Skip to content

Jalgaon Lok Sabha | जळगावात मोठा ट्विस्ट; भाजप खासदाराच्या पत्नी ठाकरे गटाच्या उमेदवार..?

Jalgaon

Jalgaon Lok Sabha | या लोकसभेत भाजपने अनेक ठिकाणी विद्यमान खसदारांनाच पुन्हा संधी दिली. रावेर लोकसभा मतदार संघातही विद्यमान खासदार रक्षा खडसे यांनाच पुन्हा संधी देण्यात आली. यापैकी अनेक मतदार संघात दिलेल्या उमेदवारांच्या विरोधातील वातावरण आहे. मात्र, याला अपवाद ठरवत जळगाव लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचे तिकीट कापून त्याऐवजी स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. खासदार उन्मेष पाटील यांना डावलल्यामुळे त्यांच्यासह त्यांचे समर्थकही नाराज आहेत. दरम्यान, या नाराजीनंतर त्यांच्या पत्नी संपदा पाटील या शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार असल्याच्या चर्चा आहेत. मात्र, अद्याप ठाकरे गटाने या चर्चांना स्पष्ट नकार दिला आहे. (Jalgaon Lok Sabha)

उन्मेष पाटील यांना महायुतीतून तिकीट न मिळाल्याने आता त्यांच्या पत्नी संपदा पाटील या ठाकरे गटाच्या तिकिटावर निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा सध्या जळगावच्या राजकीय क्षेत्रात सुरू आहेत. मात्र, नकार दिला असला तरीही आज ठाकरे गटाने जाहीर केलेल्या यादीत किंवा महाविकास आघाडीकडूनही अजून जळगाव लोकसभेसाठी उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. (Jalgaon Lok Sabha)

Jalgaon | जळगावच्या शिव महापुराण कथेत महिला चोरांचा सुळसुळाट

Jalgaon Lok Sabha | एकदाही भेटीसाठी आले नाही

भाजपने महाराष्ट्रातील उमेदवारांच्या जाहीर केलेल्या यादीत उन्मेष पाटील यांचा पत्ता कट करून स्मिता वाघ यांना भाजपने उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी होती. पुन्हा एकदा संधी मिळावी यासाठी त्यांनी अनेकदा दिल्लीवारीही केली. मात्र त्यांना यात यश आले नाही. गेल्या काही दिवसांपूर्वीच जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची जळगाव येथे बैठक घेण्यात आली होती.(Jalgaon Lok Sabha)

या बैठकीतही उन्मेश पाटील गैरहजर होते. याबाबत त्यांना विचारले असता, आपल्याला बैठकीसाठी कुठलाही फोन किंवा मेसेज आला नसल्याने मी बैठकीला येऊ शकलो नाही. उमेदवार जाहीर झाल्यानंतर एकदाही उन्मेश पाटील हे जळगावात  भाजप कार्यकर्ते किंवा पदाधिकाऱ्यांच्या भेटी गाठीसाठी आले नाही. त्यामुळे त्यांची नाराजी उघड दिसून येते. मात्र, तरीही उन्मेष पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन मी पक्षावर नाराज नसल्याचे त्यांनी सांगितले होते.

BJP loksabha Candidate | भाजपाची दुसरी यादी जाहीर; भारती पवार आणि सुभाष भामरे यांनाच पुन्हा उमेदवारी

उन्मेष पाटील आणि उद्धव ठाकरे यांची गोपनीय भेट..?

तर, उन्मेष पाटील यांनी गेल्या आठवड्यात उद्धव ठाकरे यांची गोपनीय भेट घेतल्याच्याही चर्चा रंगल्या होत्या. एवढेच नाहीतर मातोश्रीवर काही उमेदवारांच्या नावाची चर्चा झाली असून, यात जळगावचे विद्यमान भाजप खासदार उन्मेष पाटील यांच्या पत्नी संपदा पाटील यांच्याही नावावर चर्चा झल्याच्या चर्चा आहेत.मात्र, यावर अद्यापही स्वतः उन्मेष पाटील किंवा ठाकरे गटाकडून कुठलीही प्रतिक्रिया मिळालेली नाही. तर, दुसरीकडे अजूनही भाजपाला आव्हान देण्यासाठी महाविकास मतदार संघात ताकद असलेल्या उमेदवाराचा शोध सुरू आहे. (Jalgaon Lok Sabha)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!