Skip to content

Maha Vikas Aghadi | महाविकास आघाडीत बिघाडी; ठाकरे अन् आंबेडकरांचे सूर जुळेना

Maha Vikas Aghadi

Maha Vikas Aghadi |  गेल्या काही दिवसांपासून महायुतीत बिनसल्याचे चित्र होते. मात्र आता महाविकास आघाडीतही बिघाडी झाल्याचे दिसत आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांचा सुर हा वेगळाच होता. यातच आता वंचित आणि महाविकास आघाडीची चर्चा ही जवळपास फिसकटल्यातच जमा असल्याचे दिसत आहे.(Maha Vikas Aghadi)

कारण आपल्या दररोजच्या पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांनी आज वंचितचा उल्लेख हा भूतकाळात केला. हे लक्षात आल्यावर मात्र त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत बाण त्यांच्या त्यांच्या तोंडून निघालेला होता. आम्ही प्रकाश आंबेडकरांना चार जागांचा प्रस्ताव दिला होता. पण त्यांची भूमिका ही वेगळी आहे, अशा शब्दांत राऊतांनी मविआ आणि वंचितमधील वादाची कल्पना दिली असून, त्यावरुनच वंचित आणि महाविकास आघाडीचे बिनसल्याची चर्चा आहे.  (Maha Vikas Aghadi)

BJP loksabha Candidate | भाजपाची दुसरी यादी जाहीर; भारती पवार आणि सुभाष भामरे यांनाच पुन्हा उमेदवारी

Maha Vikas Aghadi | … तर, आम्हाला आनंद झाला असता

दरम्यान, खासदार संजय राऊतांच्या या व्यक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे. यावेळी संजय राऊत म्हणाले की, “बाळासाहेब आंबेडकर हे एक सन्मानीय नेते आहेत. त्यांची आणि आमची अनेक वेळा चर्चा झाली असून, त्यांनी चार जागांवरती लढावं. अशा सूचना त्यांना आम्ही केल्या आहेत. त्यांना आम्ही हा प्रस्ताव दिल्यावर त्यांची भूमिका आम्हाला वेगळी दिसत आहे. पण त्यांनी तो प्रस्ताव मान्य केला असता, तर याचा आम्हाला आनंद झाला असता.”(Maha Vikas Aghadi)

नाराजी दूर करण्यात आम्हाला नक्की यश येईल

तसेच ते पुढे म्हणे की, “या हुकूमशाही विरोधातील लढ्यासाठी आणि संविधान वाचवण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आम्हाला गती व बळ मिळालं असतं. मात्र, आम्हाला अजूनही खात्री आहे. की सर्व प्रमुख नेते हे एकत्र बसतील आणि पुन्हा बाळासाहेब आंबेडकर यांच्यासोबत चर्चा करतील. तुमच्या मनात जर काही नाराजी असेल  तर, ती दूर करण्यात आम्हाला नक्कीच यश येईल. वंचित आणि दलित समाज हा या लढ्यात असायलाच पाहिजे.”, असा विश्वासही यावेळी संजय राऊत यांनी व्यक्त केला. (Maha Vikas Aghadi)

Prakash ambedkar : ‘२०२४ मध्ये फक्त मुस्लिमच मोदींना रोखू शकतात…’, आंबेडकर

वंचितने लोकसभेसाठी नवा पर्याय शोधला..? 

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर के. चंद्रशेखर राव यांचे ‘बीआरएस’ ही पुन्हा एकदा ‘अॅक्शन मोड’वर आली असून, प्रकाश आंबेडकर आणि के. चंद्रशेखर राव यांची फोनवर चर्चा झाल्याची माहिती आहे. के. चंद्रशेखर राव यांचा निरोप घेऊन मराठवाड्यातील भारत राष्ट्र समितीचे नेते कदीर मौलाना यांनी अकोल्यात प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली. (Maha Vikas Aghadi)

महाविकास आघाडीसोबतची चर्चा जवळपास फिसकटल्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी नवीन पर्याय शोधण्यास सुरूवात केली असून, ते बीआरएस पक्षाचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीआरएस ही वंचितसोबत युती करण्यास इच्छुक असल्याचं यामुळे स्पष्ट झालं आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री असतांना त्यांनी प्रकाश आंबेडकरांना दोन मोठ्या शासकीय कार्यक्रमांनाही आमंत्रित केलं होतं. (Maha Vikas Aghadi)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!