Skip to content

Horoscope 15 March | ‘या’ लोकांवर असेल लक्ष्मीची कृपा; वाचा आजचे राशिभविष्य

Horoscope 14 April 2024

Horoscope 15 March | आपल्या दैनंदिन जीवनात अनेक गोष्टी घडत असतात. ज्योतिष शास्त्रानुसार, आपल्या आयुष्यात घडणाऱ्या शुभ किंवा असुभ गोष्टी या ग्रहांच्या प्रभावामुळे घडत असतात. राशिभविष्य म्हणजे ग्रहांच्या हालचाली लक्षात घेऊन पंचांगाच्या आधारे केलेले भाकीत होय.

ज्योतिष शास्त्रानुसार आज षष्ठी तिथी नंतर आज शुभ कार्यासाठी दोन शुभ मुहूर्त आहेत. सकाळी ८:१५ ते १०:१५ पर्यंत आणि दुपारी १:१५ ते २:१५ पर्यंत असतील. तर, सकाळी १०:३० ते दुपारी १२:०० पर्यंत राहुकाल असेल. तर जाणून घेऊयात की, आजचा १५ मार्च शुक्रवारचा दिवस हा सर्व १२ राशीच्या लोकांसाठी कसा जाईल. वाचा आजचे राशीभविष्य…

मेष राशी –

मेष राशीच्या लोकांचा आजचा दिवस चांगला असेल. नोकरदार वर्गाच्या लोकांचा कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. आज तुम्हाला इच्छित लाभ मिळू शकतो. व्यवसायिकांनी व्यवसायात व्यवसाय लक्षात ठेवणे गरजेचे आहे. काही मोठे निर्णय घ्यायचे असल्यास आजचा दिवस शुभ आहे. तसेच आज तुम्हाला काही मोठे प्रकल्पही मिळू शकतात. आज तुम्ही कामात जास्त व्यस्त असाल. अविवाहित लोकांसाठी चांगले नातेसंबंध येऊ शकतात. आरोग्याबाबत बोलायचे झाले तर, आज तुम्ही तुमच्या मुलाच्या तब्येतीची काळजी घ्या. विद्यार्थ्यांसाठीही आजचा दिवस हा प्रगतीचा दिवस आहे.

वृषभ राशी –

वृषभ राशीच्या लोकांना बुधादित्य व विषकुंभ योगामुळे व्यवसायात मोठी ऑफर मिळू शकते. व्यावसायिकांचे अडकलेले काम पूर्ण होईल. मात्र, थोडा संयम ठेवावा लागेल. नोकरदार वर्गाच्या लोकांनी कामाच्या ठिकाणी कुठलेही काम करताना विचारपूर्वक करावे आणि शब्दांवर नियंत्रण ठेवावे. आज तुम्ही कुटुंबासोबत फिरायला जाऊ शकता. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराची विशेष काळजी घ्यावी लागेल. मात्र, तुमच्या कुटुंबातील ज्येष्ठांसोबत वाद टाळा. आरोग्याबाबत बोलायचे झाले तर, आज तुम्हाला सर्दी, खोकल्याचा सामान्य त्रास होऊ शकतो. त्यामुळे स्वतःची काळजी घ्या. आज कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी मोठ्यांचा सल्ला घ्या. (Horoscope 15 March)

Horoscope 28 February | ‘या’ लोकांनी बोलण्यावर नियंत्रण ठेवावे; वाचा आजचे राशिभविष्य

Horoscope 15 March | मिथुन राशी –

मिथुन राशीच्या लोकणसाठी आजचा दिवस हा तणावाचा असेल. आज व्यावसायिकांना आर्थिक नुकसानही होऊ शकते. नोकरदार वर्गाच्या लोकांना आज कामाच्या ठिकाणी काम जास्त असेल. त्यामुळे तुमची चिडचिड होईल. रागावर नियंत्रण ठेवावे. तसेच आज तुमचे नियोजन अयशस्वी झाल्यामुळेही तुम्ही चिडचिड हो शकते किंवा तुम्ही तणावात असाल. आरोग्याबाबत बोलायचे झाले तर, आज कुठे बाहेर जाणे टाळा. इजा होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात तडजोड दोन्ही बाजूने करावी लागते. त्यामुळे आपल्या जोडीदाराला समजून घ्या.  (Horoscope 15 March)

