yeola| मराठ्यांच्या नादाला लागणं भुजबळांना पडलं चांगलंच महागात..

0
3

yeola|  मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्याची तसेच मराठ्यांना आरक्षण देण्याची मागणी केली आहे. पण, जरांगे पाटील यांच्या ह्या  मागणीला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी कडाडून विरोध केला आहे. मराठा समाजाला आरक्षण द्यावं, आमचा त्याला विरोध नाहीच. मात्र, ओबीसीमधून त्यांना आरक्षण देण्याला आमचा कायम विरोध राहील, असं छगन भुजबळ हे वारंवार सांगत आहेत. यावरून जरांगे पाटील भुजबळांना प्रत्येक सभेत टार्गेट करत आहेत.

मात्र, भुजबळ यांची ही विधाने त्यांच्या चांगलीच अंगलट आली आहेत. भुजबळांच्या समर्थक असलेल्या मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या विरोधात बंडाचं निशाण फडकवल्याने भुजबळांची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाविरोधात भूमिका घेतल्याने आणि त्याविरुद्ध टीका केल्यामुळे भुजबळांना मोठा धक्का बसला आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर यांनी छगन भुजबळांची साथ सोडली आहे. जयदत्त होळकर हे भुजबळांचे कट्टर  समर्थक आहेत. आणि आता त्यांनीच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भुजबळांची साथ सोडल्याने भुजबळ आता हतबल झाले आहे.

भुजबळ एकटे पडणार… 

जयदत्त होळकर हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रांतिक सरचिटणीस होते. मात्र भुजबलांची साथ सोद्यानंतर त्यांनी या पदाचाही राजीनामा दिला आहे. मराठा आरक्षणाला मंत्री छगन भुजबळ हे विरोध करत असल्याने मी ह्या पदाचा राजीनामा दिला आहे. निफाड तालुका पूर्व ४६ गाव तालुकाध्यक्ष पदाचाही त्यांनी राजीनामा दिला आहे. यापुढे आता फक्त मराठा समाजासाठी काम करण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. आता मी कुठल्याही पक्षाचा नाही तर, माझ्या मराठा समाजाचा झेंडा हाती घेतला आहे, अशी भावना  जेदात्त होळकर यावेळी यांनी व्यक्त केली आहे. भुजबळांचे कट्टर समर्थक असलेल्या मराठा नेत्यांनीच त्यांच्या विरोधात उघड भूमिका घेतली असून, थेट पदांचे राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत लासलगाव आणि ४६ गावांतून मतं गोळा करताना भुजबळ आता एकटे पडणार हे यावरून दिसून येत आहे.

Deola | देवळा शेतकरी संघात पशुखाद्य विक्रीचा शुभारंभ

भुजबळांना चांगलंच महागात पडलं.. 

मराठ्यांच्या नादी लागणं भुजबळांना चांगलंच महागात पडलं असल्याची सर्वत्र चर्चा आहे. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नये, अशी मागणी अनेक नेत्यांनी  केली होती. मराठ्यांचा ओबीसीत समावेश करण्याला विरोध दर्शविला होता. यात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखेपाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांचा समावेश आहे.

मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नसल्याचं अनेकदा स्पष्ट केलं आहे. पण, जरांगे पाटील यांनी आपल्या भाषणातून फक्त भुजबळ आणि वकील गुणरत्न सदावर्ते यांनाच वारंवार टार्गेट केलेलं आहे. त्यामुळे भुजबळ यांच्या विरोधात वादग्रस्त वातावरण निर्माण झाल्यामुळेच पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देण्यास सुरु केल्याबद्दल बोलले जात आहे.

Raj Thackeray| शहरं आहेत की डान्स बार हेच कळत नाही; माझ्या हातात सत्ता आली तर..- राज ठाकरे


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here