Skip to content

Deola | देवळा शेतकरी संघात पशुखाद्य विक्रीचा शुभारंभ


Deola | देवळा तालुका खरेदी विक्री संघाचे संस्थापक अध्यक्ष, माजी आमदार कै. शांताराम तात्या आहेर यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून शनिवारी (दि. २१) रोजी संघाच्या वतीने पशुखाद्य विक्रीचा शुभारंभ बाजार समितीचे सभापती योगेश आहेर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी चेअरमन कैलास आनंदा देवरे, व्हा. चेअरमन अमोल आहेर, संजय गायकवाड, काशिनाथ पवार, हंसराज जाधव, चिंतामण आहेर, रवींद्र जाधव, साहेबराव सोनजे आदींसह बाजार समितीचे संचालक भाऊसाहेब पगार, संचालक शिवाजी पवार, विजय सोनवणे, भावराव नवले, दीपक पवार, बाजार समितीचे माजी संचालक जगदीश पवार, पंडितराव निकम, जितेंद्र आहेर, नगरसेवक संतोष शिंदे, सुनील देवरे, लक्ष्मीकांत आहेर, रमेश अहिरे, दीपक पवार, संदीप पवार, डॉ. किरण आहेर, अनिल आहेर, अतुल आहेर, सचिन सूर्यवंशी, बाजार समितीचे सचिव माणिक निकम आदी सभासद उपस्थित होते.

IND Vs NZ | हार्दिक पांड्याच्या जागी संघात कोणाला मिळणार संधी? कोणत्या दोन खेळाडूंची नावं चर्चेत

आभार सचिव गोरख आहेर यांनी मानले. दरम्यान, देवळा बाजार समिती आणि शरदराव पवार पतसंस्थेच्या वतीने माजी आमदार कै. शांताराम तात्या आहेर यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिन साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी कै. आहेर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अपूर्ण करून अभिवादन केले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!