कर्क राशी –

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा अत्यंत शुभ असेल. आज व्यावसायिकांना व्यवसायात अतिरिक्त लाभ होण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला चांगले पैसे कमावण्याची संधी मिळू शकते. व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. नोकरदार वर्गाच्या लोकांचे कामाच्या ठिकाणी कौतुक होऊ शकते. तसेच तुमचे काम पाहून तुम्हाला काही प्रकल्पांमध्ये नेतृत्व करण्याचीही संधी मिळू शकते. कुटुंबाला वेळ देऊ शकतात. तुमच्या जोडीदाराच्या भावना समजून घ्या. त्यामुळे तुमचे वैवाहिक आयुष्य चांगले राहील.  (Horoscope 15 March)

सिंह राशी –

सिंह राशीच्या लोकांचा बुधादित्य आणि विषकुंभ योगाच्या निर्मितीमुळे आर्थिक लाभ होऊ शकतो किंवा प्रतिष्ठा वाढू शकते. नोकरदार वर्गाच्या लोकांनी कामाच्या ठिकाणी आपल्या प्रतिष्ठेची आणि पदाची जाणीव ठेवली पाहिजे. अशा गोष्टी करू नका ज्यामुळे तुमची प्रतिष्ठा खराब होईल. व्यावसायिकांनी व्यवसायात अधिक चांगले काम करण्याचा प्रयत्न करा. आज तुम्ही दुसऱ्या व्यवसायाची योजना बनवू शकता. तुमच्या कुटुंबातील वाद मतावण्याचा प्रयत्न करा. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत फिरायला जाण्याचे नियोजन करू शकतात. (Horoscope 15 March)

कन्या राशी – 

कन्या राशीच्या लोकांच्या बुधादित्य आणि विषकुंभ योग तयार झाल्यामुळे व्यावसायिकांना व्यवसायात आर्थिक लाभ होईल तसेच तुम्ही जर एखादा नवीन प्रकल्प सुरू केला असेल, तर त्यातही लाभ होईल. मात्र तुम्हाला त्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील. नोकरदार वर्गाच्या लोकांना कामाच्या ठिकाणी यशस्वी होण्यासाठी सर्वात आधी कामाचे नियोजन करावे लागेल. नोकरदार वर्गाच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. आज तुमच्या कामातील अडचणी दूर होतील. मात्र, संशोधन केल्याशिवाय कोणतेही काम सुरू करू नका. तुमच्या जोडीदारसोबत वाद झाले असतील. तर, ते आजच मिटवा. नाते सुधरवण्याचा प्रयत्न करा. (Horoscope 15 March)

Horoscope 27 February | ‘या’ लोकांसाठी आजचा दिवस फायद्याचा; वाचा आजचे राशिभविष्य

तुळ राशी –

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कसोटीचा असेल. व्यावसायिकांना व्यवसायात कमी नफा व जास्त खर्चामुळे तोटा होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही तणावात आणि चिंतेत असाल. तरुण आज आपल्या आळशीपणा आणि दिरंगाईमुळे नोकरीच्या संधी गमावू शकतात. कौटुंबिक जीवनात काही किरकोळ वाद होऊ शकतात. तसेच आज वैवाहिक जीवनातही नातेसंबंध बिघडू शकतात. आरोग्याबाबत बोलायचे झाले तर, आज अशक्तपणामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते. तसेच डोळ्यांशी संबंधित संसर्गाचा धोका होऊ शकतो. त्यामुळे शक्यतो तुम्ही प्रवास टाळावा. (Horoscope 15 March)

