Sachin Mete Passed Away| दिवंगत नेते विनायक मेटेंच्या पुतण्याची आत्महत्या; वयाच्या ३४ व्या वर्षी उचललं टोकाचं पाऊल…

0
1

Beed Latest News|  शिवसंग्राम पक्षाचे नेते व दिवंगत आमदार विनायक मेटे यांच्या पुतण्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. सचिन मेटे असे त्यांच्या पुतण्याचे नाव असून बीडच्या राजेगाव परिसरात त्यांनी गळफास घेत आपले जीवन संपवले आहे. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समोर आले नसून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

दिवंगत लोकनेते विनायक मेटे यांच्या ३४ वर्षीय पुतण्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे. सचिन मेटे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून बीडच्या राजेगाव परिसरात त्याने गळफास लावत आपले जीवन संपवले असल्याची प्राथमिक माहिती आहे. आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पण, मानसिक तणावातून सचिनने हे टोकाचं पाऊल उचललं असावं असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. याशिवाय ही आत्महत्या आहे की घातपात?, याचाही तपास बीड पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Nashik News| भारती पवारांना दाखवले काळे झेंडे..? नेमकं प्रकरण काय?

सचिन मेटे हा दिवंगत विनायक मेटे यांचे भाऊ त्र्यंबक मेटे यांचा मुलगा आहे. या संपूर्ण घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. या दुर्देवी घटनेने परिसरासह संपूर्ण बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून आत्महत्येचे नेमके कारण अद्यापही अस्पष्टच आहे. मृतदेहजवळ कुठल्याही प्रकारचा संशयास्पद पुरावा किंवा सुसाइड नोट मिळालेली नाही. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. दरम्यान, मागील वर्षीच शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांचा आपघता दरम्यान मृत्यू झाला होता. १४ ऑगस्ट २०२२ रोजी विनायक मेटे यांच्या गाडीचा मुंबई- पुणे एक्सप्रेसवर भीषण अपघात झाला होता. ज्यामध्ये विनायक मेटे यांचे दुर्देवी निधन झाले होते. वर्षभरातच घडलेल्या आणखी एका प्रसंगाने मेटे कुटुंबावर दुखःचा डोंगर कोसळला आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here