Horoscope 30 March | राजकीय व्यक्तींसाठी आजचा दिवस कसा..?; वाचा आजचे राशिभविष्य

0
2
Horoscope 9 May 2024
Horoscope 9 May 2024

Horoscope 30 March | आपल्या दैनंदिन जीवनात अनेक गोष्टी घडत असतात. ज्योतिष शास्त्रानुसार, आपल्या आयुष्यात घडणाऱ्या शुभ किंवा अशुभ गोष्टी या आपल्या ग्रहांच्या प्रभावामुळे घडतात. तर, राशिभविष्य म्हणजे याच ग्रहांच्या हालचाली लक्षात घेऊन पंचांगाच्या आधारे केलेले भाकीत असते.

आज रात्री ०९ वाजून १४ मिनिटांपर्यंत पंचमी तिथी राहील व त्यानंतर षष्ठी तिथी सुरू होईल. आज वाशी योग, आनंदादि योग, सुनाफ योग, व सिद्धी योग यांचे काही राशींना सहकार्य लाभेल. आज कुठलेही शुभ कार्य करण्यासाठी दोन शुभ मुहूर्त आहेत. दुपारी १२ वाजून १५ मिनिटे ते १ वाजून ३० मिनिटे आणि दुपारी दोन वाजून ३० मिनिटे ते ३ वाजून ३० मिनिटांपर्यंत अभिजीत मुहूर्त आहे. तर आज सकाळी ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटांपर्यंत राहुकाळ असेल. जाणून घेऊयात आज ३० मार्च शनिवारचा दिवस हा सर्व १२ राशींसाठी कसा असेल..?(Horoscope 30 March)

Horoscope 30 March | मेष राशी –

आज चंद्र आठव्या भावात असल्यामुळे या राशीच्या लोकांचे काही व्यक्तींसोबत मतभेद होऊ शकतात. नोकरदार वर्गाला कामाच्या ठिकाणी कामाचा तणाव असेल. पण आज काम करताना विशेष काळजी घ्या. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस सामान्य असेल. आज तुम्हाला व्यवसायात विशेष लाभ किंवा तोटा होणार नाही. फक्त तुम्ही तुमचे काम प्रामाणिकपणे करत राहा. तरुणांनी कुठल्याही वादापासून दूर रहा. नोकरदार महिलांनी कामातून थोडा वेळ काढून मुलांची काळजी घ्यावी. त्यांच्या आरोग्याबाबत समस्या उद्भवू शकतात. आरोग्याबाबत बोलायचे झाले तर, आज अचानक तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरोग्याची विशेष काळजी घ्या. (Horoscope 30 March)

वृषभ राशी –

चंद्र आज सातव्या भावात राहील. ज्यामुळे व्यवसायिकांना आज व्यवसायात फायदा होईल. तसेच आज सिद्धी योग तयार झाल्यामुळे, नोकरदार वर्गासाठी आजपासून काळ बदलण्यास सुरुवात होईल. जे लोक नवीन नोकरीच्या शोधत असतील. त्यांना नक्कीच मनासारखी नोकरी मिळेल. मालमत्ता खरेदीचा किंवा गुंतवणूक करण्याचा विचार करू शकतात. मालमत्तेतून किंवा गुंतवणुकीतून त्यांना अपेक्षित नफा मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांची त्यांच्या व्यवसायातही प्रगती होऊ शकते. महिलांनी घरातील काही वस्तूंचे स्थान बदलावे. आरोग्याबाबत बोलायचे झाले तर, आजारांबाबत परिस्थिती अनुकूल असल्याने घाबरण्याचे कारण नाही.

Horoscope 15 March | ‘या’ लोकांवर असेल लक्ष्मीची कृपा; वाचा आजचे राशिभविष्य

मिथुन राशी –

चंद्र सहाव्या भावात असेल. ज्यामुळे शत्रूंपासून सावध असाल. नोकरदार वर्गाला आज कामाच्या ठिकाणी सर्व कामे व्यवस्थित पूर्ण करावी लागतील. तसेच त्यांची आपल्या नोकरीत प्रगती होऊ शकते. व्यवसायिकांना त्यांची व्यवसायातील काही समस्यांचे निराकरण करण्यात यश मिळेल. त्यानंतर व्यवसायात आणखी प्रगती होईल. तसेच आज सिद्धी योग असल्यामुळे व्यवसायात प्रगती होईल. तरुणांनी प्रेम असो किंवा करियर सगळीकडे प्रामाणिक प्रयत्न करा. इच्छा पूर्ण होतील. (Horoscope 30 March)

