Skip to content

Shiv Sena Candidate | शिंदेसेनेची पहिली यादी जाहीर; नाशिकच्या उमेदवाराचे नाव नाहीच

Shiv Sena Candidate

Shiv Sena Candidate | राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. दोन्ही गोटात जागावाटपावरून धुसफूस सुरू असून, ज्या जागांचा तिढा सुटला आहे. त्या जागांवरील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली जात आहे. महायुतीत काही जागांवरून नाराजी नाट्य सुरू आहे. मात्र, वाद मिटलेल्या जागांवरील उमेदवारांची अधिकृत यादी शिंदे गटाने जाहीर केली आहे. ठाण्याच्या आनंदाश्रमातून यादी जाहीर करण्यात आली आहे. (Shiv Sena Candidate)

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत सांगली या जागेवरून आणि महायुतीत यवतमाळ आणि नशिक या जागांवरून रस्सीखेच सुरू आहे. तर, यानंतर आता शिंदे गटाने आपल्या काही जागांवरील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजपने याआधीच आपल्या उमेदवारांची नावं जाहीर केली असून, इतर दोन्ही पक्षांच्या उमेदवारांची नावे अद्यापही गुलदस्त्यात होती. काल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये बैठक झाली असून, यात उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर आता अखेर शिंदे गटाची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे. तर, ज्या जागांचा तिढा कायम आहे. त्या जागांवरील उमेदवारही पुढील एक ते दोन दिवसांत जाहीर केले जाऊ शकते. (Shiv Sena Candidate)

Shiv Sena Candidate | शिंदे गटाच्या उमेदवारांची यादी; लवकरच अधिकृत घोषणा..

श्रीकांत शिंदेंचेही नाव नाही 

दरम्यान, आता केवळ ८ जागांवरील उमेदवार जाहीर झाले आहेत. मात्र, विशेष म्हणजे नाशिक, कल्याण-डोंबिवली, यवतमाळ-वाशिम या जागांवरील उमेदवारांच्या नावाचा या यादीत समावेश नाही. स्वतः श्रीकांत शिंदे यांचेही नाव या यादीत नाही. या जागांवरील तिढा कायम असून, हा वाद अजूनही मिटलेला नसल्याच्या चर्चा यामुळे पुन्हा सुरू झाल्या आहेत. तर जाहीर झालेल्या उमेदवारांपैकी अनेकांना पुन्हा पक्षाने संधी दिली आहे. (Shiv Sena Candidate)

Shiv Sena Candidate | अशी आहे शिंदे गटाच्या उमेदवारांची यादी

१. मावळ – श्रीरंग बारणे

२. रामटेक – राजू पारवे

३. हातकणंगले – धैर्यशील माने

४. कोल्हापूर – संजय मंडलिक

५. हिंगोली – हेमंत पाटील

६. बुलढाणा – प्रतापराव जाधव

७. शिर्डी – सदाशिव लोखंडे

८. दक्षिण मध्य मुंबई – राहुल शेवाळे (Shiv Sena Candidate)

Govinda in Shivsena | अखेर गोविंदा शिवसेनेत; शिंदेंनी दिली ‘ही’ जबाबदारी

सध्या शिंदे गटाने केवळ ८ जागांची यादी जाहिर करण्यात आली असून, ज्या जागांवरील उमेदवारांच्या नावाची सर्वांनाच उत्सुकता होती. त्याबाबत अजून कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, याआधी समोर आलेल्या संभाव्य यादीनुसार नाशिकची जागा ही शिंदे गटाकडे राहणार असून, हेमंत गोडसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. (Shiv Sena Candidate)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!