Skip to content

Lok Sabha Election | राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या पोस्टरवर ‘दादां’नाच जागा नाही..!

Lok Sabha Election

Lok Sabha Election |  सध्या राज्यात लोकसभा निवडणुकींची धूम सुरू असून, या पार्श्वभूमीवर राज्यात उमेदवारांनी आपापल्या प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. यातच आता राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या एका उमेदवाराने गजब प्रकार केला आहे. दरम्यान, महायुतीने धाराशिव लोकसभा मतदार संघाची जागा ही राष्ट्रवादी अजित पवार गटाला दिली असून, या जागेवर भाजपचे विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने उमेदवारी दिली आहे. (Lok Sabha Election)

लोकसभेच्या तिकीटासाठी अर्चना पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि त्याचे बक्षीस म्हणून त्यांना धाराशिव लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. मात्र, ज्या पक्षाचे त्या प्रतिनिधीत्व करत आहेत किंवा ज्या पक्षाने त्यांना उमेदवारी दिली आहे. त्याच राष्ट्रवादी पक्षाचा, पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा आणि नेत्यांचा अर्चना पाटील यांना विसर पडल्याचे दिसत आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी पक्षाला मी का वाढवू..?, असे वक्तव्य केले होते. याचा कथित व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत असून, यातच आता त्यांच्या या पोस्टने राष्ट्रवादीच्या नेत्यांना घाम फुटला आहे. (Lok Sabha Election)

Devendra Fadanvis | नाथाभाऊंच्या घरवापसीवर फडणवीस, महाजन नाराज..?

Lok Sabha Election | नेमकं प्रकरण काय..?

याचे कारण म्हणजे राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली असून, यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचा फोटो टाकण्याएवजी चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोठ्ठा फोटो टाकला आहे. त्यांच्या पोस्टरवर अजित पवार गटाचे घड्याळाचे चिन्ह आहे. माञ आपल्या पक्षाच्या नेत्यांच्याएवजी नरेंद्र मोदी यांचा फोटो टाकण्यात आला आहे. “मी महायुतीची उमेदवार असल्याने राष्ट्रवादी पक्ष का वाढवू, असं धाराशिवच्या उमेदवार अर्चना पाटील यांचं वक्तव्य व्हायरल होतं असतानाच आता त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमधून अजित पवारांनाच  गायब केले आहे.  (Lok Sabha Election)

Praniti Shinde | ज्यांच्यासाठी मोदी महाराष्ट्रात आले, आता त्यांचा काँग्रेसला पाठिंबा

आधी म्हणल्या मी कशाला राष्ट्रवादी वाढवू…

धाराशिव लोकसभा मतदारसंघातील महायुती राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना पाटील यांचे पती हे भाजपचे आमदार आहेत. आपल्याला उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता अर्चना पाटील या प्रचाराच्या निमित्ताने आपल्या मतदारसंघाचा दौरा करत आहे. यावेळी त्या प्रचारा निमित्ताने बार्शीत आल्या होत्या. यावेळी अर्चना पाटील यांना पत्रकारांनी तुम्ही बार्शीतही राष्ट्रवादी पक्ष वाढवणार का? असा प्रश्न केला असता,(Lok Sabha Election)

“मी राष्ट्रवादी कशाला वाढवू” असं अजब उत्तर त्यांनी दिले. यामुळे ज्या पक्षाचे घडयाळ घाऊन त्या निवडणूक लढवताय. त्याच पक्षाचा त्यांना विसर पडला असावा अशी चर्चा रंगली आहे आणि हे प्रकरण निवते, तोच आता त्यांच्या या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये अजित पवारांची जागा मोदींना दिल्याने यावरून त्यांच्यावर टिका केल्या जात आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!