Petrol Diesel Prices | पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात; आजपासून असे असतील नवे दर

0
4
Petrol Diesel Prices
Petrol Diesel Prices

Petrol Diesel Prices | देशात आगामी लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले असून, आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. विरोधकांकडून नेहमीच देशातील महागाईचा मुद्दा उचलून धरला जातो. दरम्यान, यावर मोदी सरकारने निर्णय घेण्यात आला असून, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात केली आहे. जागतिक महिला दिनाच्या दिवशी म्हणेच ८ मार्चला सिलेंडरच्या दरांत कपात करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली होती. (Petrol Diesel Prices)

त्यानंतर आता पेट्रोल आणि डिझेलच्याही किंमतीत कपात करण्याचे जाहीर केले आहे. तर, काल पेट्रोल आणि डिझेलच्या प्रति लिटरमागे दोन रुपयांची कपात करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल हे १०० पार होते. त्यामुळे हा सामान्य नागरिक, वाहतूकदार आणि व्यावसायिकांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय मानला जात आहे. तरी आज सकाळी सहा वाजल्यापासून पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर हे देशात लागू होणार आहेत.(Petrol Diesel Prices)

Petrol-Diesel Rate | पेट्रोल आणि डिझेल होणार स्वस्त? नागरीकांना मिळणार दिलासा

सरकारला टीकेचे धनी व्हावे लागले

याबाबतची घोषणा केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी एक्सवरुन केली. ते म्हणाले की,”पेट्रोल व डिझेलच्या दरात प्रति लिटरमागे दोन रुपयांची कपात करुन देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा सिद्ध केले आहे की, कोट्यवधी भारतीयांच्या आपल्या कुटुंबाची सुविधा व त्यांचे हित जपणे हेच त्यांचे प्रमुख लक्ष्य आहे. मागील काही वर्षांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रचंड वाढ झाल्यामुळे केंद्र सरकारला विरोधकांच्या टीकेचे धनी व्हावे लागले. पेट्रोल आणि डिझेलच्या दराने शंभरी ओलांडल्याने याबाबत बरीच चर्चा झाली. यावरुन विरोधकांनी मोदी सरकारला अनेकदा लक्ष्य केले. मात्र, आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत  थेट २ रुपयांची कपात करुन मास्टरस्ट्रोक मारला आहे”.(Petrol Diesel Prices)

पेट्रोल आणि डिझेल ही सामान्य नागरिकांच्या जीवनावश्यक गोष्टींपैकी एक आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्यास किंवा घट झाल्यास सामान्य नागरिकांमध्ये त्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटतात. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्यादृष्टीने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात २ रुपयांची कपात करण्याचा निर्णय मोदी सरकारसाठी सकारात्मक वातावरण निर्माण करु शकतो. (Petrol Diesel Prices)

Petrol Shortage | अखेर संप मागे; मात्र दोन दिवसांत राज्याला ५०० कोटींचा फटका

Petrol Diesel Prices | असे आहेत नवे पेट्रोल दर – 

मुंबई – (आधीचे दर – १०६.३१ रुपये) – (नवे दर – १०४.२ रुपये)

कोलकाता – (आधीचे दर – १०६.३१ रुपये) –  (नवे दर – १०३.९४ रुपये)

चेन्नई – (आधीचे दर – १००.७५ रुपये) – (नवे दर – १०२.६३ रुपये)

नवी दिल्ली – (आधीचे दर – ९४.७२ रुपये) – (नवे दर – ९६.७२ रुपये) (Petrol Diesel Prices)

असे आहेत नवे डिझेल दर – 

मुंबई – (आधीचे दर – ९४.२७ रुपये) – (नवे दर – ९२.१५ रुपये)

कोलकाता – (आधीचे दर – ९२.७६ रुपये) – (नवे दर – ९०.७६ रुपये)

चेन्नई – (आधीचे दर – ९४.२४ रुपये) – (नवे दर – ९२.३४ रुपये)

नवी दिल्ली – (आधीचे दर – ८३.६२ रुपये) – (नवे दर -८९.६२ रुपये) (Petrol Diesel Prices)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here