Dindori Loksabha | दिंडोरीच्या इच्छुक उमेदवारांनी घेतले नाशिकच्या इच्छुक उमेदवारांचे आशिर्वाद

0
3
Dindori Loksabha
Dindori Loksabha

Dindori Loksabha |  नाशिकमध्ये महाविकास आघाडीचा तिढा सुटलेला असून, येथे उमेदवाराने प्रचारालाही सुरुवात केली आहे. मात्र, महायुतीचा वा काही संपण्याचे नाव घेत नाही. तर, दुसरीकडे दिंडोरी लोकसभेत भाजपने विद्यमान खासदार भारती पवार यांना संधी दिली असून, यामुळे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाणही तिकीटासाठी आग्रही आहेत आणि त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे.(Dindori Loksabha)

 दिंडोरी लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाने महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून भास्कर भगरे यांची उमेदवारी जाहीर केली असून, या जागेवर ‘माकप’नेदेखील दावा केला होता. दरम्यान आता जे. पी. गावित यांनीही निवडणूक लढवण्याचा निर्धार केला असून, त्यासाठी आजपासून त्यांनी तालुकानिहाय चाचपणी सुरू केली आहे.(Dindori Loksabha)

भेटीत काय घडले..?

दरम्यान, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे संभाव्य उमेदवार आणि माजी आमदार जे. पी. गावित यांनी काल ओझर येथे शांतीगिरी महाराजांची भेट घेतली. तसेच यावेळी त्यांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  आपल्याला पाठिंबा देण्याची विनंती केली. अर्धा तास शांतीगिरी महाराज आणि जे. पी. गावितांची चर्चा झाली. हे दोन्ही उमेदवार निवणूक लढवण्यासाठी इच्छुक असून, यांना अद्याप कुठल्याही पक्षाकडून तिकीट मिळालेले नाही. गावित हे दिंडोरी तर शांतिगिरी महाराज हे नाशिकमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून, त्यांनी नाशिक मतदारसंघात आपल्या प्रचारालाही सुरूवात केली आहे.(Dindori Loksabha)

NCP candidate | शरद पवार गटाची यादी जाहीर; दिंडोरीतून भास्कर भगरेंना संधी

Dindori Loksabha | माकप स्वतंत्र निवडणूक लढवणार..?

गावित यांनी शरद पवार यांचीही भेट घेतली होती. यावेळी दिंडोरी मतदारसंघ हा माकपला मिळावा, अशी मागणीही त्यांनी केली होती. मात्र, याबाबत एकमत होऊ शकले नाही आणि मविआच्या जागावाटपात दिंडोरी मतदारसंघ शरद पवार गटाला मिळाला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून ही जागा न मिळाल्याने माकप आता स्वतंत्र निवडणूक लढवणार आहे. (Dindori Loksabha)

दरम्यान, आजपासून जे पी गावित यांनी दिंडोरी लोकसभा मतदार संघात विधानसभा मतदारसंघनिहाय दौरा सुरू केला असून, १३ एप्रिलपर्यंत ते प्रत्येक तालुक्यात जाऊन येथील कार्यकर्ते आणि मतदारांचा कौल घेणार आहेत. तसेच माकपच्या मुंबई येथे झालेल्या पॉलिट बिरोच्या बैठकीत दिंडोरी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच हा प्रस्ताव केंद्रीय समितीला पाठविण्यात आला  असून,(Dindori Loksabha)

Dindori Lok Sabha | माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण दिंडोरीतून अपक्ष लढणार..?

भारती पवारांसमोरील आव्हाने 

केंद्रिय समितीने संमती दिल्यास गावित या मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. गावित यांची पेठ, सुरगाणा, कळवण व दिंडोरी या तालुक्यांमध्ये चांगला दबदबा असून, येथून गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना ९० हजार मते मिळाली होती. त्यामुळे आता आधीच पक्षांतर्गत धुसफूस, मतदार संघातील विरोध आणि समोरील उमेदवाराचे तगडे आव्हान याचा भारती पवारांच्या मतांवर कसा परिणाम होणार हे पहावे लागणार आहे.(Dindori Loksabha)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here