Dindori Lok Sabha | माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण दिंडोरीतून अपक्ष लढणार..?

0
3
Dindori Lok Sabha
Dindori Lok Sabha

Dindori Lok Sabha | काल राष्ट्रवादी शरद पवार गटाने आपल्या उमेदवारांची पहिली ताडी जाहीर केली. यात दिंडोरी लोकसभा मतदार संघातून भास्कर भगरे यांना संधी देण्यात आली आहे. दरम्यान, यामुळे आता दिंडोरी लोकसभेच्या मैदानात भाजपच्या भारती पवार आणि शरद पवार गटाचे भास्कर भगरे अशी लढत होणार, असे दिसत असतानाच आता दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण हेदेखील येथून अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. (Dindori Lok Sabha)

दोन दिवसांपूर्वी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनीही बुलढाणा येथून अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. महायुतीत बंडखोरी होण्याची कारणं म्हणजे अजित पवार गट आणि शिंदे गटाला कमी जागा देण्यात आल्या असून, यामुळे दोन्ही पक्षातील अनेक नेते हे नाराज आहेत. याशिवाय भाजपमधील त्याच उमेदवारांना पुन्हा संधी देण्यात आल्यानेही अनेक स्थानिक नेते नाराज आहते. त्यामुळे या नाराजीतून अनेकांकडून बंडखोरी होण्याची शक्यता असून, याचीच सुरुवात दिंडोरी लोकसभा मतदारसंघापासून झाली आहे.(Dindori Lok Sabha)

NCP candidate | शरद पवार गटाची यादी जाहीर; दिंडोरीतून भास्कर भगरेंना संधी

Dindori Lok Sabha | हरिश्चंद्र चव्हाणांच्या आशेवर पाणी 

दरम्यान, भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी उमेदवारीसाठी शरद पवारांचीही भेट घेतली होती. शरद पवार गटाकडून तिकीट मिळवण्यासाठी त्यांचा प्रयत्न होता. मात्र, काल शरद पवार गटाने यादी जाहीर केली असून, त्यांनी भगरे यांना संधी दिल्याने चव्हाणांच्या या आशेवरही पाणी फेरले गेले. त्यामुळे आता ते बंडखोरी करत दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. भाजपने पुन्हा विद्यमान खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांना उमेदवारी दिल्यानंतर हरिश्चंद्र चव्हाण हे नाराज असून, यामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे समजते आहे. (Dindori Lok Sabha)

चव्हाण-पवार यांच्यातील नाराजीचा शरद पवारांना फायदा  

दरम्यान, हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून, भाजपने भारती पवारांना पुन्हा संधी दिली. यानंतर शरद पवार गटानेही भास्कर भगरे यांना उमेदवारी दिल्याने हरिश्चंद्र चव्हाणांनी आता ‘एकला चलो रे’ चा अवलंब करण्याचे ठरवले आहे. तर, ते यासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज देखील भरणार आहेत. हरिश्चंद्र चव्हाण भारती पवार यांच्या विरोधात उभे राहिल्यास भाजपची डोकेदुखी वाढणार आहे. कारण हरिश्चंद्र चव्हाणांमुळे भाजपचे मतविभाजन होईल आणि याचा अप्रत्यक्ष फायदा हा शरद पवारांच्या उमेदवाराला होऊ शकतो.  (Dindori Lok Sabha)

Nashik | हरिश्चंद्र चव्हाण आणि शरद पवार यांच्या भेटीमागे काय दडलंय..?

पवारांमुळे हॅटट्रीक हुकली..

हरिश्चंद्र चव्हाण हे 2019 च्या निवडणुकीआधी सलग दोन वेळेस दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. 2019 मध्ये त्यांची हॅटट्रीक करण्याची संधी होती. मात्र, त्यांना डावलून ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या डॉ. भारती पवार यांना भाजपने उमेदवारी दिली. तर, यापूर्वी 2014 च्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार असलेल्या हरिश्चंद्र चव्हाण यांनीच राष्ट्रवादीच्या उमेदवार असलेल्या भारती पवार यांचा दारुण पराभव केला होता.(Dindori Lok Sabha)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here