Skip to content

Marathi News | विष्णू शेवाळे अतुल्य सेवा सन्मान पुरस्काराने सन्मानित

Marathi News

Marathi News | सोमनाथ जगताप – देवळा | देवळा येथील संघर्ष समाज विकास मंडळाचे अध्यक्ष आणि महिला विकास मंडळाचे सचिव तसेच राज्य महिला आयोगाचे जिल्हा समन्वयक विष्णू शेवाळे यांना पुणे येथील महाएनजीओ फेडरेशनच्या वतीने अतुल्य सेवा सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Deola Bank | ‘देमको’ बँकेचा उद्या वर्धापन दिन; विशेष सोहळ्याचं आयोजन

धुळे येथे इंडीयन रेडक्रास हॉल येथे पार पडलेल्या या पुरस्कार सोहळ्याप्रसंगी एनजीओ फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर मुंदडा, धुळे येथील सप्तशृंगी बहुउद्देशीय महिला संस्थेच्या अध्यक्षा मीना भोसले, जोशोबा सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे अध्यक्ष दिलीप माळी उपस्थित होते.

Nashik | नाशिकमध्ये पुन्हा ड्रग्ज माफियांचा सुळसुळाट

Marathi News | शेवाळे यांचे अनेक मान्यवरांनी कौतुक करत अभिनंदनही केले

यावेळी शेवाळे यांचे अनेक मान्यवरांनी कौतुक करत अभिनंदनही केले. यावेळी आमदार डॉ. राहुल आहेर, भाजपचे जिल्हा नेते केदा आहेर, बाजार समितीचे सभापती योगेश आहेर, संचालक भाउसाहेब पगार, मविप्र संचालक विजय पगार, शेतकरी संघाचे चेअरमन कैलास देवरे, नगरसेवक जितेंद्र आहेर, भाजप तालुका अध्यक्ष अतुल पवार, संभाजी आहेर, नगरसेवक संतोष शिंदे, सचिन सूर्यवंशी, गोविंद पगार, पत्रकार सोमनाथ जगताप, नितीन शेवाळकर, मोठाभाऊ पगार, विनोद देवरे आदींनी राज्य महिला आयोगाचे जिल्हा समन्वयक विष्णू शेवाळे यांचे अभिनंदन केले आहे .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!