Horoscope 10 April | ‘या’ लोकांना मिळेल ग्रहांचे सहकार्य; वाचा आजचे राशीभविष्य

0
24
Horoscope 9 May 2024
Horoscope 9 May 2024

Horoscope 10 April |  ज्योतिषशास्त्रानुसार, आज 10 एप्रिल 2024 बुधवारचा दिवस हा खास आहे. आज दिवसभर भरणी नक्षत्र असेल.  तसेच आज वाशी योग, आनंदादि योग, सनफा योग, गजकेसरी योग, बुद्धादित्य योग, आणि ग्रहांमुळे निर्माण होणारे विषकुंभ योग यांचे काही राशीच्या लोकांना विशेष सहकार्य लाभेल. आज शुभ कार्य करायचे असल्यास त्यासाठी सकाळी 07:00 ते 09:00 आणि सायंकाळी 5.15 ते 6.15 हे दोन शुभ मुहूर्त आहेत. तर, दुपारी 12.00 ते 01.30 पर्यंत राहुकाल असेल. जाणून घेऊयात आजचे 12 राशींचे राशीभविष्य –

मेष राशी –

आज ग्रहांमुळे तयार झालेल्या बुधादित्य, गजकेसरी, आणि विषकुंभ या योगांमुळे नोकरदार वर्गाच्या लोकांवर वरिष्ठ खुश असतील. त्यामुळे तुमची बढती होण्याचीही शक्यता आहे. व्यवसायिकांनी आपल्या कर्मचाऱ्यांना पगाराच्या बाबतीत निराश करू नये. तसेच आज व्यवसायिकांना काही आर्थिक नुकसान होण्याचीही शक्यता आहे. विद्यार्थी इच्छित यश न मिळाल्याने निराश आहेत. परंतु आशा सोडू नका. आज तुम्ही तुमच्या शब्दांवर नियंत्रण ठेवा. अन्यथा याद होऊ शकतात.  (Horoscope 10 April)

वृषभ राशी –

वृषभ राशीच्या लोकांना कामाचा ताण वाढेल. पण तुम्ही फक्त तुमच्या कामावर लक्ष करावे. व्यवसायिकांना पैशाची उधळपट्टी थांबवावी लागेल. अनावश्यक कामांवर पैसा खर्च करणे टाळा. तरुणांनी त्यांच्या आवडत्या क्षेत्रात काम करावे. यामुळे त्यांचे मन प्रसन्न राहील. मात्र, तुम्हाला आज तुमच्या कौटुंबिक जबाबदाऱ्याही पार पाडाव्या लागतील. आरोग्याविषयी बोलायचे झाले तर, यकृताशी संबंधित आजार होण्याची शक्यता आहे. त्यामूळे आरोग्याची काळजी घ्यावी. (Horoscope 10 April)

मिथुन राशी –

नोकरदार वर्गाच्या लोकांना कामाच्या ठिकाणी काही नवीन काम करण्याची संधी मिळू शकते. प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा. व्यावसायिकांचे आर्थिक गणित कोलमडण्याची शक्यता आहे. एकीकडे उत्पन्नात घट होत असताना दुसरीकडे खर्च मात्र कमी होत नाहीये. त्यामुळे आर्थिक नियोजन करा. तुमच्यावर कामाचा ताण असेल. मात्र, तरीही त्यातून तुम्ही थोडा तरी वेळ तुमच्या जोडीदारासाठी काढायला हवा. यामुळे त्यांनाही आनंद होईल आणि तुम्हालाही कामातून थोडा ब्रेक मिळेल. आईच्या आरोग्याबाबत ताण काही प्रमाणात कमी होईल. मात्र, त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे.

