Skip to content

Panjabrao dakh | हवामानाचा अंदाज सांगणारे पंजाबराव डख लोकसभा निवडणूक लढवणार

Panjabrao dakh

Panjabrao dakh |  राज्यात सध्या आगामी लोकसभा निवडणुकांचे वातावरण तयार झाले असून, या पार्श्वभूमीवर अनेक अनपेक्षित घडामोडी घडताना दिसत आहेत. यातच आता परभणी येथून आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. दरम्यान, राज्यातील हवामानाचा अंदाज सांगणारे मध्यमांवर प्रसिद्ध असलेले पंजाबराव डख हेदेखील आता राजकारणात उतरले असून, ते अपक्ष लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. पंजाबराव डख हे परभणी लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत.(Panjabrao dakh)

पंजाबराव डख परभणीतून निवडणूक लढवणार

पंजाबराव डख यांच्या या निर्णयाबाबत स्वतः पंजाबराव डख यांनीच माहिती दिली आहे. पंजाबराव डख हे प्रसारमाध्यमांतून महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज सांगत असतात. तर, त्यांनी सांगितलेला हवामानाचा अंदाज हा  अनेकवेळा अचूक ठरतो, असे राज्यातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच अगदी कमी वेळेत प्रसिद्ध झाले आहे. दरम्यान, हेच पंजाबराव डख आता परभणीतून अपक्ष लोकसभा निवडणूक लढवणार आहेत.(Panjabrao dakh)

Dindori Lok Sabha | माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण दिंडोरीतून अपक्ष लढणार..?

Panjabrao dakh | पंजाबराव ख विरुद्ध जानकर

परभणी  मतदारसंघ हा महायुतीने राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांच्यासाठी सोडला आहे. राष्ट्रीय समाज पक्ष हा महायुतीतील घटक पक्ष असून, महायुतीचे परभणीतील अधिकृत हणून महादेव जानकर हे लोकसभा निवडणूक लढवणार आहे. जानकर हे महायुतीत नाराज होते. त्यानंतर ते मविआत जाऊन माढ्याच्या जागेवर निवडणूक लढवतील, असा अंदाज होता. याबाबत शरद पवारांनीदेखील इच्छा व्यक्त केली होती. मात्र, ऐनवेळी महायुतीने त्यांना परभणीतून उमेदवारी दिली.  (Panjabrao dakh)

Jalgaon Lok Sabha | जळगावात मोठा ट्विस्ट; भाजप खासदाराच्या पत्नी ठाकरे गटाच्या उमेदवार..?

कोण आहेत पंजाबराव डख..?

परभणीतून अपक्ष लोकसभा निवडणूक लढवणारे पंजाबराव डख हे राज्यातील हवामानाचे अंदाज वर्तवतात.  कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कधी पेरणी करावी, हवामान कसे असू शकते याबाबतची माहिती ते आपल्या समाजमाध्यमांतून देत असतात. राज्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग त्यांना मानतो. त्यांनी वर्तवलेल्या हवामानाच्या अंदाजावर मोठ्या प्रमाणात शेतकरी, नागरिक विश्वासही ठेवतात. त्यामुळे ते समाजमाध्यमांवर प्रसिद्ध आहेत.

दरम्यान, हवामानाचा अंदाज सांगणाऱ्या पंजाबराव डख यांचा परभणी लोकसभेतून निवडणूक लढवण्याचा हा अंदाज खरा ठरणार का?. महायुतीचे महादेव जानकर यांच्या विरुद्ध डख यांची ही लढत यशस्वी ठरणार की जानकर डख यांचा हा राजकीय अंदाज चुकीचा ठरवणार हे पाहणे मोठे औत्सुक्याचे ठरणार आहे.  (Panjabrao dakh)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!