्न टिकवून ठेवण्यास मदत होईल.  कुटुंबात कठीण परिस्थिती उद्भवू शकते. तरुणांनी सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करून दिवसाची सुरुवात करावी. त्याच्या कृपेने तुमची सर्व कामे उत्तमरीत्या होतील. आरोग्याविषयी बोलायचे झाले तर, खाण्यापिण्याच्या सवयींबाबत बेफिकीर राहू नका.  (Horoscope 1 April)

मकर राशी –

चंद्र बाराव्या भावात असल्यामुळे नवीन संपर्कांमुळे अडचणी निर्माण होऊ शकतात. नोकरदार वर्गाला कामाच्या ठिकाणी मानसिक तणाव जाणवेल. व्यावसायिकांना काही व्यावसायिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. व्यवसायात पैशाची कमतरता जाणवेल त्यामुळे धीर धरा. काही काळानंतर पुन्हा काम सुरू करा. व्यवसायात जास्त खर्च होईल मात्र उत्पन्न मर्यादित असेल. ग्रहांचा खेळ पाहता तरुणांनी वाईट विचारांपासून दूर रहावे. वैवाहिक जीवनात मोठे वाद होण्याच्या शक्यता आहे. तुमच्या जोडीदाराच्याही भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. आरोग्याविषयी बोलायचे झाले तर, आरोग्य चांगले असेल. पण पौष्टिक आहाराचे सेवन करा. (Horoscope 1 April)

कुंभ राशी –

चंद्र अकराव्या भावात असल्यामुळे तुम्ही तुमची कर्तव्ये पार पाडण्यात यशस्वी होऊ शकतात. नोकरदार वर्गाला वरिष्ठांच्या म्हणण्यानुसार काम करावे लागेल. मार, प्रगतीच्या वाटेत स्वाभिमान मध्ये येऊ देऊ नका. नोकरदार वर्गाच्या लोकांना त्यांचे करिअर सुधारण्यास मदत होईल. व्यावसायिकांना आर्थिक बाबींमध्ये फायदा होईल. व्यवसायिकांना चांगली ऑफर मिळू शकते. त्यामुळे ती स्वीकारण्यात काही गैर नाही. विद्यार्थ्यांना आपले विचार सुधारावे लागतील. तुमच्या प्रियजनांना वेळ द्या, नाती सांभाळण्याचा प्रयत्न करा. अनावश्यक खर्च टाळा. (Horoscope 1 April)

मीन राशी –

चंद्र दशम भावात असल्यामुळे तुमची कामाप्रति इच्छाशक्ति वाढेल. वरियान योगामुळे आर्थिक लाभ होण्याचे नवीन मार्ग खुले होतील. मात्र, कठोर परिश्रम घेण्यास मागे हटू नका. तुमच्या सकारात्मक दृष्टीकोनामुळे कामाच्या ठिकाणी तुमची कामे सोपी होतील. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. राजकीय व्यक्तींवर आज काही मोठी जबाबदारी सोपवली जाऊ शकते. काम महत्त्वाचे आहे.

पण कुटुंब आणि जोडीदारासोबत वेळ घालवा. त्यांच्या भावना समजून घ्या आणि त्यांचा आदर करा. तुमची स्वप्ने लवकरच पूर्ण होतील. आजच्या दिवसाची सुरुवात आव्हानात्मक असेल. काही कठोर निर्णय घ्यावे लागू शकतात. काही महत्त्वाचे निर्णय घेताना तुम्हाला काही लोकांचा पाठिंबा मिळेल तर काही लोकांची नाराजी स्वीकारावी लागेल. लांबच्या प्रवासामुळे किंवा सतत बसल्यामुळे पाय दुखणे आणि पायांना सूज येणे असा त्रास जाणवू शकतो. (Horoscope 1 April)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!