Skip to content

Deola | श्री. रामराव आहेर पतसंस्थेस ३१ लाख रुपयांचा नफा 

Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा |  देवळा येथील अग्रगण्य अशा श्री. रामराव आहेर नागरी सहकारी पतसंस्थेस आर्थिक वर्षाअखेर ३१ लाख ११ हजार ९६० रुपये इतका नफा झाल्याची माहिती संस्थेचे चेअरमन विनोद बाजीराव शिंदे, व्हा. चेअरमन दीप्ती धनंजय आहेर यांनी दिली. संस्थेची सांपत्तिक स्थिती पुढीलप्रमाणे – संस्थेच्या ठेवी रु. ११,१९,५३,७९५ इतक्या असून, कर्ज वाटप – ८,०८,७९,४३९ इतके केले आहे. संस्थेचे वसूल भाग भांडवल – १,५६,९६,५०० रुपये, स्वनिधी – ३,४५,७८,५८७ रुपये, तर गुंतवणूक – ८,३९,३५,६६१ रुपये , खेळते भांडवल – १८ कोटी २९ लाख रुपये, एकूण व्यवसाय – १९ कोटी २७ लाख रुपये तर थकबाकी – १२.८० टक्के इतकी आहे. अशी माहिती श्री. रामराव आहेर नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन विनोद शिंदे यांनी दिली. या आर्थिक वर्षात संस्थेने सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, आरोग्य व शैक्षणिक कार्यात भरघोस मदत केली. संस्था लवकरच नेट बँकींग, युपीआय सुविधा सुरू करणार आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!