Jalgaon | तू चिंता करू नकोस, तुला…; रक्षा खडसेंसाठी भाजपचे संकटमोचक मैदानात

0
4
Jalgaon
Jalgaon

Jalgaon |  सध्या राज्यात आगामी लोकसभा निवडणुकींची रणधुमाळी सुरू असून, या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. काही जागांचा तिढा अजूनही कायम आहे. तर, ज्या जागांवर उमेदवारांची घोषणा झाली आहे. तिथे उमेदवार पायाला भिंगरी लाऊन आपापल्या मतदार संघ पिंजून काढत आहेत. दरम्यान, रावेर लोकसभा मतदार संघातून भाजपने पुन्हा एकडा विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, जळगावमध्ये भाजपमध्ये दिलेल्या उमेदवारांबद्दल पक्षातच अंतर्गत नाराजी असल्याचे अनेकदा दिसून आले. (Jalgaon)

गेल्या काही दिवसांपूर्वी रक्ष खडसे आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये गिरीश महाजनांसमोर वाद झाल्याचा एक व्हिडिओ समोर आला होता. त्यामुळे रक्षा खडसे या पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. दरम्यान, रावेर मतदार संघातून उमेदवारी जाहीर झाल्यापासून रक्षा खडसे यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. भर उन्हात त्या गावोगावी जाऊन रॅली, सभा, डोअर टू डोअर मिटिंग घेत आहेत. त्यांनी मतदार सांगहतील महिलांवर भर दिला असून, महिलांसोबत संवाद साधण्यासाठी त्या डोअर टू डोअर मिटिंग आणि महिला मेळावे घेत आहेत. तसेच आपल्या कामांची माहितीही रक्षा खडसे या मतदारांना देत आहेत. (Jalgaon)

Jalgaon Lok Sabha | जळगावात मोठा ट्विस्ट; भाजप खासदाराच्या पत्नी ठाकरे गटाच्या उमेदवार..?

गिरीश महाजनांचे रक्षा खडसेंना आश्वासन 

रावेरमध्ये रक्षा खडसेंच्या विरोधात अजूनही महाविकास आघाडी सक्षम उमेदवाराचा शोध घेत आहे. मात्र, महायुतीने खडसेंच्या नावाची घोषणा केल्यापासूनच त्यांनी प्रचाराचे रान उठवले आहे. दरम्यान, त्यांचा हा प्रचाराचा धडाका सुरू असतानाच भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन हेदेखील त्यांच्या मदतीला धावून आले असून, त्यांनी रक्षा खडसेंची चिंता कमी केली आहे. गिरीश महाजनांनी रक्षा खडसे यांना दिलासा दिला असून, “तू चिंता करू नको. मी तुला माझ्या मतदारसंघातून मोठं लीड मिळवून देईल”, असे आश्वासन गिरीश महाजनांनी रक्षा खडसेंना दिले आहे.  (Jalgaon)

Sharad Pawar | शरद पवारांची ताकद वाढणार; ;’हा’ आमदार राजीनामा देणार..?

Jalgaon |  तुला एक लाखाच्यावर लीड राहील

भाजपच्या रावेरच्या विद्यमान खासदार आणि उमेदवार रक्षा खडसे या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या सून आहेत. रक्षा खडसेंच्या विरोधात एकनाथ खडसे यांनी रावेरमधून निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली होती. तर, येथे सासरे विरुद्ध सून अशी किंवा ननंद विरुद्ध भावजाय अशी लढत होण्याची शक्यता होती. मात्र, रक्षा खडसे यांना भाजपने पुन्हा एकडा संधी दिल्यानंतर मात्र, एकनाथ खडसेंनी त्यांच्या विरुद्ध निवडणूक लढण्यास नकार दिला. यासाठी एकनाथ खडसे यांनी आजारपणाचं कारण पुढे केलं. त्यामुळे आता महाविकास आघडी या मतदार संघात रक्षा खडसे यांच्या विरोधात कोणाला तिकीट देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.  (Jalgaon)

दरम्यान, जामनेरमध्ये भाजपचा कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. याठिकाणी रक्षा खडसे, गिरीश महाजन आणि महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यादेखील उपस्थित होत्या. यावेळी बोलताना गिरीश महाजन यांनी “तू चिंता करू नको. माझ्या जामनेर मतदारसंघातून तुला एक लाखाच्यावर लीड राहील, असा विश्वास व्यक्त केला.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here