वृश्चिक राशी –

वृश्चिक राशीच्या लोकांना आज कामाच्या ठिकाणी टीम सदस्यांचे सहकार्य मिळेल. नोकरदार वर्गाच्या लोकांच्या कामात वाढ होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना व्यवसायात काही बदल करावे लागतील. तुम्ही कर्जही घेऊ शकतात. नवीन व्यवसायाबाबत विचार करू शकतात. कुटुंबातील वातावरण चांगले असेल. वैवाहिक जीवनही उत्तम असेल. आरोग्याबाबत बोलायचे झाले तर, आज तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत अधिक जागरूक राहाल. आज कामानिमित्त बाहेर जावे लागू शकते. (Horoscope 15 March)

धनु राशी –

धनू राशीच्या लोकांना आज प्रलंबित कामे पूर्ण करण्यावर भर द्यावा लागेल. नोकरदार वर्गाच्या लोकांना आज कामाच्या ठिकाणी जास्त कामे असतील. त्यामुळे तणाव असेल. व्यावसायिकांनी आपल्या कामात हलगर्जीपणा टाळायला हवा. काही प्रलंबित कामे असल्यास ते लवकर पूर्ण करा. महिलांनी खर्चाकडे लक्ष द्यावे आणि कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त किंवा अनावश्यक खर्च टाळा. तुमच्या कौटुंबिक आयुष्यात होणारे बदल स्वीकारा. वैवाहिक जीवन आज आनंदी असेल आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून भेटवस्तू मिळू शकते. प्रेमसंबंधात आज तुमचे जोडीदारासोबत वाद होऊ शकतात. एकमेकांना कमी लेखणे किंवा हिणवणे यामुळे वाद होऊ शकतात. तरुणांनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे.  (Horoscope 15 March)

मकर राशी –

मकर राशीच्या लोकांना आज व्यवसायात आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. एखादे नवीन काम सुरू करण्याची शक्यता आहे. आज तुमच्यासाठी शुभ वेळ सकाळी सकाळी ८:१५ ते १०:१५ पर्यंत असेल. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराला वेळ द्यायला हवा. जोडीदारासाठी वेळ काढा. अन्यथा नात्यात दुरावा निर्माण होईल.  कामाच्या ठिकाणी तुम्ही यशस्वी व्हाल. आज तुमचे कौटुंबिक वाद होऊ शकतात. तुम्ही तुमच्या स्वभावात बदल करण्याची गरज आहे. विद्यार्थी आज चिंताग्रस्त असू शकतात.  (Horoscope 15 March)

कुंभ राशी –

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा कसोटीचा असेल. व्यावसायिकांना आज व्यवसायात अनेक चढ-उतार येऊ शकतात. त्यामुळे आजचा दिवस अडचणींनी भरलेला असेल. तसेच तुमच्या अडचणींचा फायदा तुमचे विरोधक घेऊ शकतात. त्यामुळे विरोधकांपासून सावध राहा. आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांची मदत होईल. कामाचा ताण कुटुंबावर निघणार नाही. याची काळजी घ्या. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा. जोडीदारासोबत काही वादविवाद होण्याची शक्यता आहे. आरोग्याबाबत बोलायचे झाले तर, पचनसंस्था आणि डोकेदुखीची समस्या असू शकते.

मीन राशी –

मीन राशीच्या लोकांना बुधादित्य आणि विषकुंभ योग तयार झाल्यामुळे व्यवसायात आर्थिक लाभ होऊ शकतात. तुम्ही गुंतवणूक केलेले भांडवल योग्य प्रकारे खर्च केल्यास भविष्यात तुम्हाला त्याचे चांगले परिणाम मिळतील. व्यवसाय करणाऱ्या महिलांना घर आणि व्यवसायाचे काम वाढल्यामुळे तणाव जाणवू शकतो. नोकरदार वर्गाच्या लोकांना कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य मिळेल. तसेच तुमच्या कामाशी संबंधित समस्यांचे निराकरण होईल.

कार्यालयीन निर्णय घेताना दबावाखाली कोणताही निर्णय घेऊ नका. विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी आणखी परिश्रम घ्यावे लागतील. तुमचे काही कौटुंबिक मतभेद असतील. तर ते आज मिटतील. प्रेमसंबंध किंवा वैवाहिक जीवनात आज वाद होऊ शकतात. ज्यामुळे नात्यात दुरावा येऊ शकतो. (Horoscope 15 March)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!