सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | आगामी लोकसभा निवडणूकीसाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निर्देशानुसार सोमवारी (दि ८) रोजी देवळा शहरासह संपूर्ण तालुक्यात मतदान जनजागृती मोहीम राबविण्यात आली. यात देवळा नगरपंचायत व जिजामाता कन्या विद्यालय, श्री. शिवाजी मराठा हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने देवळा नगरपंचायत कार्यक्षेत्रात मतदारांनी मतदान करावे. यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ मतदान करण्यासंदर्भातील विद्यार्थ्यांनी पथनाट्ये सादर केली. या प्रसंगी देवळा शहरातून विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृती बाबत विविध घोषवाक्य असलेले फलक घेवून, घोषणा देत रॅली काढण्यात आली, सदर रॅलीत नागरिकांनी उस्फुर्त सहभाग घेतला.
या जनजागृती रॅलीत मुख्याधिकारी प्रमोद ढोरजकर, गटविकास अधिकारी बी.एस. वेंधे , गटशिक्षण अधिकारी सतिष बच्छाव, प्रशासकीय अधिकारी माणिक वानखेडे, मुख्याध्यापिका प्रतिभा सागर, सुनिता पवार, प्रा.डॉ.डी. के. आहेर , एस टी. पाटील, भरत पवार, संजय पगार, शैलेश खैरनार, जयवंत भदाणे, सुयोग पाचपाटील, नितीन भवर, जुगल घुगे, जनार्दन येवले, सुधाकर आहेर, शरद पाटील, श्रीमती. पूनम भामरे, दिपक सुर्यवंशी, सागर बच्छाव, तुषार बोरसे आदींसह सर्व संबंधित गावांत सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, कर्मचारी, जि.प व माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षिका, विद्यार्थी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम