Uddhav Thackeray | दिल्लीतून उद्धव ठाकरेंचे भाजपला खुले आव्हान

0
3
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray

Uddhav Thackeray | अरविंद केजरिवाल यांच्या अटकेच्या विरोधात आज दिल्लीतील रामलीला मैदानात इंडिया आघाडीने ‘लोकशाही बचाव रॅली’ आयोजित केली होती. यावेळी विरोधी नेत्यांनी भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला असून, भाजपला खुले आव्हान दिले आहे. दरम्यान, “निवडणुकीच्या तोंडावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि हेमंत सोरेन यांना अटक केली आहे आणि भाजपमध्ये सामील झालेल्या ठगांवरील केसेस मागे घेत त्यांना भाजपच्या वॉशिंग मशीनमधून धुवून काढलंय, असं म्हणत केजरिवाल आणि ठाकरे गटाच्या नेत्यांवरील ईडी कारवाईवरुन उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला आहे. (Uddhav Thackeray)

Uddhav Thackeray | विरोधक एकवटले 

आज राजधानी दिल्ली येथे सगळे विरोधी पक्षांचे नेते एकवटले असून, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या विरोधात दिल्लीतील रामलीला मैदानात या लोकशाही बचाओ रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. तर या रॅलीत महाराष्ट्रातून ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, शरद पवार व खासदार संजय राऊत हे याठिकाणी उपस्थित आहेत. अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यादेखील उपस्थित आहेत. (Uddhav Thackeray)

Uddhav Thackeray | मी पंतप्रधानांना नाही, पंतप्रधान मला शत्रू मानतात

दिल्लीतून ठाकरेंचं भाजपला खुलं आव्हान

दरम्यान, यावेळी उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून भाजपला खुले आव्हान दिले असून, यावेळी ते म्हणाले की,” जर तुमच्यात हिंमत असेल तर, तुमच्या बॅनरवर लिहा की, ईडी, सीबीआय, आणि आयटी डिपार्टमेंट हे भाजपचे तीन साथी पक्ष आहेत. अरविंद केजरीवाल यांच्यावर काहीतरी आरोप करून त्यांना तुरुंगात टाकलंय, हेमंत सोरेन यांच्यावरही आरोप करत त्यांना तुरुंगात टाकलंय. ही असली कोणती पद्धत आहे. (Uddhav Thackeray)

उद्धव ठाकरेचं जनतेला आवाहन

उद्धव ठाकरेंनी रामलीला मैदानातून संपूर्ण देशवासियांना आवाहन केलं आहे की,”मजबूत देशासाठी आपल्याला एकजुटीचं सरकार हे आणावंच लागेल. देशातील राज्यांचा सन्मान करणारं सरकार आपण आणलंत तरंच आपला देश वाचेल. तुमचं भविष्य हे कुणाच्या हातात द्यायचं हे आता तुम्हाला ठरवायचं आहे. आम्ही याठिकाणी प्रचारासाठी नाही, तर लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र जमलो आहोत. (Uddhav Thackeray)

Uddhav Thackeray | आता महिलांना सिलेंडरही फुकट; उद्धव ठाकरेचा घणाघात

दिल्लीमध्ये आज इंडिया आघाडीची लोकशाही बचाव रॅली

राजधानी दिल्लीतील रामलीला मैदान हे देशातील काही ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार असून, या मैदानात आज सर्व विरोधी पक्षांचे विरोधक एकवटले आहेत. भाजपच्या विरोधात विरोधकांची एकजूट दाखवण्यासाठी आणि शक्तीप्रदर्शन करण्यासाठी रामलीला मैदानावर इंडिया आघडीचे घटक पक्ष एकत्र जमले आहेत.  (Uddhav Thackeray)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here