Petrol-Diesel Rate | पेट्रोल आणि डिझेल होणार स्वस्त? नागरीकांना मिळणार दिलासा

0
3
Petrol-Diesel Rate
Petrol-Diesel Rate

Petrol-Diesel Rate | गेल्या काही दिवसांपुर्वी देशभर ट्रॅंकर चालकांनी पुकारलेल्या संपामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या पुरवठ्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याचं दिसून आलं. याकाळात प्रेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रेट्रोल पंपावर गर्दी केल्याचं चित्र होतं. यातच सध्या प्रेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे हैराण झालेल्या नागरिकांसाठी एक मोठी अपडेट समोर येत आहे.

Sex Tips | सेक्स करताना चुकूनही करू नका ‘या’ गोष्टी

प्रेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबाबत नागरिकांना एक मोठा दिलासा मिळण्याची चर्चा सध्या देशभर रंगत आहे. दरम्यान, यामागील नेमकं कारण काय? तर यामागील कारण म्हणजे सरकारी तेल कंपन्यांना २०२३ मधील ऑक्‍टोबर-डिसेंबर महिन्यात बंपर नफा मिळण्याची अपेक्षा असून अशा स्थितीत तेल कंपन्या तेल कपातीच्या रूपाने आपल्या नफ्यातील काही हिस्सा सर्वसामान्य नागरिकांना देण्याची शक्यता आहे. याच कारणामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर हे 10 रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता आहे.

Petrol-Diesel Rate | सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर कपातीचा निर्णय घेतला तर

आता या निर्णयाचे अनेक पडसाद उमटण्याची शक्यता असून या सरकारी तेल कंपन्यांनी जर पेट्रोल आणि डिझेलचे दर कपातीचा निर्णय घेतला तर यामुळे देशातील महागाई कमी होण्यास मदत होऊ शकते. तसेच यामुळे सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी सरकारला त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होण्याची शक्यता आहे.

मागील वर्षातील ऑक्‍टोबर-डिसेंबर या तीन महिन्यात देशातील ऑइल मार्केटिंग कंपन्यांना 75 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त निव्वळ नफा कमावण्याची अपेक्षा असून कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये झालेली घट हे या होऊ शकणाऱ्या नफ्याचे कारण आहे. त्यामुळे सध्या देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये 5 ते 10 रुपयांनी कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Marathi News | विष्णू शेवाळे अतुल्य सेवा सन्मान पुरस्काराने सन्मानित

Petrol-Diesel Rate | सरकारसाठी हा निर्णय जमेची बाजू

हे वर्ष भारतासाठी अतिशय महत्त्वाचं वर्ष मानलं जात असून यंदाच्या वर्षी देशात निवडणुकांची धूम असणार आहे. यातच सरकारसाठी हा निर्णय जमेची बाजू ठरू शकतो. दरम्यान, देशातील हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड 27 जानेवारी रोजी तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करणार असून उर्वरित दोन सरकारी तेल विपणन कंपन्या म्हणजे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन तसेच भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडही त्याच वेळी निकाल जाहीर करणार आहेत.

अशा स्थितीत प्रेट्रोल आणि डिझेलच्या दर कपातीचा निर्णय घेण्यासाठी सरकारी तेल कंपन्यांना थोडा वेळ लागू शकतो तसेच ही दर कपात येत्या फेब्रुवारी महिन्यातच जाहीर करण्याची शक्यता आहे. (आज तक ब्युरो)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here