Horoscope 10 April | कर्क राशी –

नोकरदार वर्गाच्या लोकांना आज महत्त्वाच्या बैठकीत सहभागी होता येईल. तुमचे काम वाढत असून, तुम्ही तुमच्या कामाचा वेगही वाढवायला हवा. तुमच्या सवयी बदला. आज ग्रहांमुळे तयार झालेल्या बुद्धादित्य, गजकेसरी, विषकुंभ या योगांमुळे शिक्षकांना विशेष फायदा होणार आहे. तसेच शिक्षणाशी संबंधित एखादा व्यवसाय करणाऱ्यांनाही याचा फायदा होऊ शकतो. व्यावसायिकांनी व्यवसायाचे नियोजन करावे लागेल. यासाठी अनुभवी व्यक्तींचा किंवा तज्ञांचा सल्ला घ्यावा. नवीन नात्यांना थोडा वेळ द्या. संवादाच्या अभावामुळे नाते कमजोर होऊ शकतात. आरोग्याविषयी बोलायचे झाले तर, तिखट आणि मसालेदार पदार्थ खाणे टाळा.  (Horoscope 10 April)

Horoscope 5 April | आजचा दिवस ‘या’ राशींसाठी तोट्याचा; वाचा आजचे राशीभविष्य

सिंह राशी –

नोकरदार वर्गाच्या लोकांना आज कामाच्या ठिकाणी इच्छा नसतानाही अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. मात्र, या जबाबदाऱ्या योग्यरित्या पार पडल्यास तुमच्या पुढील यशाचे मार्गही मोकळे होतील. व्यावसायिकांना आर्थिक लाभ मिळविण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतील. त्याशिवाय व्यवसायात यश मिळणार नाही. व्यवसाय वाढवण्यासाठी काही मोठे निर्णय घेत असल्यास आजचा दिवस योग्य आहे. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस हा खूप चांगला जाणार आहे. आर्थिक नियोजन करावे लागेल. कुटुंबाच्या गरजा लक्षात घेऊन गरजेपेक्षा जास्त पैसे खर्च करणे टाळा. आरोग्याविषयी बोलायचे झाले तर, तुम्हाला पोटदुखीचा सामना करावा लागू शकतो.(Horoscope 10 April)

कन्या राशी –

नोकरदार वर्गाच्या लोकांनी कामाच्या ठिकाणी स्वतःबद्दल बढाई मारणे टाळा. अन्यथा यामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकतात. व्यावसायिकांना अत्यंत सावधगिरीने बाबी हातळाव्या लागतील. तुमच्या व्यवसायाशी संबंधित सर्व कागदपत्रे तयार ठेवा. कारण अधिकारी तपासासाठी येण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी वेळेचा अपव्यय टाळावा. आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. तुमच्या स्वभावात काही बदल घडवून आणण्याचे प्रयत्न करा. तुम्हाला कुटुंबातील सर्वांसोबत आणि विशेषतः तुमच्या जोडीदारासोबत नीट वागण्याची गरज आहे. अन्यथा  नाते बिघडू शकते. नात्यात भांडणं किंवा इतर काही वाद झाल्यास ते लगेच सोडवायला हवे. अन्यथा समस्या गंभीर बनू शकतात.

तूळ राशी – 

नोकरदार वर्गाच्या लोकांनी कामाच्या ठिकाणी तांत्रिक माध्यमांचा वापर करावा. ज्यामुळे तुमचे श्रम आणि वेळ दोन्ही वाचतील. तसेच तुमची दुसऱ्या राज्यात बदली होण्याचीही दाट शक्यता आहे. व्यावसायिकांची त्यांच्या व्यवसायातील आर्थिक स्थिती सुधारू शकते. त्यामुळे त्यांचे उत्पन्नही वाढेल. आज तुमचे तुमच्या जोडीदारासोबत काही अनावश्यक मुद्द्यांवरून वाद होऊ शकतात. यात तुम्ही शांत राहण्याचा प्रयत्न करा. ग्रहांची स्थिती तुमच्यावर आळस लादू शकते. मात्र, तरीही तुम्ही आळस टाळून कामात सक्रिय राहण्याचा प्रयत्न करा. (Horoscope 10 April)

वृश्चिक राशी – 

नोकरदार वर्गाच्या लोकांनी कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांसोबत उत्तम समन्वय ठेवावा. यामुळे तुम्हाला कामात त्यांचे सहकार्य लाभेल. व्यावसायिक जर एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल. वडिलांचा सल्ला आणि आशीर्वाद अवश्य घ्या. व्यावसायिक व्यवसायाच्या निमित्ताने बाहेरगावी प्रवास करू शकतात. अत्र, प्रवास करताना कुठल्याही अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवणे टाळा. घरामध्ये विजेचे काही काम असल्यास ते वेळेत पूर्ण करा. अन्यथा वीजेशी संबंधित समस्या उद्भवण्याची गरज आहे. ज्या लोकांच्या वैवाहिक जीवनात अडचणी होत्या. त्यात आता सुधारणा होऊ शकतात. आरोग्याविषयी बोलायचे झाले तर, सांधेदुखीचा त्रास असलेल्या लोकांच्या वेदना वाढू शकतात.(Horoscope 10 April)

