Skip to content

IND Vs NZ | हार्दिक पांड्याच्या जागी संघात कोणाला मिळणार संधी? कोणत्या दोन खेळाडूंची नावं चर्चेत


IND Vs NZ | आयसीसी क्रिकेट विश्वचषकात उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या टीम इंडियाला मोठा झटका बसलेला आहे. चार सामन्यात दमदार विजय मिळवल्यानंतर आता न्यूझीलंडविरुद्ध असलेल्या महत्त्वाच्या सामन्याआधी भारतीय संघासाठी वाईट बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा महत्त्वाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात खेळणार नसल्याचे BCCI ने एका निवेदनात म्हटले आहे.
टीम इंडियाचा महत्त्वाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या धर्मशालाला येथे होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्ध सामन्यासाठी संघासोबत जाणार नाही. हार्दिक पांड्या हा टीम इंडियाच्या प्लेइंग 11 चा महत्त्वाचा भाग आहे. तो खेळणार नसेल तर न्यूझीलंडविरुद्ध सामन्यासाठी भारतीय संघात कोणाला संधी मिळणार, याबाबत चर्चा आता सुरू झाली आहे. हार्दिक पांड्या गोलंदाजीसोबतच फलंदाजीतदेखील महत्त्वाची भूमिका बजावतो. हार्दिक व्यतिरिक्त, शार्दुल ठाकूर हा टीम इंडियातील एकमेव वेगवान गोलंदाजी अष्टपैलू खेळाडू आहेत. परंतु पांड्या आधीपासूनच प्लेइंग 11 चा भाग आहे.

सूर्यकुमार यादवला मिळू शकते संधी

हार्दिक पांड्या संघासाठी सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करतो आहे. अशा परीस्थितीत त्याच्या जागी सूर्यकुमार यादवला संधी दिली जाऊ शकते. हार्दिक पंड्याच्या अनुपस्थितीतदेखील सुर्या या जागेवर खेळला आहे. सूर्याची वनडेतील सरासरी कमी असली तरी पण विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या मालिकेत तो उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसला होता.  अनेक भारतीय माजी क्रिकेटपटूंनी सुरुवातीच्या सामन्यातच त्याला प्लेइंग 11 मध्ये समाविष्ट करण्याची मागणीदेखील केली होती. त्यामुळे हार्दिकच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादवला संधी मिळू शकते.

इशान किशनलाही मिळू शकते टिममध्ये स्थान

हार्दिकच्या जागी सूर्यकुमार यादवचे नाव जवळपास निश्चित मानले जाते आहे. मात्र संघ व्यवस्थापन खालच्या क्रमवारीत उतरून इशान किशनलाही धावा करण्याची संधी देऊ शकते. इशानने आजपर्यंत सहाव्या क्रमांकावर फलंदाजी केलेली नाही. किशनचादेखील फॉर्म चांगला आहे. त्यामुळे भापतीय टीम न्यूझीलंडविरुद्ध किशनला नव्या ठिकाणी आजमावू शकते. कर्णधार रोहितनेही खेळाडूंना विश्वचषकापूर्वी कोणत्याही स्थितीत खेळण्यासाठी तयार राहण्यास सांगितलेले होते.

विश्वचषकासाठी भारताचा संपूर्ण संघ

 • रोहित शर्मा (कर्णधार),
 • हार्दिक पंड्या (उपकर्णधार)
 • शुभमन गिल
 • विराट कोहली
 • श्रेयस अय्यर
 • सूर्यकुमार यादव
 • केएल राहुल (विकेटकीपर)
 • इशान किशन (विकेटकीपर)
 • रवींद्र जडेजा
 • शार्दुल ठाकूर
 • अक्षर पटेल
 • जसप्रीत बुमराह
 • कुलदीप यादव
 • मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!