Skip to content

Spiritual News | देवळा ग्रामदैवत दुर्गामाता मंदिरात उद्यापासून शाकंभरी पौर्णिमा उत्सव

Spiritual News

Spiritual News | सोमनाथ जगताप – देवळा : देवळा येथील ग्रामदैवत दुर्गामाता मंदिरात उद्या शुक्रवार ते २५ जानेवारी २०२४ दरम्यान शाकंभरी पौर्णिमा उत्सव होणार आहे. आठ दिवस चालणारया या उत्सवात त्र्यंबकेश्वरचे भाऊ पाटील रोज सायंकाळी साडे सात ते दहा या वेळेत मराठीतून श्रीराम चरित्र चिंतन करणार आहेत.

Petrol-Diesel Rate | पेट्रोल आणि डिझेल होणार स्वस्त? नागरीकांना मिळणार दिलासा
जनार्दन स्वामींचे शिष्य गुरुमाऊली महाराज यांच्या कृपाशीर्वादाने दरवर्षी हा महोत्सव येथे होत असतो. मधील दोन वर्षे कोरोना रोगाच्या साथीमुळे मोजक्या स्वरूपात हा उत्सव साजरा करावा लागला होता. यावर्षी मात्र सदर उत्सवाची पूर्वतयारी जोरात सुरू झाली आहे. दुर्गामाता मंदिरावर आकर्षक रोषणाई व सजावट करण्याच्या कामाला सुरुवात झाली असून मंदिराच्या आवारात मंडप टाकण्याचे काम सुरू झाले आहे.

Spiritual News | उत्सवाची सुरुवात शोभायात्रेने होणार

या उत्सवाची सुरुवात शोभायात्रेने होणार असून रोज सायंकाळी श्रीराम चरित्र चिंतन सांगितले जाणार आहे. दरम्यान, काही धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून शेवटच्या दिवशी दुपारी दोन ते पाच या वेळेत नवचंडीयाग होणार असून नंतर महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे.

Deola Bank | ‘देमको’ बँकेचा उद्या वर्धापन दिन; विशेष सोहळ्याचं आयोजन

या महाप्रसादाचे वैशिष्ट म्हणजे १११ किंवा त्यापेक्षा जास्त पालेभाज्या, फुलभाज्या, फळभाज्या, शेंगभाज्या, कंदमुळे अशा भाज्या एकत्र करून त्यांची भाजी बनवून सोबत भाकरीचा महाप्रसाद दिला जातो. यावर्षी १११ पेक्षा जास्त भाज्यांचा अंतर्भाव यात करण्याचे उद्दिष्ट आहे. उत्सवाचे पौरोहित्य राहुल वाघमारे करणार आहेत. या सात दिवस चालणाऱ्या शाकंबरी उत्सवाचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सत्संग सेवा समिती व देवळा ग्रामस्थ यांच्यातर्फे करण्यात आले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!