Horoscope 1 April | कोणाला फायदा तर कोणाचे नुकसान; वाचा आजचे राशीभाविष्य

धनु राशी –

नोकरदार वर्गाच्या लोकांना आज जास्त काम दिले जाईल. मात्र, तेही तुम्ही कोणत्याही व्यत्ययाशिवाय पूर्ण करू शकाल. तसेच तुम्हाला आज तुमच्या नोकरीच्या क्षेत्रात मोठे यश मिळू शकते. कामाच्या ठिकाणी तुमचा दर्जाही वाढेल. बँकेची रखडलेली कामे पूर्ण होतील. व्यावसायिकांना कठोर परिश्रम केल्याशिवाय यश मिळणार नाही. म्हणून त्यांनी कठोर परिश्रम करण्याचे तयारी करायला हवी. तरुणांनी आरोग्याचीही विशेष काळजी घायायला हवी. घरातील सुख-सुविधा वाढू शकतात. त्यामुळे तुमच्या कुटुंबतील व्यक्तींना आनंद होईल. आरोग्याविषयी बोलायचे झाले तर, तुमच्या आईची तब्येत अचानक बिघडू शकते. त्यामुळे तिच्या प्रकृतीची विशेष खबरदारी घ्यावी.(Horoscope 10 April)

मकर राशी –

नोकरदार वर्गाच्या लोकांनी सहकाऱ्यांवर कठोर नियम लादू नये. त्यांच्या मनात तुमच्याविषयी आदर राहील असेच वागा. तरच ते मनापासून आणि प्रामाणिकपणे काम करतील. येणाऱ्या काळात तुमच्या आयुष्यात काही कठीण प्रसंग निर्माण होताना दिसत आहेत. व्यावसायिक आज तुमच्या व्यवसायासाठी नवीन योजना बनवू शकतात. मोठा आर्थिक व्यवहार करायचा असल्यास विचारपूर्वक करा. कारण भविष्यात या व्यवहाराशी संबंधित काही समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. तुमच्या मुलांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. कामासोबतच तुम्ही विश्रांतीही घ्यायला हवी. अन्यथा निद्रानाशाची समस्या उद्भवू शकते.  (Horoscope 10 April)

कुंभ राशी –

नोकरदार वर्गाच्या लोकांना कामाच्या ठिकाणी पूर्वीच्या जबाबदाऱ्यांसोबतच नवीन जबाबदाऱ्याही मिळू शकतात.  ग्रहांमुळे तयार झालेल्या बुधादित्य, गजकेसरी, विषकुंभ योगांमुळे व्यावसायिकांना व्यवसायात चांगला लाभ होईल. त्यांच्या जोडीदाराच्या आरोग्याबाबत सावध असावे लागेल. त्यांना अचानक काही आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. व्यावसायिकांना कामानिमित्त दुसऱ्या शहरात जावे लागू शकते. हाडांशी संबंधित रुग्णांनी व्यायाम करावा. यामुळे त्यांना वेदनांपासून आराम मिळेल.  (Horoscope 10 April)

मीन राशी –

नोकरदार वर्गाच्या लोकांचा कामाच्या ठिकाणी संपूर्ण दिवस आनंदात जाईल. कार्यालयातील काही बाबींची गुप्तता राखण्यासाठी तुमच्यावर मोठी जबाबदरी दिली जाऊ शकते. मोबाईल किंवा दूरसंचारशी संबंधित व्यावसायिकांना चांगला नफा मिळेल. तुम्ही तुमच्या स्वभावाने आणि विनोदबुद्धीने लोकांची मने जिंकण्यास यशस्वी व्हाल. कुटुंबाशिवाय तुम्ही एकटे असाल. त्यामुळे कामासोबतच कुटुंबालाही वेळ द्या. त्यांच्यासोबत कुठेतरी अभेर फिरायला जाण्याचा प्लॅन करा.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here