Skip to content

सर्वतीर्थ टाकेद | सर्वतीर्थ टाकेद येथे ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन

सर्वतीर्थ टाकेद

राम शिंदे – प्रतिनिधी : सर्वतीर्थ टाकेद | इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील सर्वतीर्थ टाकेद येथे ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सरपंच सौं ताराबाई बांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. या उद्घाटन लोकार्पण सोहळ्यात टाकेद बु येथे सिमेंट रस्ता काँक्रेटीकरण, अंगणवाडी दुरुस्ती, टाकेद येथील पाण्याची टाकी दुरुस्ती करणे, टाकेद येथे भूमिगत गटार लोकार्पण करणे, अंगणवाडी येथे फेव्हर ब्लॉक बसवणे, टाकेद येथील सार्वजनिक शौचालय दुरुस्ती करणे, टाकेद येथे द्रव्य व कचऱ्या चे व्यवस्थापण करणे, घन कचऱ्याचे व्यवस्थापन, टाकेद बु. येथील बांबळेवाडी येथे नळ कनेक्शन व पाणी पुरवठा योजनेचे लोकार्पण करणे.

Sarvteerth Taked | शेतकऱ्यांसाठी इकर्डा आणि बायफ संस्थेच्या शास्त्रज्ञांच्या उपस्थितीत चर्चासत्र

जिल्हा प्राथमिक शाळा जाळी कंपाउंड दुरुस्ती करणे, शिरेवाडी येथे सिमेंट काँक्रेट रस्ता करणे, शिरेवाडी येथे विहीर ते पाण्याची टाकी पी व्ही सी पाईपलाईन करणे, घोडेवाडी येथे सिमेंट रस्ता करणे,टाकेद येथे कातकरी वस्ती सिमेंट काँक्रेट रस्ता करणे असे एकूण २३ विविध विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन यावेळी करण्यात आले याप्रसंगी सरपंच सौ.ताराबाई रतन बांबळे, उपसरपंच रामचंद्र परदेशी, ग्रामपंचायत सदस्य गंगूबाई बगड, गोरख भांगे, भीमाबाई धादवड, नंदाबाई शिंदे,सामाजिक कार्यकर्ते नंदू जाधव, राम शिंदे, दिलीप धादवड,केशव बांबळे,प्रकाश धादवड, कॉन्ट्रॅक्टर रवींद्र पाटील तसेच मोठ्या संख्येने टाकेद, बांबळेवाडी, घोडेवाडी, शिरेवाडी येथील ग्रामस्थ व तरुण उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!