कर्क राशी –

चंद्र आज पाचव्या भावात असल्याने विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस शुभ असेल. नोकरदार वर्गाने कामाच्या ठिकाणी दिलेली जबाबदारी योग्यरित्या पूर्ण करा. व्यवसायिकांनी व्यवसायासाठी कोणत्याही प्रकारचे कर्ज घेतले असेल, तर त्याची लवकरात लवकर परतफेड करण्याचा प्रयत्न करा. व्यावसायिकांसाठी ही वेळ गुंतवणूक करण्यासाठी योग्य आहे. आज तुम्ही उत्साही असा. त्यामुळे तुमच्या महत्त्वाच्या कामात विलंब होणार नाही. आरोग्याबाबत बोलायचे झाले तर, हलके अन्न खा व द्रवपदार्थांचे सेवन करा. आज तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो.

सिंह राशी –

चंद्र चौथ्या भावात असेल. त्यामुळे कौटुंबिक समस्या जाणवतील. नोकरदार वर्गाला आज काही नवीन जबाबदाऱ्याही दिल्या जातील. पण कामात निष्काळजीपणा टाळावा. नाहीतर नोकरी धोक्यातही येऊ शकते. आज कुठलेही मोठे काम हाती घेण्याआधी तुमचा आत्मविश्वास वाढेल. विद्यार्थ्यांना आज काही समस्या जाणवत असतील. तर त्यांनी भगवंताचे नामस्मरण करावे. आज काही नकारात्मक ग्रह हे तुमच्या नात्यांमध्ये मतभेद निर्माण करू शकतात. परंतु आपला समजूतदारपणा दाखवून वादविवादाची स्थिती निर्माण होऊ देऊ नका. आर्थिक नियोजन करा. आरोग्याबाबत बोलायचे झाले तर, आरोग्याबाबत बेफिकीर राहू नका. अचानक तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. (Horoscope 30 March)

कन्या राशी –

चंद्र तिसऱ्या भावात असेल. ज्यामुळे तुमच्या मित्र आणि नातेवाईकांना मदत होईल. नोकरदार वर्गाने कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी वाद टाळावा. अन्यथा याचा तुमच्या करिअरवरही परिणाम होऊ शकतो. नोकरीत चांगला लाभ होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांची त्यांच्या व्यवसायात चांगली प्रगती होईल. पण कुठलाही निर्णय घेताना भावनिक होऊन घेऊ नका. व्यावसायिकांना उत्पन्नासोबतच खर्चाचे मार्गही निर्माण होत आहेत. राजकारणाशी संबंधित लोकांना आज अनेकांना मदत करण्याची संधी मिळेल. ज्यामुळे तुमची राजकीय प्रतिष्ठा वाढेल. तुम्हाला तुमच्या खर्चात कपात करावी लागेल. अन्यथा आर्थिक संकट निर्माण होईल. कुटुंबातील सदस्य हे आज तुम्हाला तुमच्या समस्या सोडवण्यासाठी मदत करतील.

Horoscope 28 February | ‘या’ लोकांनी बोलण्यावर नियंत्रण ठेवावे; वाचा आजचे राशिभविष्य

तुळ राशी –

चंद्र दुसऱ्या भावात असेल. जो आर्थिक गुंतवणुकीतून लाभ मिळवून देईल. नोकरदार वर्गाला पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. तरुण वर्ग जर नवीन नोकरीच्या शोधात असाल. तर प्रयत्न सुरू ठेवा. तुम्हाला यश नक्की मिळेल. व्यावसायिकांना व्यवसायाच्या काही कायदेशीर बाबींना सामोरे जावे लागेल. मात्र, कुठल्याही प्रकारचे कर्ज घेणे टाळावे. कारण आता कर्ज घेतल्यामुळे भविष्यात समस्या वाढतील. व्यवसायासाठी आजचा दिवस हा अनुकूल आहे. तुमच्या वडिलांचे सल्ले मनावर घ्या आणि ते अंमलात आणण्याचा प्रयत्न करा. तरुणांनी काही धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करावा. आरोग्याबाबत बोलायचे झाले तर, धुळीच्या ठिकाणी जाणे टाळा. बाहेर जायचे असल्यास मास्क लावा. अन्यथा ॲलर्जीचा त्रास होऊ शकतो.(Horoscope 30 March)

वृश्चिक राशी –

चंद्र आज तुमच्या राशीत असेल. ज्यामुळे तुमचा प्रत्येक ठिकाणी आत्मविश्वास वाढेल. नोकरदार वर्गाने कामाच्या ठिकाणी कामावर लक्ष केंद्रित करावे आणि आपले काम वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. तसेच सिद्धी योग तयार झाल्यामुळे व्यावसायिक त्यांच्या व्यवसायासाठी पैसे गुंतवण्याची योजना करू शकता. यामुळे व्यवसायात प्रगती होऊ शकते. तरुणांचे मन विचलित होऊ शकते. त्यामुळे तुमचा अधिक वेळ हा महत्त्वाच्या कामात घालवा. आरोग्याबाबत बोलायचे झाले तर, तुम्ही आरोग्याबाबत सतर्क राहा. तोंड आणि घशाशी संबंधित काही समस्या जनवू शकतात.

