Deola Bank | ‘देमको’ बँकेचा उद्या वर्धापन दिन; विशेष सोहळ्याचं आयोजन

0
17
Deola Bank
Deola Bank

Deola Bank | सोमनाथ जगताप – देवळा | देवळा मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकच्या ‘६३’ व्या वर्धापन दिनानिमीत्त उद्या शुक्रवार रोजी दुपारी ४ वाजता बँकच्या सर्व सभासदांना भेट वस्तु वाटप सोहळा आयोजित करण्यात आल्याची माहिती चेअरमन कोमल कोठावदे, व्हा. चेअरमन डॉ. प्रशांत निकम यांनी दिली.

Deola Bank
Deola Bank

 

Deola Bank | हे मान्यवर असणार उपस्थित

या कार्यक्रमाल उद्घाटक म्हणून राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजय सूर्यवंशी, अध्यक्षस्थानी आ. डॉ. श्री. राहुल आहेर, तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष केदा आहेर, सुनील नेरकर (प्रदेशाध्यक्ष:अ. भा. वाणी समाज प्रबोधन संस्था.), सौ. भाग्यश्री पवार (नगराध्यक्षाः देवळा नगरपंचायत), विश्वास ठाकूर (मा.अध्यक्ष: महाराष्ट्र राजू बँक्स असोसिएशन लि. मुंबई), अजय ब्रम्हेचा (मा.अध्यक्ष: महाराष्ट्र राज्य बँक फेडरेशन, मुंबई), फयाज मुलाणी (जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक), सहायक निबंधक अनिल देवकर हे उपस्थित राहणार आहेत.

Ayodhya Ram Mandir | श्रीरामाच्या जयघोषात नाशिकहून साधू-महंत अयोध्येकडे रवाना

याप्रसंगी सर्व ठेवीदार, ग्राहक आणि सभासदांनी तीर्थ प्रसादास तसेच कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन जनसंपर्क संचालक योगेश वाघमारे, संचालक सर्वश्री जयप्रकाश कोठावदे, राजेंद्र सूर्यवंशी, अनिल धामणे, केदारनाथ मेतकर, भगवान बागड, योगेश राणे, प्रशांत मुसळे, मनीषा शिनकर, सचिन कोठावदे, हेमंत अहिरराव, अमोल सोनवणे, श्रीमती नलिनी मेतकर, अनिल धामणे, प्रमोद शेवाळकर, सुभाष चंदन, मयूर मेतकर, भारत कोठावदे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील भालेराव, व्यवस्थापक नितीन बोरसे आणि कर्मचाऱ्यांनी केलेले आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here