Horoscope 5 April | आजचा दिवस ‘या’ राशींसाठी तोट्याचा; वाचा आजचे राशीभविष्य

0
23
Horoscope 9 May 2024
Horoscope 9 May 2024

Horoscope 5 April |  ज्योतिष शास्त्रानुसार आज ५ एप्रिल २०२४ शुक्रवारचा दिवस हा महत्त्वाचा आहे. ग्रहांच्या योगामुळे आज वाशी योग, आनंदादि योग, सनफळ योग, साध्य योग, या ग्रहांनी तयार केलेल्या शुभ योगांचे काही राशींना सहकार्य लाभेल. सकाळी ७.१३ वाजेनंतर चंद्र हा कुंभ राशीत असल्यामुळे चंद्र-शनी दोष असेल. आज दोन शुभ मुहूर्त आहेत. सकाळी ८.१५ ते १०.१५ वाजेपर्यंत आणि दुपारी १.१५ ते २.१५ वाजेपर्यंत. आजचा दिवस हा कोणत्या राशीच्या लोकांसाठी कसा असेल? हे जाणून घेऊयात.

मेष राशी –

आज शेअर बाजारात ज्यांनी गुंतवणूक केली आहे. त्यांना मोठा नफा मिळेल. मात्र, बाजाराचा अभ्यास नीट करूनच गुंतवणूक करा. नोकरदार वर्गाने कामाच्या ठिकाणी भविष्यावर अवलंबून राहू नये. आजची काम आजच पूर्ण करा. कुटुंबात तणावाचे वातावरण असेल. आज तुम्ही कोणत्याही द्विधा मन:स्थितीत असल्यास आपल्या आई वाडीलांसोबत  बोलून त्यावर तोडगा काढा. आज तुमच्या काही इच्छा पूर्ण होऊ शकतात. विद्यार्थ्यांना संघर्ष करावा लागेल. परिस्थिती तुमच्या बाजूने नाही पण निराश होणे किंवा चिडचिड करणे टाळले पाहिजे. (Horoscope 5 April)

वृषभ राशी –

व्यवसायिकांनी आपल्या व्यवसायात कुठलेही प्रयोग न करणे हे सध्या तुमच्यासाठी फायदेशीर असेल. व्यावसायिकांना आज इच्छित नफा मिळेल. नोकरदार वारगळा आज कामाच्या ठिकाणी काही आव्हानांना सामोरे जावे लागेल. त्यामुळे तुम्ही तुमच्या कामाची पद्धत बदलली पाहिजे. आज तुमची तुमच्या जोडीदारासोबत काही निवांत वेळ घालवू शकता.  पण तुमच्या जोडीदाराच्या काही वागण्याने तुमचे मन दुखावले जाऊ शकते. आरोग्याविषयी बोलायचे झाले तर, तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत सावध राहावे. अचानक काही त्रास होऊ शकतात. (Horoscope 5 April)

मिथुन राशी –

व्यावसायिकांच्या व्यवसायात प्रगती होईल.  मात्र, आता व्यावसायिकांना काही आव्हाने व अडचणींना सामोरे जावे लागेल. नऊकरदार वर्गाच्या लोकांच्या हातून आज कामाच्या ठिकाणी काही चुका होऊ शकतात. आज काही कौटुंबिक वाद उद्भवू शकतात. मात्र, ते बाहेर जाणार नाहीत. याची काळजी घ्या. तुमच्या जोडीदारामुळे आज तुमचा तणाव कमी होईल. जोडीदाराच्या भावना समजून घ्या आणि कामाचा राग हा आपल्या नात्यांवर काढू नका. यामुळे कामासोबतच नातीही खराब होऊ शकतात.  (Horoscope 5 April)

