Skip to content

NCP candidate | शरद पवार गटाची यादी जाहीर; दिंडोरीतून भास्कर भगरेंना संधी

NCP candidate

NCP candidate | राज्यात निवडणुकांचे वातावरण तयार झाले असून, जवळपास सर्वच पक्षांनी आपापल्या उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली आहे. सर्वप्रथम भाजप, कॉंग्रेस, मग ठाकरे गट, दोन दिवसांपूर्वीच शिंदे गटानेही आठ जागांवरील आपल्या उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली होती. दरम्यान, आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. शरद पवारांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन या उमेदवारांची नावे घोषित केली आहेत. (NCP candidate)

राज्यात काही जागांवरून अजूनही महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात रस्सीखेच सुरू असून, अद्याप काही जागांचा तिढा सुटलेला नाही. त्यामूळे काही प्रमुख उमेदवारांचीच नावे शरद पवार गटाने जाहीर केली आहेत. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून ठाकरे गटाने आपल्या पहिल्या 16 उमेदवारांच्या यादीत राजाभाऊ वाजे यांचे नाव जाहीर केले होते. त्यामुळे आता महायुतीकडून वाजे यांच्यापुढे कोणाचे आव्हान असेल. हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (NCP candidate)

Shiv Sena Candidate | शिंदेसेनेची पहिली यादी जाहीर; नाशिकच्या उमेदवाराचे नाव नाहीच

NCP candidate | भारती पवारांविरोधात भगरेंचे आव्हान..?

तर, दुसरीकडे नाशिकच्या दुसऱ्या लोकसभा मतदार संघात महायुतीच्या अधिकृत उमेदवार म्हणून भाजपने केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री खासदार डॉ. भारती पवार यांना पुन्हा संधी दिली आहे. दरम्यान, भारती पवार यांच्या विरोधात मविआकडून कोणाला मैदानात उतरवले जाणार. याची सर्वांनाच उत्सुकता होती. तर अखेर आता शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर झाली असून, राजकारणातील चाणक्य म्हणजेच शरद पवार यांनी भारती पवारांच्या विरोधात भास्कर भगरे यांना दिंडोरी लोकसभेच्या रिंगणात उतरवले आहे.(NCP candidate)

गेल्या काही दिवसांपूर्वी भाजप नेते आणि दिंडोरी लोकसभेचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनीही शरद पवारांची भेट घेतली होती. त्यांनाही कार्यकर्ते आणि स्थानिकांकडून निवडणूक लढवण्यासाठी आग्रह केला जात होता. त्यामुळे चव्हाण शरद पवार गटात प्रवेश करतील आणि भारती पवारांच्या विरोधात निवडणूक लढवतील, अशी चर्चा होती. मात्र, आता अखेर या चर्चांना विराम लागला असून, शरद पवार गटाने दिंडोरी लोकसभेच्या अधिकृत उमेदवाराची घोषणा केली आहे. (NCP candidate)

BJP loksabha Candidate | भाजपाची दुसरी यादी जाहीर; भारती पवार आणि सुभाष भामरे यांनाच पुन्हा उमेदवारी

अशी आहे उमेदवारांची यादी 

1. वर्धा – अमर काळे
2. दिंडोरी – भास्करराव भगरे
3. बारामती – विद्यमान खासदार सुप्रिया सुळे
4. शिरुर- विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे
5. अहमदनगर – पारनेरचे माजी आमदार निलेश लंके(NCP candidate)

काल आमदारकीचा राजीनामा आणि आज उमेदवारी 

नुकताच शरद पवार गटात प्रवेश केलेले अमर काळे आणि पारनेरचे माजी आमदार निलेश लंके यांना लोकसभेची संधी देण्यात आली आहे. कालच निलेश लंके यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन शरद पवार गटात जाहीर पक्ष प्रवेश केला. यानंतर आज त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. (NCP candidate)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!