Sirdi Sex Racket : देवभूमी शिर्डीत देहविक्रीचा गोरखधंदा उद्धवस्त

0
31

Shirdi Sex Racket : लाखो भविकांचं श्रद्धास्थान असलेल्या देवभूमी शिर्डीमध्ये देहविक्री व्यवसाय होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

शिर्डी मध्ये काही महिन्यांपूर्वी स्थानिक पोलिसांनी एका हॉटेलवर छापा टाकून देहविक्री व्यवसाय उद्धवस्त केला होता. मात्र आता चक्क एका आलिशान बंगल्यामध्ये देहविक्री व्यवसाय सुरू असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. शिर्डी सारख्या पवित्र ठिकाणी असे गैरप्रकार घडत असल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. तर शिर्डीमध्ये पुन्हा एकदा हाय प्रोफाइल देहविक्रेय रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पाेलिसांना यश आले आहे.(shirdi sex racket)

विशेष म्हणजे एका बंगल्यात हा गैरप्रकार सुरू होता. पाेलिसांनी या बंगल्यावर छापा टाकून एका पिडीत मुलीची त्याठिकाणाहून सुटका केली असून या घटनेतील दोन संशयित आरोपिंना ताब्यात घेत त्यांची कसून चाैकशी करुन त्यांना पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे. या मोठ्या कारवाईनंतर पाेलिस दलाचे कौतुक केलं जातं आहे.

अहमदनगर जिल्ह्यात असलेलं शिर्डी हे पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. मात्र या पवित्र स्थळी गेल्या वर्षी उच्चभ्र वस्तीत सेक्स रॅकेट उघड झाले होते. यावर्षी देखील काही महिन्यांपूर्वी असाच प्रकार घडला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा शिर्डी शहर परिसरात पिंपळवाडी रोड येथील एका बंगल्यात देहविक्रीय व्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलीस अधिकारी संदीप मिटके यांना मिळाली. हे एक हाय प्रोफाईल रॅकेट असल्याची खबर लागल्याने पाेलिसांनी त्या ठिकाणी बनावट ग्राहक पाठवुन पंचासमक्ष छापा टाकला.(shirdi sex racket)

एका पिडीत मुलीची याठिकाणाहून सुटका देखील करण्यात आली आहे. यामध्ये दाेघां जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चाैकशी केल्यानंतर त्यांच्यावर शिर्डी पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.(shirdi sex racket)

शिर्डी सारख्या पवित्र तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी चालत असलेल्या अनैतिक व्यवसायावर केलेल्या कठोर कारवाईमुळे साई भक्तांनी आणि शिर्डीकरांनी शिर्डी पोलिसांचे कौतुक केले आहे. या प्रकरणी पाेलिसांनी दाैलत किसन लटके (वय ४७) आणि अंकुश संजय घोडके (वय १९) यांना अटक केल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे शिर्डी शहरातील अवैध धंदे करणार्‍यांमध्ये भिती निर्माण झाली आहे.(shirdi sex racket)

https://thepointnow.in/cm-ajit-pawar/

दरम्यान ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला व उपअधिक्षक स्वाती भोर यांच्या (shirdi sex racket) मार्गदर्शनाखाली डीवायएसपी संदीप मिटके, गुलाबराव पाटील, इरफान शेख, कुऱ्हे, शिंदे, या पाेलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केली.

सध्या शिर्डी शहरात याच प्रकरणाची चर्चा सुरू असून यापुढे असे गैरप्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी कठोरात कठोर उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here