Horoscope 5 April | कर्क राशी –

पूर्वी व्यवसायासाठी विचारपूर्वक घेतलेले काही आर्थिक निर्णय हे आताच्या परिस्थितीत व्यवसायासाठी फायदेशीर ठरतील. त्यामुळे व्यवसायात काही मोठे बदल घडू  शकतात. नोकरदार लोकांसाठी आजचा दिवस उत्तम असेल. तुमच्या कामामुळे आज तुमच्यावर वरिष्ठ खुश असतील. तुम्ही ऑफीसमध्ये कौतुकास पात्र असाल. तुमच्या जोडीदाराच्या मदतीमुळे आणि सोबतीमुळे तुमच्या अनेक समस्या कमी होतील. कुटुंबातील वाद मिटवण्यात तुम्ही आज यशस्वी व्हाल. राजकारण आणि प्रशासकिय क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी दिवस हा उत्तम असेल. (Horoscope 5 April)

Horoscope 1 April | कोणाला फायदा तर कोणाचे नुकसान; वाचा आजचे राशीभाविष्य

सिंह राशी –

डिजिटल मार्केटिंग करणाऱ्या लोकांच्या व्यवसायात चांगली वाढ होईल. आज जर तुम्हाला काही शुभ काम करायचे असेल. तर, ते संध्याकाळी ५ ते ६ वाजेच्या दरम्यान करा. आज तुम्हाला व्यवसायात चांगला फयदा होईल. नोकरीच्या शिधात असणाऱ्यांसाठी अडथळे दूर होतील. लवकरच तुम्हाला चांगली संधी मिळू शकते. आज तुम्हाला अडचणतीत कौटुंबिक सहकार्य मिळेल. राजकीय क्षेत्रातील व्यक्ती प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवू इच्छिता. नोकरदार वर्गाच्या लोकांच्या स्वभावामुळे कामाच्या ठिकाणी आज लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. जोडीदारासोबत बोलताना विनम्र स्वभाव ठेवा. कुटुंबातील सर्वांशी तुमचे एकमत होईल. आज तुम्ही गरजूंना मदत करू शकता. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तुम्ही राजकीय पातळीवर संयम ठेऊन काम केल्यास तुम्हाला नक्कीच यश मिळेल.(Horoscope 5 April)

कन्या राशी –

औद्योगिक क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस फायद्याचा असेल.  नोकरदार वर्गाच्या लोकांना कामाच्या ठिकाणी बेकायदेशीर कामे आणि आळशीपणापासून दूर राहावे लागेल. यामुळे तुमची नोकरी धोक्यात येऊ शकते. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाटून घ्या यामुळे तुमची अनेक कामे सोपी होतील. विद्यार्थ्यांच्या करिअरमध्ये यशाचा प्रवास सुरू होईल. प्रेम संबंध किंवा वैवाहिक जीवनात आज तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत आनंदाचे कक्षण घालवता येऊ शकतात. यामुळे तुमचा आजचा दिवस आनंदात जाईल.  (Horoscope 5 April)

तुळ राशी –

व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायात आज नुकसान सहन करावे लागू शकते. व्यवसाय सांभाळण्यासाठी तुम्हाला अधिक परिश्रम घ्यावे लागतील. नोकरदार वर्गाच्या लोकांच्या आयुष्यात आज अनेक गुंतागुंतीच्या समस्या उद्भवू शकतात. पण त्या सोडवण्यातही तुम्ही यशस्वी व्हाल. कामाच्या ठिकाणी कोणाकडूनही खूप अपेक्षा ठेऊ नका. तुम्ही आर्थिक नियोजन करायला हवे. अन्यथा पुढे आर्थिक समस्या जाणवतील. तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावे. आज तुमच्या रागामुळे जवळच्या व्यक्तीशी मतभेद होऊ शकतात. तुमचे वैवाहिक जीवन आज तणावपूर्ण असेल. आरोग्याविषयी बोलायचे झाले तर, डोकेदुखी आणि अंगदुखीशी संबंधित त्रास होऊ शकतो. (Horoscope 5 April)