धनु राशी –

चंद्र बाराव्या भावात असेल. ज्यामुळे काही नवीन व्यक्तींमुळे तुमचे नुकसान होईल. नोकरदार वर्गाने त्यांची प्रलंबित कार्यालयीन कामे आधी पूर्ण करा. अन्यथा, त्यामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकतात. मार्केटिंग क्षेत्रात नोकरी करणाऱ्यांना त्याचे ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. कौटुंबिक जीवनात शांतता असेल. तरीही काही तणावाची शक्यता राहील. आरोग्याबाबत बोलायचे झाले तर, तरुणांनी आरोग्याबाबत बेफिकीर नसावे. तुम्हाला तोंड व घशाशी संबंधित काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते.(Horoscope 30 March)

मकर राशी –

चंद्र आज अकराव्या भावात असेल. त्यामुळे तुम्हाला तुमच्या मोठ्या भाऊ किंवा बहिणीकडून चांगली बातमी मिळेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला बॉसकडून प्रशंसा मिळेल. नोकरदार वर्गाच्या लोकांच्या प्रलंबित समस्यांचे निराकरण होईल. व्यावसायिकांना चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला कोणतेही शुभ कार्य करायचे असेल तर ते आजच्या शुभ काळातच करा. आर्थिक मदतीची गरज असल्यास बाहेरच्यांना विचारण्यापेक्षा घरातल्या व्यक्तींसोबत बोला. कारण त्यांच्याकडून तुम्हाला आर्थिक मदत होण्याची शक्यता आहे. तरुणांना नात्यांचे महत्त्व समजून त्यांचा आदर  करावा लागेल. अन्यथा आज कुटुंबात तणाव असू शकतो. आरोग्याबाबत बोलायचे झाले तर, आवश्यकता नसल्यास कोणत्याही प्रकारचा प्रवास टाळा. लांबच्या प्रवासामुळे आजार उद्भवू शकतात.(Horoscope 30 March)

कुंभ राशी –

चंद्र दहाव्या भावात असल्यामुळे नोकरदार वर्गाला नोकरीत अडचणी येऊ शकतात. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांना मदत करा. नोकरी व व्यवसायात ग्रह तुम्हाला साथ देतील. कामाच्या ठिकाणी काही चुकीच्या घडलेल्या घटनांमुळे तुम्ही चिंताग्रस्त असाल. ग्रहांच्या प्रभावामुळे आर्थिक स्थितीतही सुधारणा होऊ शकते. कुठून तरी आर्थिक लाभ होईल. व्यवसायाची जाहिरातीशी संबंधित कामे करा. जाहिरातीशिवाय व्यवसाय वाढवणे हे शक्य नाही. तुमच्या घरातील व्यक्तींप्रतिही काही जबाबदाऱ्या आहेत. त्यामुळे त्यांच्याकडेही लक्ष द्या. त्यांना चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न करा. आरोग्याबाबत बोलायचे झाले तर, रक्तदाबाचा त्रास असलेल्या रुग्णाने आरोग्याबाबत सावध असावे.(Horoscope 30 March)

मीन राशी –

चंद्र नवव्या भावात असल्यामुळे शुभ कार्य होतील. नोकरदार वर्गाने महत्त्वाच्या कामांना प्रधानी देऊन ती कामे आधी मार्गी लावावी. वरिष्ठ आज तुमच्या कामावर खुश असतील. आज तुम्हाला आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे. व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायात यश मिळेल. कोणत्याही मोठ्या समस्या उद्भवणार नाही. कारण तुमचे नशीब आज तुमच्या बाजूने असेल. तुम्ही नेहमी सकारात्मक दृष्टिकोन बाळगायला हवा. अविवाहित लोकांसाठी चांगले स्थळ येऊ शकतात. राजकीय क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना आज समाजात सन्मान मिळेल. सामाजिक कार्यातील तुमचा सक्रिय सहभाग आज तुमची प्रतिष्ठा वाढवेल. आरोग्याबाबत बोलायचे झाले तर, इलेक्ट्रिकल काम करताना काळजी घ्या.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here