Nashik News| नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथे ‘मेरी माटी मेरा देश’ ह्या कार्यक्रमात केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री भारती पवार यांना मराठा समाजाच्यावतीने काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न झाला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, याबाबत केंद्र सरकारची काय भुमिका आहे? असा सवाल यावेळी आंदोलकांनी केला. व्यासपीठावर मंत्री डॉ. भारती पवार बोलत असताना केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी सुरु झाल्याने एकच गोंधळ उडाला होता.
देशभरात केंद्र सरकारच्या माध्यमातून ‘मेरी माटी, मेरा देश’ हा कार्यक्रम राबविला जात आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकमध्येही अमृत कलश यात्रा आयोजित करण्यात येत असून, नांदगाव पंचायत समितीच्या ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अभियानांतर्गत ‘अमृत कलश ‘ यात्रेप्रसंगी केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार ह्या व्यासपीठावरून बोलत असतांना ‘मराठा आरक्षण’ प्रश्नावर आमच्यासोबत बोला असा आग्रह करत ‘एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणा देत आंदोलकांनी मंत्री पवार यांना काळे झेंडे दाखविण्याचा प्रयत्न केला. भिमराज लोखंडे, विशाल वडघुले, परेश राऊत ह्या आंदोलकांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली.पण, तरीही भारती पवार यांनी भाषण सुरूच ठेवले होते. दरम्यान, पोलिसांनी हस्तक्षेप करत ह्या आंदोलकांना ताब्यात घेतले.
yeola| मराठ्यांच्या नादाला लागणं भुजबळांना पडलं चांगलंच महागात..
सैनिकांच्या स्मरणार्थ तसेच देशाच्या एकतेशी संबधित असलेल्या ह्या कार्यक्रमात गोंधळ घालू नका, हे चुकीचं आहे. संविधनिक पद्धतीने तुमचा प्रश्न आम्ही मार्गी लाऊ, असे सांगत गोंधळ घालणाऱ्या आंदोलकांना भारती पवार यांनी व्यासपीठावरूनच सुनावले. यावेळी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. नंतर भारती पवार यांनी आंदोलकांसोबत चर्चा करत ‘तुमच्या भावना मी नक्कीच वरिष्ठांपर्यंत पोहचवेल, असे आश्वासनही दिले. कार्यक्रम संपल्यानंतरही भारती पवार यांची या आंदोलकांनी निवेदन देऊन भेट घेत चर्चा केली. चर्चेसाठी मी केव्हाही तयार असते, मात्र असा गोंधळ घालून काहीही होणार नाही, अशी समज भारती पवार यांनी आंदोलकांना दिली.
नांदगाव मध्ये अमृत कलश यात्रेचे आयोजन
नंदगाव पंचायत समितीच्या वतीने ‘ मेरी माटी मेरा देश ‘ या अभियानांतर्गत अमृत कलश यात्रा काढण्यात आली होती. नांदगाव तालुक्यातील गंगाधरी येथून निघालेल्या या पदयात्रेत केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. भारती पवार यांच्यासह तहसील, पंचायत समिती तसेच इतर शासकीय अधिकारी व कर्मचारी सहभागीदेखील सहभागी झाले होते. उत्साहात निघालेल्या या यात्रेत सहभागी प्रत्येकाने भगवा फेटा परिधान केला होता. सुरुवातीस वारकरी संप्रदायाचे पथक, त्यानंतर व्हीं.जे.हायस्कूलच्या एन.सी.सी.विद्यार्थ्यांचे संचलन, लेझिम पथक आणि त्यानंतर मंत्री भारती पवार यांच्यासह मोठ्या संख्येने अमृत कलश डोक्यावर घेऊन निघालेल्या महिला असा मोठ्या स्वरूपात गंगाधरी ते तहसील कार्यालय प्रांगण ह्या मार्गावरून ही यात्रा काढण्यात आली होती. या यात्रेत दोन बैलगाड्यांचाही समावेश होता. ‘भारत माता की जय’ च्या घोषणा देत ही यात्रा तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आल्यानंतर तालुक्यातील ८८ ग्रामपंचायतींचे कलश व्यासपीठासमोर ठेवण्यात आले.
Nashik | गाडीची टाकी करा फुल्ल..!; 18 जिल्ह्यांत डिझेल, पेट्रोल पुरवठा विस्कळीत
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम