Maratha Reservation| समितीचे “टाइम प्लीज”आणखी २ महिन्यांचा मागितला वेळ; आता मराठा आरक्षण प्रश्न आणखी चिघळणार का..?

0
3
Manoj Jarange
Manoj Jarange

Maratha Reservation| मराठा आरक्षणाचा प्रश्न आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे -पाटील यांनी राज्य सरकारला ४० दिवसांची मुदत दिली होती. ही मुदत संपण्यासाठी आता फक्त तीन दिवस उरले असताना, राज्य शासनाने नियुक्त केलेल्या न्या. संदीप शिंदे समितीने आपला अहवाल देण्यासाठी आणखी दोन महिन्यांची मुदत मागितली आहे. समितीच्या या मागणीमुळे राज्य सरकार आणि जरांगे-पाटील यांच्यातील संघर्ष वाढून मराठा आरक्षणाचा प्रश्‍न आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एकीकडे समितीने मागितलेली मुदतवाढ तसेच दुसरीकडे सरकारला आरक्षणासाठी दिलेल्या मुदतीचे उरलेले तीन दिवस हे पाहता सरकारसमोर आता मोठा पेच निर्माण झाला आहे. सरकार आता नेमके यातून कसा मार्ग काढणार? आणि मराठ्यांचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे-पाटील आता कोणती भूमिका घेणार? हे बघावे लागणार आहे.

मराठा आरक्षण व मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सरकारने स्थापन केलेल्या न्या. संदीप शिंदे समितीने  पुरावे गोळा करण्यासाठी आणखी दोन महिन्यांची मुदत मागितली आहे. तथापि, सरकारने समितीला वेळ देण्याबाबत अद्यापही निर्णय घेतलेला नाही. पण, मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाच्या मागणीवर समिती स्थापन करताना मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याकडून ४० दिवसांची मुदत घेतली आहे. ती मुदत येत्या २४ तारखेला संपणार आहे. पण, ही मुदत संपत असतानाच समितीने “टाइम प्लीज” म्हणत आणखी दोन महिन्यांची मुदत वाढवून मागितली आहे.Maratha Reservation

Saptashrungi Devi Gad| ५० हजार भाविक घेतायेत भगवतीचे दर्शन, सप्तमीनिमित्त भाविकांची संख्या अजून वाढण्याची शक्यता

ते समिती वगैरे आम्हाला माहिती नाही, आरक्षण द्या !

मनोज जरांगे पाटील हे आरक्षणाच्या मुद्द्यावर ठाम आहेत. आरक्षणासाठीची समिती, तिचा अहवाल, आयोग वगैरे हे काही आम्हाला माहित नाही…मराठा समाजाला आरक्षण द्या, ते दिल्याशिवाय आता  एक इंचही मागे हटणार नाही, अशी ठाम त्यांची भूमिका आहे. २४ तारखेपर्यंत शासनाकडे मुदत आहे, तोपर्यंत आम्ही काही बोलणार नाही, शांततेत सुरु केलेल्या ह्या मराठा आंदोलनाची दखल सरकारला घेणे भाग पडेल, असे मनोज जरांगे पाटील म्हणत आहेत.

राज्यभरात मराठ्यांचे झंझावाती वादळ

मराठ्यांची ऐतिहासिक सभा पार पडल्यानंतर मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा राज्यभरात सभा चालू ठेवल्या आहेत. आणि विशेष म्हणजे ह्या सभांनाही प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. राज्यभरात मराठा आरक्षणाचे झंझावती वादळ घोंगावत असून,  वृत्तवाहिन्यांवर मनोज जरांगेंच्या मुलाखती आणि भाषण चांगलेच गाजताहेत. एकंदरीतच राज्यभरात मराठा आरक्षणासाठी वातावरण पेटले आहे.

‘तेज’ चक्रीवादळ येतंय…शेतकऱ्यांनो सावधान!

समिती आज धाराशिवमध्ये

सकल मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी नेमण्यात आलेली न्या. संदीप शिंदे समिती आज धाराशिवमध्ये येत आहे. यात निजाम राजवटीत ‘कुणबी’ असा उल्लेख असलेले काही पुरावे आहेत. शिवाय तत्कालीन काळी  शेती करणार्‍या मराठ्यांचा “कुणबी” असा उल्लेख असल्याचे सांगण्यात येत आहे. आणि यासंबंधीचीच माहिती आणि पुरावे ही समिती धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयातून घेणार आहे.Maratha Reservation


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here