Nashik | मनमाडजवळील नागापूर येथील इंडियन ऑइल कंपनीच्या इंधन साठवणूक प्रकल्पात शुक्रवारी पहाटे जास्त दाबाने इंधन आल्यामुळे डिझेलची पाइपलाइन फुटली आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर गळती सुरू झाल्याने संपुर्ण परिसरात खळबळ उडाली. सुदैवाने या घटनेत जीवितहानी टळली असली तरी मोठ्या प्रमाणावर गळतीमुळे आर्थिक नुकसान झाल्याचे वृत्त समोर आलेलं आहे.
शुक्रवारी पहाटेपासून राज्यांत प्रामुख्याने मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर जिल्ह्यासह एकूण 18 जिल्ह्यात इंडियन ऑइल प्रकल्पांतील टँकरद्वारे वितरित होणाऱ्या डिझेल आणि पेट्रोल वाहतुकीवर तसेच वितरणावर विपरीत परिणाम झालेला आहे. या ठिकाणी बराच काळ संपूर्ण इंधन वितरण ठप्प झाले होते. 48 ते 72 तासात ते टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येईल, असं सूत्रांनी सांगितलेले आहे.
‘तेज’ चक्रीवादळ येतंय…शेतकऱ्यांनो सावधान!
दरम्यान, या संपुर्ण परिसरात सर्वत्र इंधन पसरल्याने पेट्रोल-डिझेलचा वास येतो आहे. तसेच तेथील जमिनीतही इंधन झिरपल्याचे ग्रामस्थांनी सांगितलेले आहे. दरम्यान, या प्रकल्पात अंतर्गत गोपनीयता असल्याने व्यवस्थापनाने अधिकृत माहिती दिलेली नाही.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम