Skip to content

Avishkar Bhuse | आता नाही होऊ शकले तरी, भविष्यात ‘भाईजी’च खासदार

Avishkar Bhuse

Avishkar Bhuse |  धुळे लोकसभा मतदार संघातून भाजपने पुन्हा एकदा डॉ. सुभाष भामरे यांना संधी दिली आहे. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून या जागेसाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे हे आग्रही असून, त्यांचे चिरंजीव अविष्कार भुसे हे धुळे लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवतील, अशी चर्चा होती. धुळ्यात ‘भावी खासदार’ असा उल्लेख असलेले बॅनर तर सोशल मिडियावर त्यांच्या अनेक पोस्टही झळकल्या होत्या.(Avishkar Bhuse)

अविष्कार भुसे यांनाच उमेदवारी देण्यात यावी यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी मागणीही केली होती. एवढेच नाहीतर, मतदार संघातील मतदारांच्या पोलमध्येही अविष्कार भुसे यांच्याच बाजूने मतदारांनी कौल दिला होता. मात्र, प्रत्यक्षात या जागेवर मंत्री दादाजी भुसे किंवा अविष्कार भुसे यांनी कधीही दावा केला नव्हता. आज राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात दादा भुसे यांच्या शब्दाला वजन आहे. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्रीही त्यांचा आदर करतात. कदाचित त्यांनी त्यांची राजकीय ताकद लावली असती तर आज धुळे लोकसभेचे उमेदवार अविष्कार असते.

मात्र स्वतः दादा भुसे यांचा घराणेशाहीला विरोध असून, आपल्या मुलालाच उमेदवारी देण्यात यावी. यासाठी ते कधीही आग्रही नव्हते. अविष्कार भुसे यांची लोकप्रियता पाहता ते जनतेच्या मनातील खासदार असून, त्यांच्यावरील प्रेमापोटी मतदारांनीच त्यांच्या उमेदवारीची मागणी केली होती. फक्त आश्वासनांना वैतागलेल्या मतदारांनी अविष्कार भुसे यांनीच दिल्लीत धुळ्याच्या जनतेचे नेतृत्व करावे ही इच्छा व्यक्त केली होती. (Avishkar Bhuse)

Avishkar Bhuse | कार्यकर्ते भावनिक भाईजी लोकसभा लढवाच

लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनाच ‘भाईजी’ परिचित 

मात्र, ही जागा भाजपकडे असल्यामुळे याठिकाणी पुन्हा एकदा भाजपच्या उमेदवाराला संधी देण्यात आली. अविष्कार भुसे हे एक उभरते नेतृत्व असून, कमी वयातच त्यांनी मतदार संघात मोठा जनसंपर्क तयार केला. ते सध्या युवासेना उत्तर महाराष्ट्र सचिव या पदावर कार्यरत असून, त्यांच्या आविष्कार भुसे फाउंडेशनच्या माध्यमातून ते जनतेचे प्रश्न सोडवत असतात.(Avishkar Bhuse)

त्यांच्या कार्यामुळे आणि त्यांच्या नम्र स्वभावामुळे ते मतदार संघाच्या तळागाळापर्यंत पोहोचले असून, येथील लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनाच ‘भाईजी’ परिचित आहेत. इतका दांडगा त्यांचा जनसंपर्क आहे. अगदी २४ तास जनतेला सहजपणे उपलब्ध असणे किंवा त्यांच्या छोट्यात छोट्या समस्या सोडवणे असेल. लोक भाईजींना हक्काने आवाज देतात आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी भाईजी हे सगळ्यात पुढे असतात. त्यामुळे आपल्या हक्काच्या भाईजींनाच महायुतीचे उमेदवार म्हणून तिकीट मिळावे अशी मतदारांची मागणी होती.(Avishkar Bhuse)

Dhule Loksabha | धुळे लोकसभेतील इच्छुकांच्या गर्दीत अविष्कार भुसे ठरताय लोकप्रिय…

Avishkar Bhuse | आम्ही जीवाचे रान करू… 

अविष्कार भुसे यांना तिकीट न मिळाल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते आणि मतदार संघातील तरुण भावनिक झाले असून, तरूणांकडून त्यांना अपक्ष निवडणूक लढवण्याची मागणी करण्यात येत आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांनी  पत्राद्वारे त्यांना अपक्ष निवडणूक लढवण्याची मागणी केली आहे. तुम्ही अपक्ष निवडणूक लढवा. तुम्हाला निवडून आणण्यासाठी आम्ही जीवाचे रान करू असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे. (Avishkar Bhuse)

एक सर्वगुण संपन्न नेतृत्व

अविष्कार भुसे यांची मतदार संघातील लोकप्रियता, त्यांची काम करण्याची धडाडी, त्यांचा नम्र स्वभाव, तळागाळापर्यंत पोहोचलेले त्यांच्या कार्यकर्त्यांचे जाळे, त्यांची रोखठोक कार्यशैली, कमी वयात स्वतःची तयार केलेली ओळख आणि एक तरुण व उभरते नेतृत्व, या सर्व बाबी पाहता अविष्कार भुसे हे या जागेसाठी एक सर्वगुण संपन्न नेतृत्व होते. त्यामुळे जर ही जागा शिवसेनेकडे असती किंबहुना अविष्कार भुसे यांना उमेदवारी मिळाली असती तर या मतदार संघाचे खासदार हे अविष्कार भुसेच असते यात शंका नाही. मात्र, यावेळी जरी त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही तरी नक्कीच ते भविष्यातील एक उभरते तरुण आणि तडफदार नेतृत्व असतील. (Avishkar Bhuse)

Dhule Loksabha | जनतेच ठरल…!, मालेगावचे ‘भाईजी’ दिल्लीत पाठवणार.!


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!