Maha Vikas Aghadi | ‘मविआ’ च्या तिन्ही पक्षांची जागावाटपाची अंतिम यादी जाहीर

0
4
Vidhansabha Election
Vidhansabha Election

Maha Vikas Aghadi | लोकसभा निवडणुका या अगदी तोंडावर येऊन ठेपल्या असून, अद्याप दोन्ही गोटांमधील जागावाटपाचा तिढा हा सुटलेला नव्हता. मात्र, आता अखेर विरोधी गोटातील सस्पेन्स संपला असून, महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा सुटला आहे. आज मुंबईत महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेला महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांनी उपस्थिती लावली होती. यात ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे तिन्ही नेते उपस्थित होते. तर, यावेळी खासदार संजय राऊत  यांनी महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला.(Maha Vikas Aghadi)

असं आहे जागावाटपाचा फॉर्म्युला

या लोकसभा निवडणूकीसाठी महाविकास आघडीचा ठरला असून, यानुसार शिवसेना ठाकरे गट २१, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट १० आणि काँग्रेस तब्बल १७ जागा लढवणार आहे. यात आता गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला सांगली आणि भिवंडीच्या जागांचाही तिढा सुटला असून, सांगलीची जागा ठाकरे गट आणि भिवंडीची जागा ही शरद पवार गट लढवणार आहे. (Maha Vikas Aghadi)

Maha Vikas Aghadi | महाविकास आघाडीत बिघाडी; ठाकरे अन् आंबेडकरांचे सूर जुळेना

Maha Vikas Aghadi | या आहेत ठाकरे गटाच्या २१ जागा..?

  1. दक्षिण मुंबई
  2. दक्षिण मध्य मुंबई
  3. उत्तर पश्चिम मुंबई
  4. मुंबई ईशान्य
  5. जळगाव
  6. परभणी
  7. नाशिक
  8. पालघर
  9. कल्याण
  10. ठाणे
  11. रायगड
  12. मावळ
  13. धाराशिव
  14. रत्नागिरी-सिंधुदुर्ग
  15. बुलढाणा
  16. हातकणंगले
  17. छत्रपती संभाजीनगर
  18. शिर्डी
  19. सांगली
  20. हिंगोली
  21. यवतमाळ- वाशिम(Maha Vikas Aghadi)

‘या’ आहेत काँग्रेसच्या १७ जागा..?

  1. नंदूरबार
  2. धुळे
  3. अकोला
  4. अमरावती
  5. नागपूर
  6. भंडारा-गोंदिया
  7. गडचिरोली-चिमूर
  8. चंद्रपूर
  9. नांदेड
  10. जालना
  11. पुणे
  12. मुंबई उत्तर मध्य (Maha Vikas Aghadi)
  13. उत्तर मुंबई
  14. सोलापूर
  15. कोल्हापूर
  16. रामटेक
  17. लातूर

Mahavikas Aghadi | संजय राऊतांना घरचा आहेर; नानांनी चांगलंच खडसावलं

राष्ट्रवादी काँग्रेसच्या १० जागा..

  1. बारामती
  2. शिरुर
  3. सातारा
  4. भिवंडी
  5. दिंडोरी
  6. माढा
  7. रावेर
  8. वर्धा
  9. अहमदनगर दक्षिण
  10. बीड (Maha Vikas Aghadi)

या जागाच फायनल..

दरम्यान, महाविकास आघाडीच्या या संयुक्त पत्रकार परिषदेच्या वेळी तिन्ही पक्षांची फायनल यादी जाहीर करण्यात आली. संजय राऊतांनी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांची अंतिम जागावाटपाची यादी वाचून दाखवली. यात कोणाच्या वाट्याला किती आणि कोण कोणत्या जागा येणार हे त्यांनी सांगितले. महाविकास आघाडीचा जागावाटपाचा हा अंतिम फॉर्म्युला राऊत यांनी जाहीर केल्यानंतर यावर शरद पवारांनी आता कोणत्याही जागेवर मतभेद असणार नसून, आता वाचलेल्याच याच जागा फायनल असतील, असं म्हणत शरद पवारांनी या जागावाटपाच्या यादीवर शिक्कामोर्तब केला. (Maha Vikas Aghadi)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here