Skip to content

Gudipadwa Melava | राज ठाकरेंची तलवार म्यान; महायुतीला बिनशर्त पाठिंबा

Gudipadwa Melava

Gudipadwa Melava | गेल्या अनेक दिवसांपासून मनसे महायुतीत सामील होणार अशा चर्चा सुरू होत्या.  दरम्यान, आज मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात अखेर राज ठाकरेंनी आपले मौन सोडले आहे. गुढीपाडवा मेळाव्याच्या टीजरमधून “काय घडलं? काय घडतंय? हे सांगणार..”असे आवाहन त्यांनी केले होते. यामुळे आज राज ठाकरे कोणते गौप्यस्फोट करणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते.

२०१४ आणि २०१९ या दोन्ही लोकसभा निवडणुक मनसेने लढवल्या नव्हत्या. तर, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीबाबत मनसेने आपली भूमिका अद्यापही स्पष्ट केलेली नव्हती. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतली होती. यानंतर आता अखेर राज ठाकरे कोणती भूमिका घेणार? आणि मनसे महायुतीमध्ये जाणार का? याचा सप्नेस राज ठाकरेंनी संपवला.(Gudipadwa Melava)

तुम्हाला नोकरीवरून कोण काढतं ते मी पाहतो… 

पाच वर्षानंतर निवडणुका होताय. महापालिकेच्या हॉस्पिटल आणि नर्स यांना कामाला जुंपलंय. निवडणुका होणार हे निवडणूक आयोगाला माहीत असतं. तर, ते आधीच याचे नियोजन का करत नाही. डॉक्टरांनी आणि नर्सने निवडणुकांच्या कामावर जाऊ नये. तुम्हाला नोकरीवरून कोण काढतं ते मी पाहतो.(Gudipadwa Melava)

Raj Thackeray | राज ठाकरेंसमोर भाजपची अट; मनसेकडे फक्त एक दिवस

Gudipadwa Melava | राज ठाकरे शिंदेंच्या सेनेचे प्रमुख होणार..?

त्या अमित शाह यांच्या भेटीनंतर ज्या काही चर्चा सुरू झाल्या. जे तुम्ही बघत होतात. जे तुम्ही ऐकत होतात. ते मीही ऐकत होतो आणि एंजॉय करत होतो. तुम्हाला आता काय बोलायचंय ते बोला मला जेव्हा बोलायचं ते बोलेल. मी ह्या  चॅनेल्सला नाव ठेवलंय “आज मला काय वाटते..?” कोणाला काय विचारायचं कोणाला काय सांगायचं..? याचं काही घेणं देणं नाही. काय तर म्हणे, राज ठाकरेंवर १२ तास थांबायची वेळ आली. अरे..! आदल्या दिवशीची भेट होती. १२ तास थांबायचा काय विषय..?.(Gudipadwa Melava)

अरे मूर्खांनो..! मला व्हायचं असतं तर मी तेव्हाच झालो नसतो..?

मग अमित शाह यांच्या भेटीनंतर काही भेटलं नाही मग ही मालिका कशी पुढे न्यायची तर, यानंतर राज ठाकरे शिंदेंच्या शिवसेनेचे प्रमुख होणार..? अरे मूर्खांनो..! मला व्हायचं असतं तर मी तेव्हाच झालो नसतो का..? मी त्यांना तेव्हाच सांगितलं होतं की, मला पक्ष फोडून सत्तेत यायचं नाही. मी कोणाच्याही हाताखाली काम करणार नाही. त्यामुळे असल्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका. मी कुठल्याही पक्षाचा अध्यक्ष होणार नाही. मी जन्माला घातलेल्या आपत्याचाच अध्यक्ष राहणार. (Gudipadwa Melava)

पक्षाच्या चिन्हाबाबत कॉम्प्रोमाईज नाही

होय त्या भेटीत जागा वाटपावर चर्चा झाल्या. मग मला सांगण्यात आलं की, आमच्या चिन्हावर निवडणूक लढा. पण मी म्हणालो,”पक्षाच्या चिन्हाबाबत कॉम्प्रोमाईज नाही. गेल्या दीड वर्षांपासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मला म्हणताय “आपण एकत्र आलं पाहिजे. काही तरी केलं पाहिजे”. मी म्हणालं शी..! नेमकं करायचं काय..? मग मी अमित शहांना फोन केला. की नेमकं हे काय चाललंय..? हे काय म्हणताय मला काही काळत नाही. म्हणून ती भेट झाली. मी नेहमी स्पष्टपणे माझी भूमिका मांडतो. जे चूक ते चूक आणि जे योग्य ते योग्यच. उद्धव ठाकरे आणि राऊत ज्याप्रकरची टिका करताय, त्याप्रकारची टिका मी मोदी किंवा भाजपवर कधीही केली नाही. मला भूमिका नाही पटली म्हणून मी विरोध केला. मला काही हवं होतं म्हणून नाही. (Gudipadwa Melava)

Udayanraje Bhosale | फडणवीसांकडून तोडगा निघेना; उदयनराजेंची उमेदवारीसाठी ‘दिल्ली वारी’

फक्त मोदींसाठी पाठिंबा देत आहे

मी फडणवीस यांना स्पष्ट सांगितलं. मला काहीही अपेक्षा नाही. मी फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे. हे मी आज जाहीर करतो. आणि मला माझ्या महाराष्ट्र सैनिकांना एकंच सांगायचंय की,”विधानसभेच्या तयारीला लागा. जोरदार तयारीला लागा.” (Gudipadwa Melava)

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!