Skip to content

Raj Thackeray| शहरं आहेत की डान्स बार हेच कळत नाही; माझ्या हातात सत्ता आली तर..- राज ठाकरे


Raj Thackeray|  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आर्किटेक्ट, इंजीनिअर तसेच राज्यकर्त्यांची दृष्टी यावरून राज्यकर्त्यांवर जोरदार टीका केली आहे. आमच्या राज्यकर्त्यांकडे सौंदर्यदृष्टीच नाही. त्यामुळे आपल्या शहरांचं प्लॅनिंग होतच नाही. महापालिकांमध्ये आर्किटेक्चरपेक्षा इंजिनीअरला जास्त महत्त्व आहे, माझ्या हातात सत्ता आली तर महाराष्ट्राची प्लॅनिंग करण्याची जबाबदारी मी आर्किटेक्चरकडे देईल इंजिनीअरकडे नाही, असं राज ठाकरे म्हणाले.

पुण्यातील एका कार्यक्रमा दरम्यान राज ठाकरे बोलत होते. “मी तुम्हाला शब्द देतो. माझ्या हातात जर उद्या सत्ता आली. तर महाराष्ट्राचं प्लॅनिंग करण्याची जबाबदारी मी आर्किटेक्चरकडे देईन. आणि तुम्हाला माहीत आहे, माझा शब्द हा शब्द असतो. मी उद्या इंजीनिअरच्या कार्यक्रमाला गेलो तरी तुमचेच नाव घेईल. तिकडे गेलो म्हणून त्यांची  नावं घेणार नाही. मी इतर राजकारण्यांसारखा नाही, असं म्हणत शहरांच्या प्लॅनिंग वरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर टिकास्त्र् सोडले.

शहरं नाहीत डान्सबार.. 

मुंबईच्या रस्त्यांवर लाईट लावण्यात आले आहेत. आणि ते लाईट अशा प्रकारे लावले आहेत की, सालं कधीकधी कळतंच नाही ही शहरं आहेत की डान्सबार?, असं सांगतानाच तुम्ही मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये या. तिथे काही सिंह आहेत. आणि त्या सिंहाना खालून लाल दिव्यांचा प्रकाश मारला आहे. ते बघतांना सिंहांना मूळव्याध झालाय असं दिसतं? तुम्हीच सांगा, असं कधी ब्युटिफिकेशन असतं का? हे साले, नगरसेवक, आमदार अभ्यासक म्हणून परदेश दौऱ्यांवर  जातात. तिथे काही बघतच नाहीत का? तिथल्या शहरांचा विकास यांना दिसत नाही का? बरं यांना जमत नसेलच तर त्या अरबांसारखं तरी वागा. त्यांच्याकडे मेंदू नाही, पण पैसे आहेत. आणि त्या पैशांनी मेंदू विकत घ्या. इतर लोकांना बोलवा आणि त्यांच्याकडून कामं करून घ्या ना, अशी खोचक टीका राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर केली.

Nashik | गाडीची टाकी करा फुल्ल..!; 18 जिल्ह्यांत डिझेल, पेट्रोल पुरवठा विस्कळीत

महापालिकांकडे टाऊन प्लॅनिंग नावाची गोष्टच नाही.

राजाकडे सौंदर्यदृष्टी असेल तर खाली त्याचं संचित होत असतं. आपल्या महापालिकांकडे टाऊन प्लॅनिंग नावाची गोष्टच नाही. इंजिनीयरला जेवढं महत्त्व, तेवढं आर्किटेक्चरला नाही. मी एका सर्किट हाऊसला गेलो होतो. तिथे एवढा मोठं बाथरूम होतं. तिथे काय पळत पळत जाऊन आंघोळ करायचीय का? कशाला हवा एवढा मोठा बाथरूम. त्यानंतर दुसऱ्या एक सर्किट हाऊसला गेलो. तिथे हॉल प्रचंड मोठा होता. आणि तिथे एक पलंग ठेवला होता. नवीन जोडप गेलं तर त्यांनी तिथे काय पकडापकडी खेळायची आहे का? ज्या राज्यात सांत गाडगेबाबांचा जन्म झाला. तिथेच स्वच्छता शिकवावी लागते हे आपलं दुर्देव आहे, असं म्हणत राज ठाकरे यांनी महापालिकांच्या कामांवर ताशेरे ओढले.

पुण्याची वाट लागायलाही वेळ लागणार नाही.

आपल्याकडे प्रदूषण बेसुमार वाढलेलं आहे. हाजी अलीला समुद्रच राहिला नाही. काल परवा एक बातमी वाचली, मुंबईत सर्वाधिक प्रदूषण आहे. मी पुण्यातही अनेकदा सांगितलं आहे. मुंबईची वाट लागायला एक काळ लोटला होता. पुण्याची वाट लागायलाही वेळ लागणार नाही. (Raj Thackeray)

Maratha Reservation| समितीचे “टाइम प्लीज”आणखी २ महिन्यांचा मागितला वेळ; आता मराठा आरक्षण प्रश्न आणखी चिघळणार का..?


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!