Deola | शरदराव पवार नागरी सहकारी पतसंस्थेस ६० लाख ७० हजार रुपयांचा नफा

0
3
Deola
xr:d:DAF8fXe5yrY:425,j:561122389889982455,t:24040815

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा |  येथील शरदराव पवार नागरी सहकारी पतसंस्थेस चालू आर्थिक वर्षा अखेर ६० लाख ७० हजार रुपयांचा नफा झाल्याची माहिती चेअरमन योगेश आबा आहेर यांनी दिली. संस्थेची सांपत्तिक स्थिती पुढीलप्रमाणे भागभांडवल ६७ लाख ३४ हजार, एकूण ठेवी २७ कोटी ७८ लाख, कर्जवाटप १५ कोटी ७४ लाख, स्वनिधी ३ कोटी ८७ लाख, गुंतवणूक १५ कोटी ५७ लाख, सी डी रेशो ५६. ६५ टक्के, निव्वळ थकबाकी ७.४९ टक्के, खेळते भागभांडवल ३३कोटी ५७ लाख, सर्व तरतुदी वजा जाता एकूण ६० लाख ७० हजार रुपयांचा नफा झाल्याची माहिती शेवटी चेअरमन योगेश आबा आहेर यांनी दिली.

संस्थेने सोने चांदीवर ९ टक्के दराने कर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली असून, यावर ४ कोटी १५ लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. संस्थेमार्फत गेल्या दहा वर्षपासून वीज बिल भरणा केंद्र सुरु करण्यात आल्याने या सुविधेमुळे ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे. मागील वर्षी सभासदांना आकषर्क भेट वस्तूचे वाटप करण्यात आले असून, याही वर्षी सर्व सभासदांना भेट वस्तू ऐवजी लाभांश वाटप करण्याचा मानस संचालक मंडळाचा आहे. संस्थेची थकबाकी नगण्य असून, उर्वरित थकबाकीदारांवर वसुली कामी कायदेशीर कारवाई सुरु आहे.

Deola | देवळा येथे शॉट सर्किटमुळे तब्बल तीस ट्रॉली चारा जळून खाक

थकबाकी वसुलीसाठी सर्व संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी व्हा चेअरमन हिरामण आहेर, तुळशीराम आहेर, अतुल आहेर, नानाजी आहेर, नितीन नवले, लीना आहेर, वनिता शिंदे, पुंडलिक आहेर, शंकर बच्छाव, नानाजी आढाव, बाळासाहेब मगर व्यवस्थापक प्रमोद देवरे, बापू आहेर, रमेश जाधव, भिला सोनवणे, मुन्ना आहेर, तुषार मोरे, संदीप आहेर उपस्थित होते.

Deola | श्री. रामराव आहेर पतसंस्थेस ३१ लाख रुपयांचा नफा 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here