Skip to content

Sharad Pawar | शरद पवारांची ताकद वाढणार; ;’हा’ आमदार राजीनामा देणार..?

Sharad Pawar

Sharad Pawar |  राज्यात सध्या आगामी लोकसभा निवडणुकींची धुम सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय घडामोडी या घडताना दिसत आहे. सध्या दोन्ही गोटात नाराजी नाट्य सुरू असून, सर्वच पक्ष उमेदवारीमुळे नाराज असलेल्या आपापल्या नेत्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, यातच आता आणखी मोठी बातमी शरद पवार गटातून समोर आली असून, यानुसार पारनेरचे आमदार निलेश लंके आज आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार आहेत.(Sharad Pawar)

राष्ट्रवादीमधील बंडानंतर आमदार निलेश लंके हे अजित पवारांसोबत गेले होते. मात्र, ते अहमदनगर दक्षिण मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. पण महायुतीत ही जागा भाजपकडे असून, तिकीटासाठी नीलेश लंकेंनी घरवापसी केली. ते पुन्हा शरद पवार गटात दाखल झाले. त्यानंतर आता अहमदनगर दक्षिणमधून त्यांचे लोकसभेचे तिकीट हे जवळपास आता निश्चितच असून, ते आजच्या जाहीर सभेत आमदारकीचा राजीनामा देण्याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे. आज आमदार निलेश लंके आपल्या पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या तसेच त्यांच्या निलेश लंके प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकारी, सभासद आणि कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. त्यामुळे आजच्या या बैठकीत निलेश लंके काय घोषणा करणार हे पहावे लागणार आहे.  (Sharad Pawar)

Sharad Pawar | शरद पवारांची मोठी घोषणा; ‘मी यापुढे कधीही…’

Sharad Pawar | लंकेंची उमेदवारीही जाहीर होणार..?

निलेश लंके हे शरद पवार गटात यावेत यासाठी शिरूर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे यांनी विशेष प्रयत्न केले होते. त्यानंतर नीलेश लंके हे शरद पवार गटात पक्ष प्रवेश करतील अशी शक्यता होती. दरम्यान, आता कोणत्याही क्षणी लंके आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन शरद पवार गटात प्रवेश करू शकतात. तर, यानंतर त्यांची उमेदवारीही जाहीर होऊ शकते. दरम्यान, याचसाठी लंके यांनी आज आपल्या निकटवर्तीयांची बैठक बोलवली आहे. तर या बैठकीत ते आपल्या आमदारीकीच्या राजीनाम्याबाबत मोठी घोषणा करू शकतात.  (Sharad Pawar)

Sharad Pawar | लेकीसाठी पवारांची ३१ वर्षांचे वैर विसरून कट्टर विरोधकासमोर माघार

नगरमध्ये कशी लढत?

निलेश लंके यांचा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील पक्ष प्रवेश हा जवळपास निश्चितच आहे. असे झाल्यास आमदार निलेश लंके हे महाविकास आघडीचे शरद पवार गटाचे उमेदवार असू शकतात. तर, महायुतीत अहमदनगरची जागा ही भाजपकडे असून, याठिकाणी पुन्हा एकडा विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.  तर, नीलेश लंके यांची उमेदवारी जाहीर झाल्यास नगरमध्ये निलेश लंके विरुद्ध सुजय विखे पाटील अशी तगडी लढत होणार आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत लंके काय भूमिका घेतील याकडे सर्वांचेच लक्ष लागेल आहे. (Sharad Pawar)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!