Lok Sabha Election 2024 | गोडसेंची उमेदवारी जाहीर करताना कोणाला विचारात का घेतले नाही..?

0
4
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024

Lok Sabha Election 2024 | आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे राजकिय महत्त्व वाढले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाशिक लोकसभेचे उमेदवार म्हणून विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा केली. नाशिकची जागा ही शिवसेनेची असून, येथून हेमंत गोडसे यांनाच तिसऱ्यांदा नाशिकचे खासदार म्हणून दिल्लीत पाठवायचे आहे. यासाठी कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आवाहन खासदार श्रीकांत शिंदे यांनी केले होते. त्यामुळे नाशिकच्या जागेचा तिढा सुटला असे समजले जात होते.

दरम्यान, यावरून आता भाजप विरोध करत असल्याचे दिसत आहे. तर, शिवसेना शिंदे गटाचे कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी महायुतीच्या मित्रपक्षांना विचारात न घेता हेमंत गोडसेंच्या नावाची घोषणा केल्याचे भाजप पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. हेमंत गोडसे यांनी युतीधर्म पाळला नसून भाजपला दुय्यम वागणूक दिल्याचा भाजपने आरोप केला आहे. त्यामुळे नाशिकची जागा ही भाजपकडे घ्यावी आणि येथे भाजपच्या उमेदवाराला उभे करावे, अशी मागणी नाशिक लोकसभा मतदार संघातील आमदार आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांच्याकडे केली आहे.

Lok Sabha Election 2024 |गोडसेंनी भाजपला दुय्यम वागणूक दिली 

गेल्या दोन टर्म नाशिकचे खासदार हे हेमंत गोडसे असून, या काळात त्यांनी भाजपला नेहमी दुय्यम वागणूक दिली आणि त्यांनी युतीधर्म पाळला नाही असे आरोप जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी केला आहे. तसेच खासदार श्रीकांत शिंदेंनी नाशिकचे महायुतीचे उमेदवार म्हणून गोडसेंच्या नावाची घोषणा करताना महायुतीच्या इतर कोणालाही विचारात घेतले नाही. असा आरोपही भाजपने केला आहे.

Shrikant Shinde | श्रीकांत शिंदेंनी केली हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीची घोषणा

नाशिकच्या भाजप पदाधिकाऱ्यांची नेमकी मागणी काय? 

– जिल्ह्यातील सगळ्या आमदार, आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी मंत्री गिरीश महाजनांकडे नाशिकची जागा आपल्याकडे घ्यावी असा आग्रह केला आहे.

– गेल्या दोन टर्म हेमंत गोडसेंनी युती धर्म पाळला नसून, त्यांनी फक्त शिवसेना खासदार म्हणून काम केले.

– खासदार निधी त्यांनी फक्त शिवसेनेला दिला भाजपला दिला नाही.

– गिरीश महाजनांनी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि  फडणवीसांकडे आग्रह करावा.

– खासदार श्रीकांत शिंदेंनी हेमंत गोडसेंची उमेदवारी जाहीर करताना युतीच्या कोणत्याही नेत्याला विचारले नाही.

– अजून नाशिकची जागा अधिकृतरित्या कोणाची आहे हे  जाहीर झालेलं नाही. त्यामुळे ही जागा भाजपने घ्यावी असा आग्रह कार्यकर्त्यांनी केला आहे.

BJP loksabha Candidate | भाजपाची दुसरी यादी जाहीर; भारती पवार आणि सुभाष भामरे यांनाच पुन्हा उमेदवारी


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here