वृश्चिक राशी –

व्यवसायिकांना मोठे प्रकल्प मिळाल्याने त्यांच्या व्यवसायात वाढ होईल. मात्र, आज तुम्ही बाबी संयमाने आणि शांततेने हाताळायला हव्यात. नोकरदार वर्गाला नोकरीत काही अनुभवी लोकांचे चांगले सहकार्य मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमची बदनामी होऊ शकते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून कामावर लक्ष केंद्रित करा. राजकीय क्षेत्रातील व्यक्ती आपल्या सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडण्यात यशस्वी होतील. तुम्हाला आज घराशी संबंधित काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात. प्रेम संबंधांतील आणि वैवाहिक जीवनातील समस्या संपतील. (Horoscope 5 April)

धनु राशी –

व्यवसायात संघर्ष करावा लागेल. मात्र, आत्मविश्वासाने काम करा. नोकरदार वर्गाला नोकरीच्या ठिकाणी इतर लोक तुमच्या व्यक्तिमत्त्वाकमुळे आकर्षित होतील. आज नोकरीत प्रतिष्ठा वाढू शकते. कामाच्या बाबतीत केलेले वेळेचे व्यवस्थापन हे तुम्हाला उपयोगी ठरेल. तुमचे वैवाहिक आयुष्य जोडीदारासोबत आनंदात जाईल.  कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. (Horoscope 5 April)

मकर राशी –

सिद्ध योग असल्याने व्यावसायिकांना व्यवसायात लाभ होऊ शकतो. व्यवसायात सर्वांचेच सहकार्य मिळेल. त्यांच्या पाठिंब्यामुळे व्यवसायाचा विस्तार होण्यास मदत होईल. नोकरदार वर्गाला अनपेक्षित फायदा होऊ शकतो. नोकरदार वर्गाला कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकते. जोडीदारासोबत आजचा दिवस हा शांततेत जाईल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी केलेल्या कामाचे आज वरिष्ठ पातळीवर कौतुक होईल.(Horoscope 5 April)

Horoscope 30 March | राजकीय व्यक्तींसाठी आजचा दिवस कसा..?; वाचा आजचे राशिभविष्य

कुंभ राशी –

व्यवसायिकांना आज व्यवसायात मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे. त्यामुळे तुम्ही आर्थिक व्यवहारांत सावध राहणे हे तुमच्यासाठी चांगले राहील. नोकरदार वर्गाने कामाच्या ठिकाणी सावधगिरी बाळगायला हवी. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. कारण आज तुमच्या काही चुकीच्या बोलण्यामुळे वाद होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी काही व्यक्ती आक्षेपार्ह बोलू शकतात. व्यवसायासाठी तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त मेहनत घ्याल. कामाच्या ठिकाणी आज प्रयत्नांच्या तुलनेत कमी यश मिळेल. तुम्हाला आज आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तुमच्या जोडीदाराचा हट्ट हा आज तुम्हाला आर्थिकदृष्ट्या महागात पडू शकतो. आरोग्याविषयी बोलायचे झाले तर, शरीरात पोषक आणि जीवनसत्त्वांची कमतरता यामुळे तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्या जाणवू शकतात.

मीन राशी –

सिद्ध योगामुळे व्यवसायिकांच्या व्यवसायातील आर्थिक समस्या दूर होतील आणि व्यवसायात प्रगती होईल. गुंतवणूक करताना आधी व्यावसायिकाने त्यासंबंधित संशोधन करावे. प्रेम संबंध किंवा वैवाहिक जीवनात तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या भावना समजून घेतल्यास तुमचे जीवन अधिक सुंदर होईल. आज तुमच्या कुटुंबात होणारे काही बदल हे तुमच्यासाठी संमिश्र परिणाम आणतील. विद्यार्थ्यांनी कुठलंही निर्णय घेताना ज्येष्ठांचे मत घ्यावे.  तुम्ही आज तुमचे मित्र आणि इतरांसाठी सल्लागाराची भूमिका बजावू शकतात. लोकांची अनेक महत्त्वाची कामे आज तुमच्या सल्ल्याने होतील. तुम्हाला आज एखादे सरप्राईज मिळू शकते. आरोग्याविषयी बोलायचे झाले तर, सांधे आणि स्नायूंच्या वेदणेच्या समस्येमुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो.  (Horoscope 5 April)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here