Skip to content

Lok Sabha Election | वर्षा बंगल्यावर मध्यरात्री खलबतं; ‘या’ जागेच तिढा सुटला..?

Lok Sabha election

Lok Sabha Election |  राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत आहे. दोन्ही गोटात जागावाटपावरून रस्सीखेच सुरू असून, महायुतीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग, पालघर, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकच्या जागेवरून मित्रपक्ष आक्रमक झाले आहेत. बैठकांवर बैठका होत आहेत. पण तिढा सुटण्याचे नाव घेत नाही. दरम्यान, काल पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मध्यरात्रीपर्यंत वर्षा निवासस्थानी जागा वाटपावरुन पुन्हा एकदा खलबतं झालीत. त्यामुळे या जागांचा तिढाही लवकरच सुटण्याची शक्यता आहे. (Lok Sabha Election)

‘या’ जागेवर भाजपचाच उमेदवार 

दरम्यान, मध्यरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी मध्यरात्री अडीच तास चर्चा झाली आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात जागावाटपाबाबत पुन्हा एकदा बैठक झाली. तर या बैठकीत छत्रपती संभाजीनगरची जागा भाजपकडेच राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. (Lok Sabha Election)

Lok sabha Election | भाजपची मोठी ऑफर?; राज ठाकरे ‘शिवसेना प्रमुख’ होणार?

Lok Sabha Election | वर्षा बंगल्यावर मध्यरात्री खलबतं 

रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री उदय सामंत, आणि शंभूराज देसाई यांच्यात वर्षा बंगल्यावर जागावाटपाबाबत तब्बल अडीच तास चर्चा झाली. या बैठकीत छत्रपती संभाजीनगर, पालघर व रत्नागिरी-सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा आहे. तर, यावेळी रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा ही आपल्या भावाला मिळावी. यासाठी मंत्री उदय सामंत आग्रही आहेत. तर, शिवसेनेला ही जागा दिल्यास मोठ्या ताकदीने ही जागा जिंकू असा ठाम विश्वासही यावेळी उदय सामंतांनी व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे पालघरमध्ये राजेंद्र गावित हे भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचीही माहिती आहे.  (Lok Sabha Election)

Lok Sabha Election 2024 | गोडसेंची उमेदवारी जाहीर करताना कोणाला विचारात का घेतले नाही..?

छत्रपती संभाजीनगर भाजपकडे 

दरम्यान, काल झालेल्या या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये ज्या जागांचा तिढा आहे. त्या जागांबाबत  चर्चा झाली आहे. तर, शिंदे गटाकडून छत्रपती संभाजी नगरमधून  निवडणूक लढवण्यास मराठा नेते आणि आणि मराठा याचिकाकर्ते विनोद पाटील हे इच्छुक असून, भाजप देखील या जागेसाठी आहे. रात्रीच्या या बैठकीत छत्रपती संभाजी नगरची ही जागा भाजपकडे जाणार असून, येथून भाजपचाच उमेदवार निवडणूक लढवणार असल्यावर जवळपास शिकामोर्तब झाल्याची माहिती समोर आली आहे.  (Lok Sabha Election)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!