Skip to content

Chhagan Bhujbal | नाशिकच्या उमेदवारीबाबत भुजबळांचे मोठे वक्तव्य

Chhagan Bhujbal

Chhagan Bhujbal |  आगामी लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे राजकीय महत्त्व वाढले असून, या जागेसाठी महायुतीत वाद सुरू आहेत. महायुतीचे तिन्ही मित्रपक्ष हे नाशिकच्या जागेसाठी आग्रही असून, यामुळे महायुतीत मिठाचा खडा पडला आहे. नाशिकच्या जागेसाठी शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे, भाजपचे दिनकर पाटील, राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ हे उमेदवार इच्छूक आहेत. त्यामुळे जागेचा तिढा हा अजूनही सुटलेला नसून, हा वाद आणखी चिगळत आहे. दरम्यान, यातच मंत्री छगन भुजबळ यांनी उमेदवारीबाबत एक मोठे वक्तव्य केले असून, यामुळे आता शिंदे गट आक्रमक झाला आहे. (Chhagan Bhujbal)

यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, “नाशिक लोकसभेच्या उमेदवारीसाठी माझी मागणी किंवा कुठलाही आग्रह नव्हता. दिल्लीत झालेल्या बैठकीत माझ्या नावाची अचानक चर्चा सुरू झाली. त्यानंतर मला बोलवले होते. मी होळीच्या दिवशी मुंबईहून नाशिककडे निघालो असता, मला पुन्हा मुंबईला बोलावले. मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले की माझ्या उमेदवारीची चर्चा आहे. ते खरे आहे का? यावेळी फडणवीसांनी मला सांगितले की, हो हे खरे आहे. त्यामुळे आता तुम्हालाच उभे राहावे लागेल”, असे म्हणत मंत्री छगन भुजबळांनी नाशिकच्या उमेदवारीवर दावा केला आहे.  (Chhagan Bhujbal)

Chhagan Bhujbal | उमेदवाराचे नाव जाहीर केलेच कसे?; भुजबळ श्रीकांत शिंदेंवर संतापले

Chhagan Bhujbal | राष्ट्रवादीचे घड्याळ हीच निशाणी असेल

ज्याला निवडणुकीला उभे राहायचे असते. तो उमेदवार चार पाच महिन्यांपासून चर्चा करत असतो. पण माझे नाव अचानक पुढे आले आणि त्यानंतर आमची चर्चा झाली. नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे हेदेखील उमेदवारीसाठी फार आग्रही आहेत. त्यामुळे नाशिकच्या जागेबाबत अद्यापही चर्चा सुरु आहे. यावर जो निर्णय वरिष्ठ घेतील, तो मला मान्य असेल. आम्ही सर्व महायुतीसाठी एकजुटीने काम करू. राष्ट्रवादीला नाशिकची जागा मिळाल्यास राष्ट्रवादीचे घड्याळ हीच निशाणी असेल, असेही मंत्री भुजबळांनी सांगितले. (Chhagan Bhujbal)

Nashik Loksabha | दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ; नाशिकमधून भुजबळांना उमेदवारी

.. ही माझी चूक असेल तर, हो मी चूक केली

मराठा समाजाकडून नाशिक जिल्ह्यात छगन भुजबळांच्या विरोधात होर्डिंग लावण्यात आले असून, त्याबाबत भुजबळ म्हणाले की, “जिल्ह्यात माझ्या नावाचे होर्डिंग लागले आहेत. मी पुन्हा सांगतो की, मी मराठ्यांना कधीच विरोध केलेला नाही. याउलट मी मराठा आरक्षणाला सपोर्टच केला. केवळ ओबीसीतून नको वेगळे आरक्षण द्या, अशी मागणी होती आणि ती मान्य झालेली आहे. जर ही माझी चूक असेल तर, हो मी ती चूक केली आहे, असे स्पष्टीकरण भुजबळ यांनी दिले.  तसेच “असे होर्डिंग लावून मराठा समाजाचे नुकसान होणार आहे. कारण राज्यभरात चांगले चांगले मराठा समाजाचे नेते आहेत. यामुळे त्यांच्या विरोधात देखील होर्डिंग लागतील”, असा इशारादेखील यावेळी त्यांनी दिला. (Chhagan Bhujbal)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!