Skip to content

Porn Film Racket | वेगवेगळ्या राज्यातील तरुणांची टोळी महाराष्ट्रात करत होती पॉर्न व्हिडिओ…

Porn Film Racket

Porn Film Racket |  सध्या तंत्रज्ञानामुळे तरुणाई अनेक वाईट गोष्टींच्या आहारी गेली असून, यामुळे अनेक धक्कादायक प्रकार समोर येत असतात. भारतात पॉर्न व्हिडिओवर बंदी असून, पॉर्न व्हिडिओ बनवणे हा कायद्याने गुन्हा आहे. दरम्यान, अशीच एक घटना पुणे जिल्ह्यातून उघडकीस आली आहे. सध्या पुण्यात गुन्हेगारी आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. तसेच जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवैध धंदेदेखील चालतात. ही सगळी प्रकरणं समोर येत असतानाच लोणावळा येथून पॉर्न व्हिडिओ तयार करणाऱ्या टोळीला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Porn Film Racket)

Sex Racket | मुलगी, जावयाच्या मदतीने सासूच चालवायची सेक्स रॅकेट

Porn Film Racket | नेमकं प्रकरण काय..?

लोणावळा येथील एका आलिशान बंगल्यात पॉर्न व्हिडिओ शूट करणाऱ्याचा हा गोरख धंदा सुरू असल्याचे कळताच लोणावळा ग्रामीण पोलिसांनी येथे धाड ताकत टोळीला अटक केली आहे. तर, यावेळी पोलिसांनी हे पॉर्न शूट करण्यासाठी वापरला जात असलेला कॅमेरा तसेच इतर साहित्य देखील जप्त केलं आहे. संबंधित आरोपींकडून शूट करण्यात आलेले काही पॉर्न व्हिडिओदेखील जप्त करण्यात आले आहेत.(Porn Film Racket)

याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तब्बल १३ जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, यांना अटक करण्यात आली आहे. भारतातील अनेक वेगवेगळ्या राज्यातून हे सर्व तरुण लोणावळा येथे एकत्र जमले होते. दरम्यान, या सर्व संबंधित आरोपींच्या विरोधात लोणावळा ग्रामीण पोलीसांत भादवि. कलम 292, 293, 34. माहीती तंत्रज्ञान अधिनियम 2008 कायदा कलम 67,67 (A), स्त्रियांचे असभ्य प्रतिरुपन अधिनियम 1986 कायदा कलम 3,4,6,7. या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Porn Film Racket)

Sirdi Sex Racket : देवभूमी शिर्डीत देहविक्रीचा गोरखधंदा उद्धवस्त

वेगवेगळ्या राज्यातील तरुण एकत्र… 

या घटनेतील आरोपी विश्णु मुन्नासाहब साओ (कोलकत्ता), जावेद हबीबुल्ला खान (उत्तरप्रदेश), अलका राज.के राजन (साउथ वेस्ट दिल्ली), नेहा सोमपाल वर्मा (उत्तरप्रदेश), रिया वासु गुप्ता (दिल्ली), बुध्दसेन बरदानीलाल श्रीवास (चंद्रपुर), समीर मेहताब आलम (उत्तरप्रदेश), अनुप मिथीलेष चौबे (मुंबई), रामकुमार श्रीभगवान यादव (हरियाणा), विना भारत पोवळे (ठाणे), मैनाज जाहीद हुसेन खान (पालघर), राहुल सुरेश नेवरेकर (ठाणे), अनिकेत पवन शर्मा (सुरत, गुजरात), वंशज सचीन वर्मा (डेहराडुन), मनीश हिरामण चौधरी (हरीयाणा) यांच्यासह संबंधित ज्या बंगल्यात हा प्रकार सुरू होता त्या लोणवळा येथील बंगल्याच्या मालका विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला असून, या सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास लोणावळा पोलिस करत आहेत. (Porn Film Racket)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!